मित्रों... ‘मेरे पास पैसा है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:08 AM2018-05-26T00:08:03+5:302018-05-26T00:08:03+5:30

बंगळुरूत एवढ्या मोठ्या संख्येत देशातील बहुतांश बड्या नेत्यांचा मेळा बघून दिल्ली दरबाराला मोठा हादरा बसला.

Friends ... 'I have money' | मित्रों... ‘मेरे पास पैसा है’

मित्रों... ‘मेरे पास पैसा है’

Next

- दिलीप तिखिले

बंगळुरूत एवढ्या मोठ्या संख्येत देशातील बहुतांश बड्या नेत्यांचा मेळा बघून दिल्ली दरबाराला मोठा हादरा बसला. ५६ इंची छाती तर दडपलीच. बरं हे सगळे नेते केवळ ३७ आमदारांच्या भरोश्यावर मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागलेले कुमारस्वामी यांच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी नक्कीच आले नव्हते. अशा सोहळ्याचे औपचारिक आमंत्रण तसे सर्वांनाच जाते. भाजपालाही ते गेले होतेच. अशावेळी आमंत्रित मंडळींचाही ‘जमले तर बघू, जाऊ ’ असाच सूर असतो. पण यावेळी सर्वजण कसे जमवून आले आणि विशेष म्हणजे एका सुरात वागले, याचाच धक्का भाजपा हायकमांडला जास्त बसला. त्यातल्या त्यात महाराष्टÑ नरेश देवेंद्रबाबू खूष होते. मातोश्रीवर निमंत्रण जाऊनही उद्धवजी बंगळुरूला गेले नाहीत. मात्र गेल्या चार वर्षात एकापाठोपाठ २१ राज्यांत सत्तेत येणाऱ्या नमोंना कर्नाटकातील हा धक्का असहनीय होता.
नेमके चुकलंय काय? आपल्याच माणसांनी घात तर केला नाही ना...?
नमोंनी मग थेट अमितभार्इंनाच मेमो दिला.
(कारण कर्नाटकात तोडफोडीचे संपूर्ण कंत्राट अमितभार्इंनाच देण्यात आले होते.)
अमितभार्इंच्या वतीने त्यांच्या पीएचे खुलासावजा पत्र आले.
पत्रात म्हटले होते...!
अमितभाई अजून शॉकमध्येच आहेत. ‘पीयूषजी...गडबड...’ असे काहीतरी अधूनमधून बडबडतात.
काय गडबड आहे हे जाणून घेण्यासाठी मग पीयूषजींना मेमो गेला.
पीयूषजी नमोंपुढे हजर...
नमो : क्या पीयूषजी... कहा गडबड हुयी!
पीयूषजी : कुठे गडबड झाली माहीत नाही... मी तर पूर्ण सेटिंग केली होती. गौडाजींना भेटून त्यांच्या दोन्ही पोरांना जॉब आॅफर केला. एकाला कर्नाटकात उपमुख्यमंत्रिपद आणि दुसºयाला केंद्रात मंत्रिपद.
नमो : उपमुख्यमंत्रिपद का...? डायरेक्ट मुख्यमंत्री करण्याचेच गाजर दाखवायचे होते ना!
पीयूषजी : सर...पण आपले १०४ असताना...
...मी ‘गाजर’ म्हणालो...त्यांना पुढं बोलू न देता नमो म्हणाले, ‘गाजर’ का मतलब समजते हो!...नही समझोगे... जाने दो..! बरं आणखी काय केले?
पीयूषजी : आणखी काही नाही...(मग काहीतरी आठवून) आणि हो! आम्ही काँगे्रसच्या काही आमदारांच्याही संपर्कात होतो. त्यांनाही लक्ष्मीदर्शनाचे आमिष दिले.
नमो : बस्स...! येथेच चुकलं
ुपीयूषजी : (आश्चर्याने) म्हणजे...?
नमो : अरे... तुम्ही एकाच वेळी दोन्ही डफलीवर हात ठेवला. ही कला सर्वांनाच साधते असे नाही. सवडीने या! मी तुम्हाला शिकवीन.
ओके, म्हणून पीयूषजी जायला निघाले तोच नमो धीर देत म्हणाले...,
डरने की कोई बात नाही. उनके पास नेता लोग है, तो हमारे पास पैसा है. और इलेक्शन जितने के लिये नेतालोग नही पैसा जरुरी होता है. जा..१९ च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा.
नमोंच्या या भाषणाने पीयूषजी कितपत आश्वस्त झाले माहीत नाही पण ‘हमारे पास पैसा है!’च्या त्यांच्या दर्पोक्तीत नक्कीच दम होता.
काँग्रेसने नेत्यांची जत्रा तर भरविली पण निवडणुकीसाठी पैसा कुठून आणणार? सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचे नाही. १४ च्या निवडणुकीत वाताहत काय झाली. लक्ष्मीनेही पाठ फिरविली. परवाच जाहीर झालेल्या एका आकडेवारीनुसार २०१७ च्या अखेरीस भाजपाकडे तब्बल १०३४ कोटी रुपये होते तर काँगे्रसकडे अवघे २२५ कोटी.
बिच्चारी...! गरीब काँग्रेस

Web Title: Friends ... 'I have money'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.