साऱ्यांचे पाय मातीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 05:29 AM2018-06-28T05:29:33+5:302018-06-28T05:29:54+5:30

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून इशारे दिले जातात. दरडप्रवण वस्त्यांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सुचवले जाते

The feet of stairs are covered with clay | साऱ्यांचे पाय मातीचे

साऱ्यांचे पाय मातीचे

Next

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून इशारे दिले जातात. दरडप्रवण वस्त्यांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सुचवले जाते. पण यापुढील काळात मुंबईतील टेकड्या, भराव टाकून केलेले भूभाग, पाणथळ जागा, समुद्रकिनाºयांलगतच्या उच्चभ्रू वस्त्यांनाही असेच इशारे द्यावे लागतील की काय, अशी शक्यता वडाळ्यातील घटनेमुळे निर्माण झाली आहे. शेजारच्या बांधकामाचे हादरे आणि खोल कामाच्या खड्ड्यांमुळे बाजूच्या भूखंडाचा भार सहन करू शकेल, अशी यंत्रणा न उभारल्याने लॉइड इस्टेट रिकामे करण्याची वेळ रहिवाशांवर आली. मुंबईतील अनधिकृत इमारतीत घरे घेतल्याने लाखांचे बारा हजार करण्याची वेळ अनेकांवर आली. आता अशा प्रकारे जमिनीचा भार सहन करण्याची ताकद न तपासता जागोजाग उभारल्या जाणाºया टॉवरमुळे भविष्यात कोट्यवधींची घरे घेतलेल्यांवरही याचप्रकारे क्षणात मातीमोल होण्याची वेळ येणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वडाळ्यात कोसळलेला मातीचा ढिगारा, त्यात गाडलेल्या गाड्या, चिखलाखाली बेपत्ता झालेला आजूबाजूचा परिसर यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला, तो यामुळेच. समुद्राने वेढलेल्या मुंबईची भौगोलिक रचना, तेथे निचरा न होणाºया पाण्यामुळे जमिनीची भार सहन करण्याची क्षमता परिसरनिहाय कमी-जास्त आहे. ज्या पद्धतीने मुंबई गगनचुंबी होते आहे, ते पाहता भविष्यात येथील अभियांत्रिकीला भू-तांत्रिक अभ्यासाची जोड द्यावी लागणार आहे. अशा क्षेत्रात बांधकाम करताना त्याचा जमिनीच्या भार सहन करण्याच्या क्षमतेवर किती आणि कसा परिणाम होणार आहे, हे पालिकेला स्वतंत्रपणे तपासून घ्यावे लागेल. तसेच भोवताली नव्याने खोदकाम करताना हादरे सहन करण्याची त्या जमिनीची क्षमता आहे की नाही, हेही पाहावे लागेल. वडाळ्यात खोदकामामुळे जमिनीचा मोठा भाग सरकला आणि त्याचा तडाखा उंचावरील गृहसंकुलाच्या पार्किंग क्षेत्राला बसला; पण तोच जर इमारतींना बसला असता, तर अनावस्था प्रसंग उद््भवला असता. तेथील रहिवाशांनी या हादºयांची, खोदकामाची तक्रार करूनही पालिकेच्या अधिकाºयांनी त्याची दखल घेतली नसल्याचे आरोप सुरू आहेत.त्यात तथ्य असेल, तर पुन्हा बिल्डर आणि पालिका अधिकाºयांच्या अभद्र युतीवर हे प्रकरण येऊन थांबते. त्याची यथावकाश चौकशी होईल. अहवाल येतील. प्रसंगी कारवाईही होईल. पण यातून गगनचुंबी मुंबईसमोरील भुसभुशीत होणाºया पायाचे आव्हान किती मोठे आहे, याची जाणीव या घटनेमुुळे झाली. हे या महानगरीवरील संकट नव्हे; तर नव्या काळाचे, बदलत्या मुंबईचे आणखी एक आव्हान आहे, असे समजून त्यावर उपाय योजण्याची गरज आहे.

Web Title: The feet of stairs are covered with clay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.