दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:33 AM2018-03-05T00:33:57+5:302018-03-05T00:33:57+5:30

आपण वेगवेगळे दिन साजरे करतो. निदान त्या दिवसापुरता तरी उत्साह राहतो. म्हणजे आता मराठी राजभाषा दिन अतिशय जोरात सर्व शाळा, कॉलेजेस, कार्यालये यात साजरा झाला. मराठीचे गौरवगीत, कुसुमाग्रजांच्या कविता नुसती रेलचेल होती; परंतु एक दिवसापुरती मराठी भाषा आपली आणि नंतर सोडा मराठीला, इंग्रजीचा गर्व बाळगा, हे करून चालणार नाही.

 Day | दिन

दिन

Next

- किशोर पाठक

आपण वेगवेगळे दिन साजरे करतो. निदान त्या दिवसापुरता तरी उत्साह राहतो. म्हणजे आता मराठी राजभाषा दिन अतिशय जोरात सर्व शाळा, कॉलेजेस, कार्यालये यात साजरा झाला. मराठीचे गौरवगीत, कुसुमाग्रजांच्या कविता नुसती रेलचेल होती; परंतु एक दिवसापुरती मराठी भाषा आपली आणि नंतर सोडा मराठीला, इंग्रजीचा गर्व बाळगा, हे करून चालणार नाही. आपल्याला सिनेमा-नाटक याचं वेड.
अलीकडे बरेच हिंदी नट मराठीत आवर्जून कामे करू लागलीत. मराठीत आशय, मांडणी छानच असते, असे बºयाच कलाकारांना वाटते. केवळ भाषाबदल म्हणून नाही तर खरोखरीच मराठीत काही सापडते म्हणून ते आवडते. असे हे दिन भावनांना जिवंत करतात. असे दिन वर्षभर असतात. आता ८ मार्चच बघा ना! जागतिक महिला दिन. स्त्रियांनी नटून साजरा करावासा दिवस. महिलेला न्याय, प्रतिष्ठा, स्थान, वेगळेपण प्रस्थापित करणारा दिवस. मग स्वत:चं काम करून समाजात वेगळं काम करणाºया महिलांना कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतात. खरं तर महिलेने केलेली भाजी, आमटी फुरकून तत्क्षणी दिलेली वाहवाची खंबीर दादच जागतिक महिला दिन साजरा करते. स्त्रीच्या आहे त्या गोष्टींचं कौतुक करावं एवढीच अपेक्षा असते. माणसाला माणूस म्हणून गौरव करण्याचा दिवस म्हणजे मनुष्य गौरव दिन. प्रेमाचे पण दिवस असतात. म्हणजे दिनची संधी घेऊन तरुण तरुणीला फूल देतो. भावना व्यक्त करतो, तो व्हॅलेन्टाईन होतो. काय गंमत पाहा, आपण दुसºयांच्या पटणाºया गोष्टी आपल्या केल्या; पण त्यांचे सातत्य, कामावरची निष्ठा आणि प्रेम कायमच वेगळे असते.
फक्त भारतातच माणूस आणि संस्कृतीची एवढी विविधता आहे की शंभर मैलावर आपली भाषा, आचार, विचार बदलतात ते पूर्ण भारताचे समजून घेताना आयुष्य संपेल; पण राज्य, भाग मात्र संपणार नाहीत. म्हणून भारतात सणांची आणि सुट्यांची रेलचेल आहे. दिनांची रेलचेल आहे. फक्त हे दिन ‘दीन’ व्हायला नको. एवढे जरी आपण सांभाळले तरी मिळवले. या दिनांनी माणसांचे मनोमीलन घडवले आहे ते आपली संस्कृती आणि चलनवलन सांभाळतात फक्त आपणही त्यांना सांभाळावं इतकंच!

Web Title:  Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या