महामारीची स्वप्नं : ‘कोरोना’च्या भयाण काळात समस्येमध्ये भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 11:41 PM2020-04-16T23:41:14+5:302020-04-16T23:41:14+5:30

‘कोरोना’च्या भयाण काळात समस्येमध्ये भर

Dream of the pestilence: Add to the problem during the horrors of 'Corona' | महामारीची स्वप्नं : ‘कोरोना’च्या भयाण काळात समस्येमध्ये भर

महामारीची स्वप्नं : ‘कोरोना’च्या भयाण काळात समस्येमध्ये भर

googlenewsNext

तुम्हाला स्वप्नं पडतात का? खूपच पडतात का? एरव्हीही पडतात की, आता कोरोना विषाणूमुळे कोंडी झाल्यापासून आणि अनेक दिवस घरामध्ये बसल्यापासून ती जास्तच पडतात. तुम्ही घरातच आहात, कुणालाही भेटत नाही, कुठंही जात नाही, रात्री झोप उशिरा लागते, दिवसा खूप झोप येते, तसेच
जड झाल्यासारखं वाटतं आणि रात्री पडतात तशी दुपारीही स्वप्नं पडतात असं होतंय का तुमचं?

तरी घाबरू नका, तुम्ही एकटेच काही अपवाद नाही. जगभरात अनेक माणसांना या कोरोना कोंडीच्या काळात स्वप्नं पडत आहेत आणि काहींना त्या स्वप्नांची भीतीदेखील वाटत आहे. काही स्वप्नांमध्ये खूपजण घाबरतात, काही एकदम दचकतात. ही स्वप्नं खरी झाली तर काय, असं वाटूनही घाम फुटतो आहे आणि त्यामुळे झोपमोड होतेय... तर या सगळ्याचं अलीकडे ड्रीम रिसर्च इन्स्टिट्यूट लंडन आणि हार्वर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेश यांनी एक सर्वेक्षण केलं. त्याचं नाव होतं ‘ड्रीम सर्व्हे’. या सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या लक्षणांना त्यांनी नाव ठेवलं आहे, ‘पॅनडेमिक ड्रीम्स’ अर्थात महामारीची स्वप्नं. अनेकांनी टिष्ट्वट करून आपल्या स्वप्नांचे अनुभव लिहिले आहेत. आपल्याला काय आणि कशा प्रकारची स्वप्नं पडतात हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. अमुकआवडता माणूस, स्टार, आपला प्रेमाचा माणूस, कुणीतरी जिवाभावाची व्यक्ती आपल्याला घट्ट आलिंगन मारते आहे आणि आपल्याला तिच्यामुळे किंवा तिला आपल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे, अशी स्वप्नं पडत असल्याचंदेखील अनेकांनी नोंदविलं आहे.

ज्यांनी हा अभ्यास केला, त्याचे लेखक डायड्रे लाय बॅटेर सांगतात की, ‘जे नागरिक जास्त कल्पक असतात, जास्त विचार करतात त्या माणसांना एरव्हीही जास्त स्वप्नं पडत असतात. आता मात्र अनेक लोकांना जास्त प्रमाणात स्वप्नं पडू लागली आहेत. त्यातली अनेक स्वप्नं कोरोना संसर्गाशी, त्याच्या भीतीशी निगडित आहेत. एकीकडे एक गोष्ट बरी झाली आहे की, अनेक लोकांना पुरेशी झोपच मिळत नसे.फार कमी काळ लोक झोपत, अनेकांना झोपेची कमतरता हाच आजार होता. आता निदान कोरोनामुळे सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये तरी लोक जरा जास्त झोपतील. मात्र, झोपले तरी त्यांचं डोकं शांत होत नाही. त्यातून अनेकांना स्वस्थ झोप लागत नाही. त्यांच्या मनात एकप्रकारची भीती आहे आणि त्यामुळे त्यांच्यात तणाव वाढत आहे. त्यातून ही भयकारी स्वप्नं पडतात आणि आपल्याला हे स्वप्न का पडलं, याचा विचार अनेकजण मग दिवसभर करीत राहतात. स्वप्नांची साखळीही मग कोरोना विषाणूसारखी तुटत नाही. समस्यांच्या यादीतली एक वेगळीच समस्या आहे.

Web Title: Dream of the pestilence: Add to the problem during the horrors of 'Corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.