फोर्थ इडियट राज...

By राजा माने | Published: January 29, 2018 12:31 AM2018-01-29T00:31:25+5:302018-01-29T00:31:34+5:30

स्वर्गलोकी विश्व व्यंगचित्रकार संघटनेचे सर्व सदस्य ‘थ्री इडियट’ हा सिनेमा एन्जॉय करत होते. एवढ्यात ‘स्वर्गलोक व्यंगचित्रकार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’वर नारदांचा मेसेज पडला. तो फक्त पिलईनीच पाहिला आणि ते चक्क ओरडलेच ‘अवर जिनिअस... फोर्थ इडियट....’ सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.

 Fourth Idiot Raj ... | फोर्थ इडियट राज...

फोर्थ इडियट राज...

Next

स्वर्गलोकी विश्व व्यंगचित्रकार संघटनेचे सर्व सदस्य ‘थ्री इडियट’ हा सिनेमा एन्जॉय करत होते. एवढ्यात ‘स्वर्गलोक व्यंगचित्रकार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’वर नारदांचा मेसेज पडला. तो फक्त पिलईनीच पाहिला आणि ते चक्क ओरडलेच ‘अवर जिनिअस... फोर्थ इडियट....’ सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांचे पाहून सर्वांनीच आपल्या मोबाईलवर मेसेज पाहिला आणि सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. कळीच्या नारदांनी केलेली काडी यशस्वी झाली होती. ‘परत सांगतो, सोडून जाईन’ हे राज ठाकरे यांचे व्यंगचित्र नारदांनी ग्रुपवर टाकले होते. आपला जिनिअस आपलं क्षेत्र सोडून राजकारण क्षेत्रात गेलाच कसा? हाती कुंचला घेण्याऐवजी फाळकुटे घेऊन फेरीवाल्यांच्या मागे लाग, टोलवाल्यांची टाळकी फोड, रेल्वेची इंजिनं घासत बस... खळ्ळ्खट्टाक करीत नकलाही करतोय! बुद्धी आणि करिअर वाटपात इंद्रदेवांकडून घोटाळा झालाच कसा? असा सूर सर्वांमध्ये उमटला. सिनेमा बंद करून याच विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय झाला. आमचा जिनिअस आम्हाला द्या, ही मागणी इंद्रदेवांकडे करण्याचे एकमताने ठरले. इंद्रदेवांच्या नावे तसे निवेदन तयार करण्यात आले. संघटनेचे संस्थापक लिओनार्दो, बेनीनीपासून ते थेट शंकर पिलई, आर. के. लक्ष्मण, मंगेश तेंडुलकरांपर्यंतच्या अनेक व्यंगचित्रकारांच्या सह्या निवेदनावर घेण्यात आल्या. व्यंगचित्रकार बाळासाहेबांनी मात्र सही मागायला गेलेल्या पदाधिकाºयांना सही न देताच माघारी धाडले. ही वार्ता समजताच नारदांनी मराठी भूमीवरील इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर येमकेला मोबाईल केला. नारदांचा आनंदी मूड लक्षात आल्याने आता आपल्यावर काहीतरी बालंट येणार या चिंतेतच येमके नारदांचे बोलणे ऐकत होता. इंद्रदेवांनी संघटनेचे निवेदन पाहून अपेक्षेप्रमाणे त्यांनी ब्रह्मदेवाशी संपर्क साधला. ‘सार्वजनिक पृथ्वीलोक बुद्धी व करिअर वितरण खाते’ त्यांच्याकडे असल्याने हा तिढा सोडवण्याची जबाबदारी त्यांचीच होती. हा विषय दरबारातच मांडण्याची गळ ब्रह्मदेवांनी घातली. इंद्रदेवांनी मराठी भूमीतील कोणालाच दरबारात पाचारण केले नाही. येमकेला मात्र नारदांसोबत हजर राहण्याचे फर्मान काढले. ब्रह्मदेवांच्या मागणीनुसार दरबार भरला.
इंद्रदेव : ब्रह्मदेवा, स्वर्गलोकातील व्यंगचित्रकार संघटनेच्या मागणीचे काय करायचे?
ब्रह्मदेव : देवा, बुद्धी व करिअर वितरण करताना राज ठाकरे या वत्सास ‘जिनिअस पोलिटिकल व्यंगचित्रकार’ याच हेडखाली मी वितरण केले होते. प्रत्यक्षात आॅर्डर निघताना जिनिअस, पोलिटिकल आणि व्यंगचित्रकार या सर्वच शब्दांमध्ये ‘स्वल्पविराम’ टाकण्याची चूक चित्रगुप्तांकडून घडली...
इंद्रदेव : मग आता चूक दुरुस्त कशी करायची? राज आपण ‘जिनिअस पोलिटिकल व्यंगचित्रकार’ असल्याचे विसरून इंजिनाचे डब्बेच घासण्यात वेळ दवडत आहेत...
ब्रह्मदेव : देवा, चित्रगुप्तांकडून अशा चुका यापूर्वीही घडलेल्या आहेत. पण त्यातून फळे मात्र चांगली निष्पन्न झाली होती. अनेक कलाक्षेत्राच्या बाबतीत तसे घडले. एम. जी. रामचंद्रन, जयललितापासून बाळासाहेब ठाकरेपर्यंतची उदाहरणे आहेत देवा!
इंद्रदेव : मग आता ‘फोर्थ इडियट’ राजला सिनेमे पाहणे अन् खळ्ळ्खट्टाक एवढाच वेळ कुंचल्यासाठी द्यायला सांगा.
 

Web Title:  Fourth Idiot Raj ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.