खायचे-दाखवायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2016 02:50 AM2016-01-01T02:50:22+5:302016-01-01T02:50:22+5:30

राजकारण्यांचे खायचे आणि दाखवायचे दात कसे वेगवेगळे असतात याची नव्याने प्रचिती आणून देण्याचे काम छत्तीसगड राज्यातील कथित ध्वनिफितीने केले आहे. वर्षभरापूर्र्वी त्या राज्यात

Eating-and-eat | खायचे-दाखवायचे

खायचे-दाखवायचे

Next

राजकारण्यांचे खायचे आणि दाखवायचे दात कसे वेगवेगळे असतात याची नव्याने प्रचिती आणून देण्याचे काम छत्तीसगड राज्यातील कथित ध्वनिफितीने केले आहे. वर्षभरापूर्र्वी त्या राज्यात झालेल्या विधानसभेच्या अंतागड या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मंतूराम पवार यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. त्यांनी तसे करावे आणि भाजपाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी त्याच राज्याचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित आणि भाजपाचे विद्यमान मुख्यमंत्री रमणसिंह यांचे जावई पुनीत गुप्ता यांच्यात सौदेबाजी झाल्याचे या ध्वनिफितीतील संभाषणावरुन स्पष्ट होते. ही फीत जगासमोर आल्यानंतर काँग्रेस पक्षात खळबळ माजणे स्वाभाविकच होते. विशेष म्हणजे सदर ध्वनिफितीमध्ये एकूण चार व्यक्तींचे आवाज ऐकू येत असून त्यातील दोघांनी आवाज त्यांचाच असल्याची कबुलीदेखील दिली आहे. ही फीत जाहीर झाल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर तर काँग्रेसने भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असले तरी लाच घेणे हा जसा गुन्हा मानला जातो तसेच ती देणे हादेखील गुन्हाच मानला जातो. त्यामुळे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी म्हणता येतील. सामान्यत: बेईमानीचा धंदा वा व्यवहार अत्यंत इमानदारीने केला जातो असे म्हटले जाते. पण या प्रकरणात तसेही काही झालेले दिसत नाही. मंतूराम यांनी त्यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांना काही विशिष्ट रक्कम देण्याचे म्हणे कबूल केले गेले होते. त्यावर विश्वास ठेऊन त्यांनी मुदतीच्या आदल्याच दिवशी आपला अर्ज माघारी घेतला. केवळ तितकेच नव्हे तर पक्षाने उगारलेला बडतर्फीचा बडगादेखील स्वीकारला. पण त्यांना कबूल केली गेलेली रक्कम म्हणे दिलीच गेली नाही. ती मध्यस्थांनीच हडप केली व त्यामुळे संतप्त झालेल्या मंतूराम यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याची दिलेली धमकीदेखील याच ध्वनिफितीमध्ये ऐकायला मिळते. अमित जोगी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन ध्वनिफीत बनावट असल्याची तक्रार नोंदविली आहे तर निर्वाचन आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश छत्तीसगडच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. काँग्रेसचे दिल्लीतील श्रेष्ठी प्रदेश काँग्रेसच्या अहवालाची प्रतीक्षा करीत असून प्रदेश काँग्रेसने रितीप्रमाणे रमणसिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

Web Title: Eating-and-eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.