डोनॉल्ड, किम आणि बटणबॉम्ब
By संदीप प्रधान | Published: January 5, 2018 12:05 AM2018-01-05T00:05:50+5:302018-01-05T00:06:45+5:30
आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन हेही बीअरचा फेसाळलेला ग्लास घेऊन बसले होते.
आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन हेही बीअरचा फेसाळलेला ग्लास घेऊन बसले होते. दोघांवर मद्य स्वार झाले असताना उभयतांची दृष्टादृष्ट झाली. साधारणपणे भारतीय माणूस पोटात देशी-विदेशी जाताच वाघिणीच्या दुधाचा (इंग्रजी) रतीब घालू लागतो. परंतु, या दोघांनी चक्क मुन्नाभाई-सर्किटची बम्बय्या हिंदी सुरू केली...
डोनॉल्ड : अरे किम, तुम भी मेरे पिच्छु पिच्छु इधरीच आएला है क्या?
किम : भाई, आपुन तेरे पिच्छु पिच्छु नही तेरे पैलेच इधर आएला है. आपुन तेरेसे एक कदम आगे है समझा क्या.
डोनॉल्ड : देख किम, आपुन तेरेकु प्यार से सर्किट बोलेगा तो तू नाराज नही होगा नां? (गालगुच्चा घेतो)
किम : देख आपुन तेरेकु बुढ्ढा बोला, आपुनने तेरेकु कुत्ते जैसा भौकनेवाला बोला. तू भी मेरेकु बहोत कुछ कुछ बोला. चल तेरा दिल करता है तो बोल मेरेकु सर्किट. तेरे मनको सुकुन मिलेगा.
डोनॉल्ड : सर्किट, कायकु इतना मचमच कर रहेला है? आपुन तेरेकु इतना समझाया की मत पंगा कर, मत कर. लेकीन तू मानताईच नही.
किम : (खिशातून बटण टेबलावर काढून ठेवतो) ये देख...
डोनॉल्ड : ये क्या है? तेरेकु मटण का आॅर्डर देना है तो मै बुलाता हूं ना बेररकु. ये बटण काय को निकाला.
किम : ये ऐसावैसा बटण नही भाय. ये मै दबाऊंगा तो उधर बम्ब जाके सिधा गिरेगा अमरिका के सर के उपर समझा क्या?
डोनॉल्ड : अभी तू बहोत पिएला है. मेरेकु तू हिलता दिख रखा है. ये बटण तू मत दबा. देख तेरेकु तेरा दोस्त चीन का वेन जिआबाओ या तो फिर हू चिंताओ की कसम. मैने तेरा रेशन-पानी बंद करवाया फिर भी तू मोटा के मोटा है क्यों की ये तेरा चिनी दोस्त तेरेकु पिच्छुसे मदत करता है.
किम : अभी हायड्रोजन बम्ब फोडने से मेरेकु कोई रोक नही सकता. ये साल आपुन दिवाली मनाएगा. सारा पटाका फोड देगा. समझा क्या?
डोनॉल्ड : देख आज कल ना मेरेकु बापू दिखते है.
किम : कौन बापू?
डोनॉल्ड : वही इंडियावाला बापू. वो मेरेकु हमेशा बोलता है की, तू किम को जादू की झप्पी देनेका. लेकीन आज जाके तू मेरेकु मिला. (जागेवरून उठून जादू की झप्पी देतात)
किम : भाय, देख तू इतना प्यार से बोला, जादू का झप्पी दिया तो आपुन भी तेरे वास्ते कुछ करता है. ये ले बटण फेक दिया. अभी नो पंगा...नो झगडा... नो पटाका... चीअर्स (दोघे चषकाला चषक भिडवतात)
(दुसरे दिवशी सकाळी डोनॉल्डला हँग ओव्हरचा त्रास होत असल्यानं किम डोकं चेपत आहे.)
किम : रातकु मैने वो बम्बवाला बटण फेका क्या? अरे वो मेरी पत्नी रि सोल जु के फेव्हरेट कार का बटण था. अब घरमे बहोत बम्ब फुटेंगे... साला वाट लग गयी...