जुळवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:25 AM2018-04-02T00:25:16+5:302018-04-02T00:25:16+5:30

एकाने विचारले, राम दरवर्षी कसा जन्मतो? तो तर कधीच जन्मला. बरोबर तुही कधी जन्मला? तू वाढदिवस करतो ना पहिल्यापासून शंभरपर्यंत. आपली मजल शंभर खूप. मध्येच गचकतो. आता शोध रामाचा जन्म त्याचा इतका हजार लाखावा वाढदिवस. अरे बाबा संत अधूनमधून जन्म घेतातच. त्यांच्या वेळचा गाळ स्वच्छ करतात. नवीन पेरणी करतात. जातात. त्याला ते पटलं. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी उघडपणे हो-नाही सध्या म्हटलं जातं.

 Connect | जुळवणी

जुळवणी

googlenewsNext

- किशोर पाठक

एकाने विचारले, राम दरवर्षी कसा जन्मतो? तो तर कधीच जन्मला. बरोबर तुही कधी जन्मला? तू वाढदिवस करतो ना पहिल्यापासून शंभरपर्यंत. आपली मजल शंभर खूप. मध्येच गचकतो. आता शोध रामाचा जन्म त्याचा इतका हजार लाखावा वाढदिवस. अरे बाबा संत अधूनमधून जन्म घेतातच. त्यांच्या वेळचा गाळ स्वच्छ करतात. नवीन पेरणी करतात. जातात. त्याला ते पटलं. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी उघडपणे हो-नाही सध्या म्हटलं जातं. विज्ञानवारी ईश्वर नाहीच म्हणतात. हा वाद सनातन आहे. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी परमेश्वर सतत कार्यमग्न असतो. तो लहान मूल देतो तसा म्हातारा घालवतो. तो काळा-गोरा, सुंदर-कुरूप, सुष्ट-दृष्ट, चांगला-वाईट, रात्र-दिवस चालू असतो. म्हणून तर झाडाला पानगळ असते. जुन्या खोडाला नवी पालवी येते, काळ्याकुट्ट रात्रीनंतर सूर्याेदय होतोच, पुनर्जन्मावर विश्वास असेल तर जन्मतो. म्हणजे हे नक्की नाही. आपल्या सोईने. माणूस एकच समजा नाव नसलेला माणूस असला तर त्याची जात कोणती धर्म कोणता? मूल जन्मते. ज्या मातेच्या पोटातून जन्मते तोच त्याचा धर्म. पुरुषाला महत्त्व तसे नाहीच. एखाद्या स्त्रीने मूल नाकारणे शक्य होते. त्याचा पुरावा असतो स्त्रीच. ज्याला एका स्त्रीने जन्म दिला, दुसरीने वाढविला, तिसरीशी लळा झाला आणि चौथीशी कोण कोणता म्हणून जवळ आला. माणूस एक अतर्क्य गोष्ट आहे. त्याचा शोध घेत राहणे आणि त्याला जोडू पाहणे कठीण. म्हणूनच माणूस अगाध याकरिता. परत त्याचा वेगळेपणा पहा. अगदी जुळ्यांमध्येही फरक असतोच. त्याच भांडवलावर सिनेमे निघाले. जुडवा म्हणजे एक काळा एक गोरा. एक सीता दुसरी गीता. हा ढोबळ समज. पण प्रत्येक माणूस वेगळा. केवळ चेहरा ठेवत नाही. त्याचा अवयव त्याचाच. तो दुसऱ्याशी जुळत नाही. म्हणून जुळवून घेणे ही म्हण झाली. म्हणजे काय? जुळत नाही हे सिद्ध झाले. जुळवून घेतच संसार होतो. भाऊ होतो, राज्य होते, सरकार होते. पाच वर्षे याच्या त्याच्याशी जुळवून घेण्यातच पक्षाची दमछाक होते. जे सत्ताधीश असतात ते विरोधक होतात आणि विरोधक सत्ताधीश. हा खेळ चालत राहतो. या जुळवणीत आपला लाभ करून घेणारे आणि इतरांचा लाभ हिसकावून घेणारेही असतात. प्रथम जुळवून घ्यायचं आणि ते टिकविण्यासाठी खोटं हसायचं तीही कसरतच. म्हणजे प्रथम जोडणे मग जुळवणे नंतर ते टिकवणे तसे भासवणे कठीणच. बघा जुळतंय का?

Web Title:  Connect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.