पितृपक्ष...मातृपक्ष !
By सचिन जवळकोटे | Published: September 27, 2019 12:25 PM2019-09-27T12:25:36+5:302019-09-27T12:25:57+5:30
दे धक्का
- सचिन जवळकोटे
अखिल भारतीय मूषक महासंघाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिवेशन भरलेलं. आजकाल गल्लीतल्या कॉलेजच्या वर्गातही जशी राष्ट्रीय परिषद भरविली जाते, तसाच काहीसा हा प्रकार. अकरा दिवसांची मंडपातली ड्यूटी संपवून ह्यबाप्पाह्ण गावी गेल्यामुळं हे सारे उंदीर बांधवही सध्या निवांतच होते. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात आयाराम-गयारामांची वर्दळ वाढल्यानंतर ह्यउंदरांची नाहक बदनामीह्ण सुरू झाल्याचा साक्षात्कार एकाला झालेला. त्यापायी त्यानं पुढाकार घेऊन हे तातडीचं अधिवेशन बोलाविलेलं. दिव्याची वात कुरतडून उद्घाटन सोहळा संपन्न जाहला. संयोजक उंदरानं प्रास्ताविक सुरू केलं, ह्यमूषक बांधवहोऽऽऽ मराठी माणसाच्या घरात वर्षभर आपल्याला झाडूखाली चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र भाद्रपद महिन्यात हीच मंडळी कौतुकानं आपली पूजा करतात. अकरा दिवस आपल्याला नैवेद्यही देतात. तरीही आपल्या जातभाइंर्ची बदनामी करण्याची मोहीम सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू झालीय. धरणं अन् कालव्यातली माती भुसभुशीत करणारे वेगळेच, मात्र त्याचं खापरही आपल्याच डोक्यावर फोडलं जातंय. जहाजातून उड्या मारणाºया उंदरांशी राजकारणातल्या गयारामांचा संबंध जोडून आपल्या भावना नाहक दुखावल्या जाताहेत. तेव्हा आजच्या अधिवेशनात एकमुखानं याचा निषेध करू याऽऽऽ. मग काय, चिऽचीऽऽऽ आवाज करत निषेध नोंदविला गेला. अधिवेशनाचे अध्यक्ष ह्यप्रथम उडीमारे बोलायला उभारले, ह्यजहाजात खालच्या बाजूला आपण बिळं तयार करून ठेवली होती म्हणूनच जहाज बुडू लागलेलं. तेव्हा अधिक बिळं तयार होऊ नयेत म्हणून उंदरांनी जहाज वाचविण्यासाठीच स्वत:चं भवितव्य धोक्यात घातलेलं. खरंतर बुडत्या जहाजातून उडी मारणाºया उंदरांची ही कृती स्वार्थीपणाची नसून उलट त्यागाचंच प्रतीक आहे. ज्याचा तळ आजपावेतो भल्या-भल्यांना समजलेला नाही, अशा अथांग लोटस्ह्ण समुद्रात उडी घेणाºया उंदरांचा उलट गौरवच व्हायला हवा, तीनशे रुपये देऊन सभेत बसविलेल्या भाडोत्री कार्यकर्त्यांकडूनही पडल्या नसतील एवढ्या जोरात टाळ्या वाजल्या.
सकाळच्या सत्रानंतर दुपारच्या भोजनाचा सोहळा रंगला. काही सिनियर उंदरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली. कारण, जहाजातून उडी मारण्याच्या क्रांतिकारी चळवळीतले ते आद्य पुरुष होते. पुढं काय होणार हे त्यांना इतर बांधवांपेक्षा खूप अगोदर लक्षात येत असतं म्हणे.. म्हणूनच लोकसभावेळी यांनी आपली अदाकारी दाखविलेली. पलीकडं बसलेले दोन गलेलठ्ठ उंदीर कुजबूजत होते, शेतकºयांची साखर खाऊन पोट भलतंच टम्म झालंय बुवा आपलं. आता इकडून-तिकडं उड्या मारायला बायकोनंच सांगितलंय, असं एक जण म्हणताच दुसरा पुटपुटला, ह्यईडीची कागदं चघळल्यानं मलाही कळ लागलेली. तेव्हा कमळाच्या पाकळ्या हुंगण्याचा सल्ला माज्या मित्रांनी दिलाय. एवढ्यात पंगतीतल्या काही उंदरांचं ताट रिकामंच राहिल्याची चर्चा सुरू झाली.
मुंबईच्या वर्षा बंगल्यावर हेलपाटे मारून-मारून थकलेल्या या उंदरांनी एकमेकांकडं मोठ्या केविलवाणेपणाने पाहिलं. गेल्या एक महिन्यापासून आपल्याला विनाकारण खेळवलं जातंय, असंं त्यांना वाटू लागलेला भ्रम आता पक्क्या खात्रीत परावर्तीत झालेला. सा-यांच्याच ताटात तुकडे फेकले गेलेत. मग आपणच उपाशी का? असं एकानं विचारताच दुसरा हळूच कानात कुजबुजला, पितृपक्ष सुरू आहे ना. आपल्या वाट्याचं म्हणे अगोदर कावळ्यांना देणार. तिथं शिल्लक राहिलं तर आपल्याला मिळणार ! हे ऐकताच या अतृप्त उंदरांची चुळबुळ सुरू झाली. ह्यएवढा घातक असेल पितृपक्ष, तर परवडला आपला जुनाच मातृपक्ष, म्हणत पुन्हा आपल्या घरी परतण्याची काही जणांनी तयारी सुरू केली. जय उंदीरऽऽ जय उडीमारे !
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)