संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:07 AM2018-02-16T04:07:31+5:302018-02-16T04:07:41+5:30

संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.

 Do you think the team needs to create a parallel military? | संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का?

संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का?

googlenewsNext

- डॉ. जितेंद्र आव्हाड
(आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)

संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.

लष्कराला सहा महिने लागतील, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीन दिवसात सेना उभारू शकतो, असे विधान संघाचे मुख्य मोहन भागवत यांनी केले. मुळात लष्करी प्रशिक्षण ही काही चेष्टा नव्हे. सियाचीनच्या बर्फात उणे ५५ अंशाच्या थंडीत किंवा कच्छच्या रणात ५५ अंशाच्या उन्हात पहारा करणे शाखेत जाऊन लाठ्याकाठ्या फिरवण्याइतकी सोपी गोष्ट नाही. एक लिटर पाण्यात अख्खा दिवस काढायचा किंवा प्रसंगी साप मारून खायचा हे गुळ पोळी खाणाºया किंवा वरण भातावर साजूक तुपाची धार असल्याशिवाय घशाखाली घास न उतरणाºयांना जमेल का हा एखाद्या विनोदी नाटकाचा विषय होऊ शकतो. पण रोज आपल्या प्राणांची आहुती देणाºया जवानांपेक्षा आपले स्वयंसेवक जास्त चांगले आहेत हे म्हणणाºया भागवतांना कुणाची उपमा देऊ या?
शौर्याची किंवा बलिदानाची काहीही परंपरा नसलेला संघ जेव्हा अशी भाषा करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय? १९६५ च्या युद्धामध्ये पाकिस्तानचे तीन रणगाडे हातबॉम्ब टाकून उद्ध्वस्त करणारा परमवीर अब्दुल हमीद, कारगिलचे शेवटचे शिखर सर करून तिरंगा फडकवताना आपल्या रेडिओवर खाली आपल्या कमांडरला ह्यह्यरकफ हए अफए अळ ळऌए ळडढह्णह्ण हा संदेश पाठवणारा कॅप्टन सचिन निंबाळकर किंवा २६/११ च्या हल्ल्यामध्ये मारला गेलेला कमांडो दलाचा मेजर संदीप उन्नीकृष्णन असे किती शूर सैनिक संघाच्या मुशीत तयार झाले? घरी आई आजारी असते किंवा गरोदर पत्नी असते, या सगळ्यांची पर्वा न करता सीमेवर आपले प्राण देण्यासाठी तयार असलेले किती शिपाईगडी संघाच्या शाखेत तयार झाले? केवळ त्यांच्या मृत्यूचे भांडवल करून गलिच्छ राजकारण खेळणाºया संघाने आपापली पोरं मात्र इंग्लंड, अमेरिकेत स्थायिक करून घेतली. म्हणजे मरणार आम्ही आणि तोरा मिरवणार हे. हे घृणास्पद काम मात्र संघाने १९२५ सालापासून चोख बजावले.
इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला हिटलरचा काळ आठवतो. आपला उजवा हात हेन्रीच हिमलर याच्या पुढाकाराने त्याने एस.एस. ही संघटना नाझी पक्षाच्या अंतर्गत तयार केली. जर्मनीचं ‘‘वांशिक शुद्धीकरण’’ करण्यासाठी स्थापना झालेली ही संघटना फक्त हिटलरशी बांधिलकी मानत होती. तिला लष्करी दर्जा देण्यात आला. हिटलरच्या सर्व राजकीय विरोधकांना संपवायचं काम तिच्याकडे होतं.
आर.एस.एस. ही एस.एस.च्या मार्गाने निघालेली संघटना आहे हे भागवत यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे. अल्पसंख्यांक आणि दलित यांच्यावर आज बेधडक होणारे अत्याचार हा त्याचा सराव आहे. अन्यथा स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवणाºया संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का भासावी? तरुण पिढीला माहीत नसेल, संघाच्या विचारसरणीनुसार चालणाºया ज्या संघटना भारतात आहेत त्यात भोसला मिलिटरी स्कूल ही एक आहे. डॉ. बाळकृष्ण मुंजे यांनी तिची स्थापना केली. एकेकाळी काँग्रेसमध्ये टिळकांचे कट्टर समर्थक असलेले मुंजे कडवे हिंदुत्ववादी होते.
संघाला इथे स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेली लोकशाही, घटना आणि तिरंगा कधीच मान्य नव्हता. आपले मुख्यालय असलेल्या रेशीमबागेवर तिरंगा फडकवणाºया दोन तरुणांवर संघाने ११ वर्षे खटला चालवला. फाळणी होऊनही जो मुस्लीम समाज या भारताला आपलं मानून इथे राहिला त्याला ते आपला मानायला तयार नाहीत.
भागवतांच्या सारवासारवीला आता काही अर्थ नाही. एस.एस.चा भारतीय अवतार हा आर.एस.एस. असणार हे आता उघड आहे.

 

Web Title:  Do you think the team needs to create a parallel military?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.