लढा कचरामुक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:28 AM2018-04-10T00:28:14+5:302018-04-10T00:28:14+5:30

औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला.

Fight waste | लढा कचरामुक्तीचा

लढा कचरामुक्तीचा

Next

मराठवाड्यातील औरंगाबादेत गेल्या पंधरवड्यात कचऱ्यावरून जे युद्ध पेटले ते सा-यांनीच बघितले. औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला. एवढी वर्षे त्यांच्या सहनशीलतेची अक्षरश: परीक्षा घेण्यात आली. गावकºयांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज स्थानिक प्रशासनाला वाटली नाही. कायम वेळकाढू धोरण राबविण्यात आले. त्यामुळे स्फोट होणारच होता. हा सारा पंक्तीप्रपंच यासाठी कारण नागपूर शहराचा कचरा ज्या भांडेवाडीत जमा होतो तेथील परिस्थितीही अशीच बिकट होत चालली आहे आणि प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांचे फुगे न सोडता यावर त्वरित ठोस उपाययोजना केली नाहीतर या परिसरातील लोकांच्या भावनांचाही उद्रेक होऊ शकतो. भांडेवाडीतील लोक कित्येक वर्षांपासून नागपूरचा कचरा सहन करीत आहेत. नागपूर शहराच्या विस्तारासोबतच येथे निघणारा कचराही प्रचंड वाढला आहे. दररोज अंदाजे १२०० मेट्रिक टन एवढा कचरा निघतो, आणि हा संपूर्ण कचरा एकमेव अशा भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये टाकला जातो. परिणामी या भागातील प्रदूषण वाढले असून तेथील नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. हे डम्पिंग यार्ड हटविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनेही केली. पण कचºयाचा प्रश्न काही सुटला नाही. कचरा वाढल्यावर येथे एक प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला होता. पण तोही आता बंद पडला आहे. हा प्रकल्प तातडीने सुरू व्हावा असे कुणाला वाटले नाही. औरंगाबादेत कचºयानंतर भांडेवाडीचा कचराही उचलून धरण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी या परिसराला भेट देऊन डम्पिंग यार्डमधील कचºयाची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या आहेत खºया. आता संबंधित अधिकारी त्या किती तत्परतेने अमलात आणतात, ते बघायचे. हा डम्पिंग यार्ड गावठाणापासून १०० मीटर दूर न्यावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. पण याने हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. कारण ज्या वेगाने शहराचा विस्तार होत आहे तो बघता भविष्यात पुन्हा हीच समस्या निर्माण होईल. कचºयापासून मुक्ती मिळविण्यासाठी एकतर आपल्याला गोव्याच्या साळीगाव कचराभूमीप्रमाणे व्यवस्थापन करावे लागेल. अन्यथा संपूर्ण कचरा एकाच ठिकाणी गोळा न करता प्रत्येक वॉर्डाची स्वतंत्र कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारावी लागेल. ज्या वॉर्डाचा कचरा असेल तेथेच त्याचा निस्तरा होईल, आणि हे लवकरात लवकर करावे लागेल अन्यथा कचºयासाठीचा हा लढा तीव्र होऊ शकतो.

Web Title: Fight waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.