गुरु विचार बदलतो

By admin | Published: September 20, 2016 05:37 AM2016-09-20T05:37:12+5:302016-09-20T05:37:12+5:30

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरूशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही.

The guru changes the way | गुरु विचार बदलतो

गुरु विचार बदलतो

Next


भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरूशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही. याच कारणामुळे परमात्म्याला गुरूची उपाधी दिलीे आहे.
‘गुरु: साक्षात परबह्म’।
शास्त्रात अनेक प्रकारच्या गुरूंचे वर्णन आले आहे. परंतु श्रेष्ठ गुरू तोच, जो आत्मसाक्षात्कार किंवा संपूर्ण सत्याचे दर्शन घडवतो. म्हणूनच भक्त कबीर आपल्या गुरूसाठी शिर देण्यास सुध्दा तयार झाला.
यह तन विष की वल्लरी,
गुरु अमृत की खान ।
शीश दिए जो गुरु मिले,
तब भी सस्ता जान ।।
गुरू आमच्यासाठी हे जगच बदलत नाहीत, तर आम्हालाच बदलून टाकतात. म्हणजेच आमचे विचार बदलतात. भारतीय परंपरेत परमेश्वर आपल्यातच वास करत असल्याचे मानले जाते. भक्त कबीर म्हणतात,
मोको कहाँ ढुंढोरे बंदे,
मैतो तेरे पास में ।
ना मंदिर में, ना मस्जिद में,
ना काबा कैलास में ।।
परमेश्वर आमच्यातच वास करतो, परंतु आम्ही त्याला ओळखू शकत नाही. गुरू आम्हाला परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सांगतात आणि आमच्यातील सुप्त अशा दिव्य शक्ती प्रकट करतात. आमच्यातील या सुप्त दिव्य शक्ती जेव्हा प्रकट होतात, तेव्हा सजीव व जग सृष्टी यांच्याबाबत असणारे आमचे विचार संपूर्णपणे बदलतात. त्यावेळी आम्हास वाटते की, आम्ही त्या अखंड सत्याशी जोडले गेलो आहोत आणि आम्हाला एकातच सर्व किंवा सर्वांमध्ये एक असल्याचा साक्षात्कार होतो.
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णानी परिस्थिती बदलली नाही, तर अर्जुनाचे विचार बदलले. जो अर्जुन हताश होऊन कर्तव्यापासून दूर पळत होता, तोच अर्जुन पूर्ण विश्वास आणि ताकदीने कर्तव्याशी जोडला गेला.
‘दिव्यं ददामि ते चक्षु:’
अर्थात मी तुम्हाला दिव्य दृष्टी देतो. भगवान श्रीकृष्णाचे हे वचन गुरूद्वारा शिष्यामधील सुप्त शक्तीचा प्रत्यय घडवते.
यासाठीच धन-दौलत, पुत्रादिकाचा लोभ उत्पन्न करणारा शिष्य घडवणाऱ्या गुरूला भारतीय परंपरेत स्थान नाही. गुरू आपल्याला अखंड व शाश्वत परमानंद देतो.
-डॉ. भूषणकुमार उपाध्याय

Web Title: The guru changes the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.