‘फेक न्यूज’ची फेकाफेकी..

By सचिन जवळकोटे | Published: April 5, 2018 12:14 AM2018-04-05T00:14:13+5:302018-04-05T00:14:13+5:30

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती.

 Fake News | ‘फेक न्यूज’ची फेकाफेकी..

‘फेक न्यूज’ची फेकाफेकी..

googlenewsNext

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती. कितीवेळा मंगळावरचे धोकादायक किरण शनी ग्रहामार्गे चंद्रावर परावर्तित होऊन पृथ्वीतलावर आणलेले, हेही त्यांना आठवत नव्हतं. मात्र, अंटार्क्टिकेचा बर्फ आटपाडीच्या माळरानावर टाकून त्यांनी माणदेशाला थेट अटलांटिका खंडावर वसविलेलं, एवढंच आठवत होतं.
काल ‘फेक न्यूज कारवाई’चा इराणी आदेश निघताच या चौकडीची थोडीशी तंतरलेली. ‘मात्र, मुळात आपण अधिस्वीकृत नाही. पत्रकार म्हणून तर समाजाकडूनही स्वीकृत नाही,’ असं स्वत:च्या मनाला समजावत त्यांनी या घोषणेकडं दुर्लक्ष केलेलं.
असो. सकाळी-सकाळी माहिती अन् प्रसारण खात्याकडनं त्यांना एक धक्कादायक मेसेज येताच चौघेही ताडकन् उडाले. ‘आजपर्यंत आपण सोशल मीडियावर केलेली सत्य पत्रकारिता पाहता आपल्याला ‘सच न्यूज’ पुरस्कार देण्यात येतोय,’ अशा आशयाचा मजकूर वाचताच चौघेही गोंधळले. आपण खऱ्या बातम्या कधी दिल्या, या विचारात त्यांनी ‘स्मृती’लाही ताण दिला. मात्र, काहीच आठवत नव्हतं.
तेव्हा चौघेही तत्काळ नेहमीच्या कॉर्नरवरील कॅन्टीनच्या अड्ड्यावर जमले. आजपावेतो आपण कोणती खरीखुरी बातमी दिली, याची चर्चा करू लागले. सर्वप्रथम पिंट्या म्हणाला, ‘मी तर गेल्या आठवड्यात एकच न्यूज अपलोड केलेली यारऽऽ.. केवळ व्यंगचित्रातून अन् सभेतूनच आग ओकणारे ‘राज’ आता प्रत्यक्षात कामाला लागणार. महाराष्ट्राची जुनीपुराणी ब्ल्यू प्रिंट ‘अपडेट’ करून फेसबुकवर ‘अपलोड’ करणार, या माझ्या पोस्टला बाराशे लाईक अन् अडीचशे कमेंटस् पडल्या रेऽऽ.’
गण्याही बोलू लागला, ‘थोरले काका बारामतीकर म्हणं यापुढं भावकी-भावकीत भांडणं न लावता एकीचं राजकारण करणार.. ही माझी पोस्ट सातारा, माण अन् अकलूजमंदी तर लई गर ऽऽ गर फिरली बग लगाऽऽ’
बंड्या आपला किस्सा सांगू लागला, ‘आगामी अधिवेशनाची तारीख उद्धो फॉरेनहून आल्यानंतरच ठरणार. त्यामुळं सरकार मजबूत होणार. वैयक्तिक कामासाठीच्या भेटीनंतर मातोश्रीवरची भूमिका बदलली, अशी न्यूज मी फिरविताच घाटकोपरपेक्षा दादरमध्ये जास्त आनंद झाला.’
चिंट्यानं मात्र शेवटचा बॉम्ब टाकला, ‘मी मात्र ‘नमो’ची पोस्ट टाकली होती बुवाऽऽ. त्यांचे सर्व सहकारी पुढील वर्षभर मौनव्रत धारण करणार असून, एकहीजण आपली भलती-सलती भूमिका जाहीर करणार नाही. सोशल मीडियावरील माझ्या या विरोधी पोस्टला त्यांच्या भक्तांनीही टार्गेट न करता उलट लोकशाहीतील मतांचा आदर केला,’
हे सारं ऐकताच चौघांचंही एकमत झालं की आपण सोडलेलं पिल्लू कदाचित खरं वाटलं म्हणून की काय हा पुरस्कार दिला जातोय; पण हाय.. चौघांच्याही मोबाईलवर अकस्मातपणे ‘नमो’ आॅफिसमधून नवा मेसेज धडकला, ‘स्मृतीबार्इंकडून आलेला संदेश म्हणजे ‘फेक न्यूज’ होती बरं काऽऽ.’
 

Web Title:  Fake News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.