नशामुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:17 AM2018-07-10T00:17:59+5:302018-07-10T00:18:31+5:30
आधुनिक समाजामध्ये नशा असणे ही एक फार मोठी समस्या बनली आहे. विशेष करून युवकवर्ग यास बळी पडत आहे ही बाब खूपच चिंता करायला लावणारी आहे. युवक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शेवटी नशेच्या कारणामुळे नष्ट होणाऱ्या तरुण पिढीचा अर्थ आहे समाजाचाच नाश.
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय
आधुनिक समाजामध्ये नशा असणे ही एक फार मोठी समस्या बनली आहे. विशेष करून युवकवर्ग यास बळी पडत आहे ही बाब खूपच चिंता करायला लावणारी आहे. युवक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शेवटी नशेच्या कारणामुळे नष्ट होणाऱ्या तरुण पिढीचा अर्थ आहे समाजाचाच नाश.
नशा करण्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत- मौज-मजा करण्यासाठी किंवा तणावातून मुक्त होण्यासाठी. नशेची ही दोन्ही कारणे या बाबीला सिद्ध करतात की नशा करणाºया व्यक्ती या कोणत्यातरी आनंद अथवा मस्तीच्या शोधात असतात. जोपर्यंत नशेची धुंदी असते, तो पर्यंत चांगले वाटते आणि ज्यावेळी नशेची धुंदी उतरून समाप्त होते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये होणाºया रासायनिक बदलामुळे त्याला खूपच बेचैन वाटायला लागते आणि तो पुन्हा मादक पदार्थांकडे ओढला जातो. याप्रकारे नशा करणारी व्यक्ती एका चक्र व्यूहात फसली जाते ज्यातून त्याला बाहेर पडणे फारच अवघड असते. व्यसनमुक्तीकरिता अनेक प्रकारच्या समुपदेशनाच्या पद्धती प्रचलित आहेत आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा देखील उपयोग केला जातो. तथापि या सर्व पद्धतींना मर्यादा आहेत. या भौतिक नशेच्या पदार्थां व्यतिरिक्त अन्य तीन व्यसन/नशेंचे वर्णन भारतीय शास्त्रांमध्ये मिळते. ते तीन व्यसन आहेत- धन, नाव आणि कामवासना. असे म्हटले जाते की ही तीन व्यसने फारच खतरनाक आणि व्यक्ती तसेच समाजासाठी धोक्याची आहेत. धन, नाव आणि कामवासना या तीन बाबींचासुद्धा उद्देश हा आनंद मिळविणे हाच आहे.
भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार मनुष्याची मूळ चेतना पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ आहे. जेव्हा मनुष्य या चेतनेमध्ये आपल्याला स्थापित करतो, तेव्हा त्याला अक्षय आनंद प्राप्त होतो. हा अंतर्मुखी आनंद कोणत्याही बाहेरील वस्तू किंवा अवस्थेवर निर्भर करत नाही. तो आपल्या आत असतो, त्याचा आपण केवळ अनुभव करतो. जेव्हा ध्यानाच्या पद्धतीद्वारा आपण आपल्या विचारांना नियंत्रित करून आपल्या मूळ स्वरूपात आपल्याला स्थापित करतो, तेव्हा आपल्याला त्या परम आनंदाचा अनुभव होतो. शेवटी अध्यात्मशास्त्राचा उपयोग व्यसनमुक्तीमध्ये खूपच होऊ शकतो. जेव्हा मनुष्याला आतमधून आनंद येऊ लागतो तेव्हा त्याला बाहेरील कृत्रिम आनंदाची आवश्यकता राहत नाही. शेवटी सुरुवातीच्या काळापासूनच लहान मुले किंवा युवकांना अध्यात्माकडे आकर्षित करून त्यांना या राक्षसी वृत्तीपासून वाचवू शकतो. अध्यात्म हे मुळात कोणत्याही विशिष्ट उपासना पद्धतीशी संबंधित नाही.