धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:19 PM2018-03-22T23:19:16+5:302018-03-22T23:19:16+5:30

रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला.

 Danger hour | धोक्याची घंटा

धोक्याची घंटा

Next

रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला. याच काळात ओला, उबर या ‘अ‍ॅपबेस्ड टॅक्सीं’नी बेमुदत संप पुकारला. रेल रोकोने त्रस्त झालेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा हा प्रकार होता. मुंबई ‘थांबवली’ तर आपल्या मागण्या मान्य होतातÞ; हवे ते आपल्या पदरी पाडता येते, हा एक नवा समज सध्या जनमानसात दृढ होत आहे. हेदेखील त्याचेच उदाहरण म्हणता येईल. मात्र मुंबईकरांनी नेहमी होऊ पाहणारा हा नाहक त्रास का सहन करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंदोलन करणे हा अधिकार आहे, पण हा अधिकार बजावताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकरी आंदोलनाने दाखवलेला समजूतदारपणा रेल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावशाली ठरतो. मुंबईकरांना, विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून दीडशे किलोमीटर चालत आलेले शेतकरी मध्यरात्रीच सोमय्या मैदानातून आझाद मैदानाकडे निघाले. याउलट रेल रोको आंदोलक कशाचाही विचार न करता थेट ‘रुळांवर’ उतरले. अशा आकस्मिक आंदोलनांसाठी ठोस यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. ही यंत्रणा आपत्कालीन यंत्रणेच्या धर्तीवर काम करणारी असायला हवी. दोन दशकांपूर्वी आझाद मैदानातून येणारे मोर्चे मंत्रालयापर्यंत धडकत होते. रहिवाशांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषण असे अनेक मुद्दे रहिवाशांनी न्यायालयासमोर ठेवले. न्यायालयाने गंभीर दखल घेत मोर्चे आझाद मैदानातच थांबतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिलेÞ; आणि त्या आदेशाची अंमलबजावणीही झाली. मोर्चे आझाद मैदानात स्थानबद्ध झाले. हे आदेश देताना किंवा त्याच्या अंमलबजावणीवेळी कोणताही विशेष कायदा केला गेला नाही. सरकारची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे मुंबई रोखू पाहणाºयांना आता रोखण्याची गरज आहे. मुंबई पोलिसांची जगभर ख्याती आहे. गुन्ह्याची उकल करण्यात मुंबई पोलिसांचा हातखंडा आहे. ही सक्षम यंत्रणा मात्र गेल्या काही वर्षांपासून कमकुवत बनत चालली आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला अशा घटनांतून केवळ सुरक्षेच्या उपायांकडे अधिक लक्ष देण्यात आले. तथापि, अशा घटना घडण्यापूर्वीच त्याची चाहूल देणारी गुप्तचर यंत्रणादेखील अधिक बलशाली करणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न झाल्यास भविष्यात मुंबईत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते.

Web Title:  Danger hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.