पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, चांगला भाव मिळू दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:01 AM2018-04-25T00:01:44+5:302018-04-25T00:01:44+5:30

पाऊस चांगला पडला की शेतमालाचे उत्पादन अमाप होते. पण बाजारभाव मात्र कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. उत्पन्न वाढले तर कुटुंब जगवण्यासाठीची वर्षभराची अन्नाची गरज भागते एवढेच.

Give rain, give riches, give good prices! | पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, चांगला भाव मिळू दे!

पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, चांगला भाव मिळू दे!

googlenewsNext

बाळासाहेब बोचरे|

वैशाख वणव्यात दारोदार फिरणारे गुबुगुबु नंदीवाले असोत की गावोगावच्या यात्रांमधील भाकणूक असो, आगामी वर्षात पाऊस कसा असेल याबाबत भाबड्या बळीराजाची उत्सुकता ताणलेली असते. भारतीय हवामान खात्याचे अंदाज असोत वा भाकणूक किंवा नंदीवाले यांनी पाऊस चांगला पडेल असे भाकीत केले की त्याच आनंदात शेतकरी वैशाखाच्या झळा सहन करतो. पाऊस चांगला पडला तर शेतमालाचे उत्पादन अमाप होते. मात्र बाजारभाव कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकºयांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. यंदा मान्सून ९६ ते १०४ टक्के बरसणार आणि शेती उत्पादनात ०.९ टक्के वाढ होणार हे अनुमान देशासाठी भलेही सुखद असेल पण शेतकºयांसाठी सुखद असेलच असे म्हणता येणार नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ झाली. पण शेतकºयांच्या हाती काय पडले याचा विचार करण्याची गरज आहे. सरकारने हमी भाव जाहीर केले पण खुद्द सरकारलाच हमी भावाने शेतमाल खरेदी करणे जिकिरीचे झाले आहे. तूर खरेदी बंद केली. खरेदी केलेली तूर गोदामात पडून आहे. आता हरभरा खरेदी सुरू आहे. साखरेचे भाव कोसळत आहेत. दुधाचे भाव पाण्यापेक्षा कमी आहेत.
अन्नधान्य ही वाढत्या लोकसंख्येची वाढती गरज असताना लोकसंख्येची गती अािण अन्नधान्य उत्पादनाची गती यात फार मोठी तफावत आहे. २७५ दशलक्ष टन अन्नधान्याची निर्मिती करणाºया आपल्या देशाला येत्या ३० वर्षात किमान ३० दशलक्ष टनाची वाढ करावी लागणार आहे. हे केवळ आणि केवळ आपल्या बळीराजाच्याच हातात आहे. देशाच्या गरजेच्या प्रमाणात उत्पादन कमी असले तरी अन्नधान्याच्या किमती का वाढत नाहीत आणि श्ोतकºयाला योग्य भाव का मिळत नाही हे गणित शेतकºयांना कधीच कळू शकले नाही. हवामान खात्याचे अंदाज, प्रत्यक्ष पडणारा पाऊस, अन्नधान्य उत्पानाचा अंदाज आणि प्रत्यक्ष झालेले उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव याचा सरकारला कधी मेळच बसलेला नाही. अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला की भाव गगनाला भिडतात. सर्वसामान्यांची ओरड होते. म्हणून अन्नधान्याची आयात केली जाते. यात शेतकºयांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकºयाची तरुण मुले शेतीमध्ये काम करण्याऐवजी कारखान्यात नोकरी शोधत आहेत. वास्तविक शेतीमध्येच प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. शेतमजूर म्हणून जगण्याऐवजी शेतकरी म्हणून जगण्यासाठी तरुण वर्ग तयार आहे. पण वर्षभर राबल्यानंतर हातात काहीच शिल्लक राहणार नसेल तर अशा तरुण शेतकºयांच्या पदरी वैफल्याशिवाय काहीच पडत नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने २७५ दशलक्ष टन शेतमालाचे उत्पादन होईल असा अंदाज होता. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन २७७ दशलक्ष टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. तेव्हा आजच सरकारने या उत्पादनाचे काय करायचे याची तजवीज केली पाहिजे. वाढत्या उत्पादनाचा वरचेवर आढावा घेऊन पाऊस आणि वाढलेल्या उत्पादनाचा शेतकºयांना कसा फायदा होईल ते पहावे. शिवाय सलग दोन वर्षे चांगला झालेला पाऊस साठवून ठेवला तर पुढची काही वर्षे दुष्काळाच्या झळा कमी होण्यास मतदगार होतात हेही लक्षात घेऊन पाणी जिरवण्याची व साठवण्याची मोहीम गतिमान केली पाहिजे.

Web Title: Give rain, give riches, give good prices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी