तरुण म्हणतात, हाता-पायांना माती लागू द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2024 07:28 AM2024-12-07T07:28:41+5:302024-12-07T07:30:01+5:30
युनिसेफ आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या 'युवक सहभाग आणि जल व्यवस्थापन' अभियानात अडीच लाख युवक सहभागी झाले आहेत. त्यानिमित्ताने...
संयोगिता ढमढेरे, मुक्त पत्रकार
हवामान बदलाच्या संकटांमुळे जगात तशी आपल्या गावातही नवनवीन आव्हानं उभी राहत आहेत. त्याने घाबरून चिंता करत बसायचे, की आपल्या परीने जे करता येईल ते करत राहायचं यापैकी काय निवडायचं हे प्रत्येकानं ठरवायचं आहे. महाराष्ट्रातल्या अडीच लाख तरुणांनी दुसरा पर्याय निवडला आहे. 'युवक सहभाग आणि जल व्यवस्थापन' या युनिसेफ आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग संयुक्त अभियानात अडीच लाख युवक त्यांच्या महाविद्यालयातील 'ग्रीन क्लब'चे सदस्य झाले आहेत. हाता-पायांना माती लागू द्या, निसर्गाच्या निकट जायला शिका, हाच या तरुणांचा आग्रह आहे!
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, पालघर व नागपूर या पाणीटंचाई असलेल्या आणि पाण्याची जास्त मागणी असलेल्या १३ जिल्ह्यांतील १५३० महाविद्यालयांत मार्च २०२३ मध्ये ग्रीन क्लब सुरू झाले आहेत. पाणी, ऊर्जा, स्वच्छता, जैवविविधता संरक्षण करणाऱ्या सवयी बाणवणे आणि पर्यावरणपूरक वातावरणनिर्मिती करणे हे ग्रीन क्लबचे मुख्य उद्देश आहेत. जलपरीक्षण, प्लास्टिक कचरा संकलन, पर्यावरणपूरक साहित्यनिर्मिती आणि कार्बन फुटप्रिंटचे मूल्यमापन यांसारख्या उपक्रमांमध्ये युवक सहभागी होत आहेत. त्यातून पर्यावरण सजग युवा नेतृत्वही उभं राहत आहे.
कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातील जिया अंबले ही या हरित चळवळीत आघाडीवर आहे. 'पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. ग्रीन क्लबमुळे युवकांना एकत्र येऊन स्थानिक परिसरात प्रत्यक्ष बदल घडवण्याची संधी मिळते, त्यासाठी त्यांना प्रमाणपत्र आणि विशेष गुणही मिळतात,' असं जिया सांगते. गेल्या सप्टेंबरमध्ये जियाला नेपाळमध्ये युनिसेफ आरओएसए (दक्षिण आशिया प्रादेशिक कार्यालय) च्या यूथ अॅडव्होकेसी चॅम्पियन ट्रेनिंगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. '१९ वर्षी मला या स्तरावर काम करण्याची संधी मिळेल, याची मी स्वप्नातही मुक्त पत्रकार कल्पना केली नव्हती.' ती म्हणते. ८ देशांतील ५० पेक्षा अधिक युवा कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव जियाला समृद्ध करून गेला.
'हवामान बदलामुळे आपलं आरोग्य, अन्नसुरक्षा, पाणी उपलब्धता आणि समाजावर खोलवर परिणाम होत आहेत,' हे शालेय प्रकल्पातून तिला समजलं. या जिज्ञासेचं आता पर्यावरण कार्यकर्ता होण्यात रूपांतर झालं आहे. 'हवामानबदल हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून एक सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे आणि वंचित समुदायावर त्याचा जास्त विपरीत परिणाम होतो आहे,' असं ती म्हणते. 'आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकलो, तर आपल्या समुदायातही आपण तोच बदल घडवून आणू शकतो.' असा तिचा विश्वास आहे. 'युवा कार्यकर्त्यांना मला समाजाच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यायची आहे आणि आपले पर्यावरणीय कार्यक्रम अधिक स्पष्ट आणि नावीन्यपूर्ण बनवायचे आहेत,' असं जिया म्हणते.
सावनेर येथील अनाठायी पाणीवापरामुळे व्यथित झालेला यश भोंगडे या कामाकडे वळला. यशने रेवनाथ चौरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि स्थानिक नागरिकांना शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूक बनवलं आहे. यशच्या नेतृत्वाखाली ग्रीन क्लबने आरसीसी महाविद्यालयाला पर्यावरणपूरक कॅम्पसमध्ये रूपांतरित करण्याचं काम केलं आहे. पर्यावरणीय आव्हानांवरील चर्चासत्रांपासून जलपरीक्षणापर्यंत, कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी क्लबने विविध उपक्रम हाती घेतले.
'प्रत्येक व्यक्तीचा निर्णय महत्त्वाचा आहे,' हे पटवून देण्यासाठी यश प्रयत्नशील आहे. हवामान बदलाचा सामना दैनंदिन जीवनात ऊर्जाबचत, करण्यासाठ कचऱ्याच् वर्गीकरण व कमीकरण सार्वजनिक वाहतूव वापरणं यांसारख्य पर्यायांना प्रोत्साह दिल्याने स्थानिव स्तरावर फरक पडेल लहान मुलांना पर्यावरणसंवर्धक प्रत्यक्ष कृतीत सहभाग केल्याने शाश्वत निवडींना प्राधान्य देणारी पिढी तया होईल,' असे यश मानतो.
पुण्यात वाढलेल्या अफरोजने श्रीगोंद्यात आल्यानंत पाणी, वीज आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा यांच कमतरता पाहिल्यावर तिला ग्रामीण भागातील पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व कळलं.
अफरोजच्या प्रेरणेने लोकांनी प्रदूषणमुक्त दिवाळ साजरी केली, तसंच पाणी संवर्धनाचं लेखापरीक्षण आणि पर्यावरणासाठी जनजागृती रॅलीजही आयोजित केल्य अफरोजने मार्च महिन्यात 'द्रव्यांश २०२४' हा जलसंवर्ध उपक्रम घेतला. यामुळे अनेकांना जलसंवर्धनाच्या सवयं लागल्या. पर्यावरण संवर्धनाबद्दल असलेल्या ठाग विश्वासातून तिचं काम सतत वाढत आहे.