इतिहासातील वैराचे वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:26 AM2018-01-04T00:26:49+5:302018-01-04T00:27:16+5:30

१ जानेवारी १८१८ या दिवशी इंग्रज फौजांनी मराठ्यांचा भीमा-कोरेगाव परिसरात झालेल्या युद्धात पराभव करून पेशवाईचा पाडाव केला. यावेळच्या इंग्रज फौजांत महार रेजिमेंटचे ३००० सैनिक सामील होते. त्यामुळे पुढील काळात त्या लढाईला दलित विरुद्ध ब्राह्मण असा रंग आला. ज्या जागेवर हे युद्ध इंग्रजांनी जिंकले तेथे त्याच्या विजयाचे स्मारकही उभारले गेले. त्याला भेट देणा-या दलितांची संख्या नंतरच्या काळात वाढती राहिली.

 Current In Current History | इतिहासातील वैराचे वर्तमान

इतिहासातील वैराचे वर्तमान

Next

१ जानेवारी १८१८ या दिवशी इंग्रज फौजांनी मराठ्यांचा भीमा-कोरेगाव परिसरात झालेल्या युद्धात पराभव करून पेशवाईचा पाडाव केला. यावेळच्या इंग्रज फौजांत महार रेजिमेंटचे ३००० सैनिक सामील होते. त्यामुळे पुढील काळात त्या लढाईला दलित विरुद्ध ब्राह्मण असा रंग आला. ज्या जागेवर हे युद्ध इंग्रजांनी जिंकले तेथे त्याच्या विजयाचे स्मारकही उभारले गेले. त्याला भेट देणा-या दलितांची संख्या नंतरच्या काळात वाढती राहिली. १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरही त्या स्मारकाला भेट देऊन गेले. यावर्षी तेथे जमलेला जमाव कित्येक लाखांचा होता. त्यात जिग्नेश मेवाणी, मौलाना अजहर आणि उमर खलिद हे अन्य पुढारीही हजर होते. तेथील जमावात असलेली पेशवाईविरोधी (प्रत्यक्षात ब्राह्मणविरोधी) लाट मोठी होती. तिच्या उसळीने पेट घेतलेल्या दंगलीने तो सारा परिसरच वेढला गेला. गाड्या जाळल्या गेल्या, बसेसची मोडतोड झाली आणि बराच काळ वाहतूकही थांबली होती. सरकारची व्यवस्था अर्थातच अपुरी होती. या प्रकाराचे पडसाद मुंबई व औरंगाबादेत उठून तेथेही काही प्रमाणात बंद पाळला गेला. महाराष्टÑातही अनेक जागी त्याचे पडसाद उमटले. या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी ज्या नेत्यांवर आरोप केले ते संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे या सवर्ण नेत्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र अशा घटनांचे लोण फार लवकर वणव्यासारखे पसरते तसे ते पसरताना दिसले आहे. प्रकाश आंबेडकरांनी बुधवारी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. दुपारनंतर ती त्यांनी मागे घेतली. यातील साºयात दुर्दैवी म्हणावा असा भाग हा की हे भांडण वर्तमानातले नाही. २०० वर्षांपूर्वी घडून गेलेल्या एका घटनेचा आधार घेऊन ते पेटविण्याचा हा प्रयत्न आहे. पेशवाईने दलितांवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या आता जुन्या झाल्या. त्यातून त्या लढाईत लढलेले महार रेजिमेंटचे सैनिक इंग्रज सत्तेच्या बाजूने लढत होते. या साºया बाबी आताच्या हिंसाचाराची वर्तमान निरर्थकता दाखविणाºया आणि आपण अजूनही आपल्या इतिहासाकडे पाठ फिरविली नसल्याचे सांगणाºया आहेत. आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमांचा अभिमान बाळगणे व त्यांची पूजा बांधणे हा समाजाचा हक्क आहे. मात्र त्या पराक्रमाभोवतीचे संदर्भ समजावून घेणे आणि त्यांचा आजच्या बदलत्या काळाशी संबंध जुळवून पाहणे हे अधिक समंजसपणाचे आहे. समाजाचे इतिहास हे स्नेहाएवढेच वैरांनी भरले आहेत. त्यात युद्धे आहेत, हाणामाºया आहेत, वैरे आहेत आणि अत्यंत खासगी म्हणावी अशी भांडणेही आहेत. ती आता उकरून काढून त्यावर वर्तमानात हाणामाºया करणे व इतिहासातले वैर पुन: जागवणे यात हंशील नाही. दुर्दैैवाने सध्याचे केंद्र सरकार सामाजिक ऐक्याहून त्यातील दुहीवर भर देणारे आहे. ते जेवढे अल्पसंख्यविरोधी तेवढेच दलितविरोधीही आहे. अल्पसंख्य समाजावर जास्तीत जास्त निर्बंध लादणे आणि दलितांचे आक्रोश दाबून टाकणे यावर त्याचा नको तसा भर आहे. ते योगी आदित्यनाथ तर दरदिवशी अशी कारणे शोधण्यात व त्यात आपली दांडगाई चालविण्यात वाक्बगार आहे. त्यांच्या संघपरिवारातील एक वास्तव अद्याप समजलेले नाही. ते हे की भाजपा व संघ या संघटना ज्या गोष्टी करतात त्यांचा बरा वाईट परिणाम हिंदू-मुस्लीम व सवर्णांवर (आणि विशेषत: त्यातील ब्राह्मण वर्गावर होतो.) पुढारी दूर राहतात. सामान्य माणसे भरडली जातात. या संघटनांनीही आपल्या सरकारांना त्यांच्या विषारी कारवाया करण्यापासून रोखणे आता आवश्यक आहे. आज दलितविरोधात, उद्या अल्पसंख्यकांविरोधात, परवा ओबीसीविरोधात असे होत राहिले तर सारा समाज शकलांमध्ये विभागला जाईल आणि मग त्यात जे ‘अल्पसंख्य’ उरतील ते काय करतील आणि त्यांचे काय होईल? समाजाच्या संतापापुढे लष्करेही हतबल होतात हा अनुभव या संघटनांनी अशावेळी लक्षात घ्यायचा की नाही. याचवेळी समाजातील दलित व अल्पसंख्यकांच्या वर्गांनीही त्यांची इतिहासातील भांडणे व वैरे वर्तमानात आणण्याच्या प्रयत्नांना आवर घालावा हे त्यांनाही सांगितलेच पाहिजे.

Web Title:  Current In Current History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.