लोकमत दीपोत्सवमध्ये बेगम फरिदा खानम यांच्याशी दीर्घ संवादाची रसिली महफिल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:03 PM2018-10-23T15:03:22+5:302018-10-23T15:04:54+5:30
आज जानेकी जिद ना करो!
- टीम लोकमत दीपोत्सव
सीमापार लाहोरच्या मिट्टीमध्ये रुजली त्यांची गजल, पण फाळणीनं ताटातूट केलेले कोलकात्याचे महकते गली-मोहल्ले कधी विसरता नाही आले त्यांना. ‘हिंदुस्थानसे न्यौता है’ म्हटल्यावर डोळ्यांत पाणी येऊन फरिदा खानूम म्हणाल्याही ‘दीपोत्सव’ला, ‘अगर आ सकते आप, हमारे घर; तो चैनसे बैठते, बाते करते..’
- पण किती कठीण ती भळभळती सीमा ओलांडून पलीकडे जाणं! म्हणून मग फोनवरच्या दीर्घ गप्पांमध्येच उलगडली त्यांच्या रईसी जिंदगीची दुखरी दास्तां..
आणि ते स्वर. आज जानेकी जिद ना करो!!!
फरिदा खानम सांगतात.
त्या वेळी कलकत्त्यावर भले इंग्रजी अमल असेल; पण शहरांवर राज्य चालत होते ते कलाकारांचे. सतत कुठे न कुठे चालू असलेले संगीताचे जलसे, त्यात देशभरातून येणारे कलाकार, रसिकांची होणारी तोबा गर्दी..
मैफल संपली तरी त्याचा असर उतरत नसे.
मला आत्ता आठवण येतेय ती,
कोलकत्त्यात उस्ताद बरकत अली खान साहेबांच्या भोवती घोटाळणार्या रसिकांच्या गर्दीची.
उनकी सुरिली आवाजके दिवाने लोग उनके आगे-पीछे घुमते थे.
वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी बघितलेली ती चहलपहल पुन्हा डोळ्यांपुढे येते.
आणि वाटायला लागतं, स्वरांची ही जादू, ही कमाल दुनियेत नसती तर ही फरिदा खानम आयुष्य कसं जगली असती?
कैसा होता ये सफर?.