तापमानाच्या वाढीमुळे आले गारपीट संकट!

By admin | Published: December 21, 2014 12:19 AM2014-12-21T00:19:50+5:302014-12-21T00:19:50+5:30

गतवर्षीचा उन्हाळा हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला. सप्टेंबर २०१३ सालापासून दक्षिण गोलार्ध भाजून निघाला.

Hailstorm hazard due to the rise in temperature! | तापमानाच्या वाढीमुळे आले गारपीट संकट!

तापमानाच्या वाढीमुळे आले गारपीट संकट!

Next

गतवर्षीचा उन्हाळा हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला. सप्टेंबर २०१३ सालापासून दक्षिण गोलार्ध भाजून निघाला. अर्जेंटिना आणि आॅस्टे्रलियात काही ठिकाणी तापमान ५५ अंशावर पोहोचले. वर्षभरात वादळ, हिमवृष्टी, अवर्षण, अतिवृष्टी, हिमनग कोसळणे, हिमनद्या वितळणे इत्यादी घटना घडल्या. यामुळे वर्षभरात पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ झाली. गेल्या काही दिवसांत राज्यात झालेली गारपीट हा अतिरिक्त बाष्पीभवनाचा म्हणजेच तापमानवाढीचा स्पष्ट परिणाम आहे.

हासागरातील प्रवाहाची दिशा बदलल्याने धुव्रावरील बर्फाला गरम पाणी अधिक वेगाने वितळवत आहे. त्यामुळे सागर पातळीत होणाऱ्या वाढीने अधिक वेग घेतला आहे. अंटार्क्टिकावरील बर्फाची तसेच महासागरातील पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफ झाली. ही प्रचंड प्रमाणात झालेली वाफ पृथ्वीच्या वातावरणात अति उंचीपर्यंत साठत गेली. त्यामुळे पृथ्वीच्या अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी झाली. युरोपात अनेक ठिकाणी गारा पडल्या. गेल्या काही दिवसांत राज्यात झालेली गारपीट हा अतिरिक्त बाष्पीभवनाचा म्हणजेच तापमानवाढीचा स्पष्ट परिणाम आहे.
२०१३ रोजी पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनने ४०० पीपीएम (दर दशलक्ष भागातील प्रमाण) ही धोक्याची पातळी गाठली. त्यानंतरच्या वर्षभरात वादळ, हिमवृष्टी, अवर्षण, अतिवृष्टी, हिमनग कोसळणे, हिमनद्या वितळणे इत्यादी घटना घडल्या. ३० मार्च २०१४ रोजी आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाचा पाचवा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला. जगातील सर्व देशांना धोरणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या या अहवालात तापमानवाढ अनियंत्रित होण्याच्या प्रक्रियेतून आपण जात असल्याची जाणीव करून देऊन, मानव जातीच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली गेली. यापूर्वी नोव्हेंबर २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या नासाचे संचालक डॉ. जेम्स हॅनसेन यांच्या ‘स्टॉर्म्स आॅफ माय ग्रँडचिल्ड्रन’ या ग्रंथात कार्बन वाढीची सध्याची गती वर्षाला दोन पीपीएम (एक पीपीएम म्हणजे तीनशे कोटी टन) अशी महाविस्फोटक असून, ४२० पीपीएम ही पातळी गाठण्याच्या काळात तापमानवाढ अनियंत्रित होऊ शकते, असा धोक्याचा इशारा दिला. येती ९ ते १० वर्षे ही मानवजातीला वाचविण्याची शेवटची संधी असल्याचे आणि या शतकात पृथ्वीवरील सर्व जीवन नष्ट होण्याची शक्यता असल्याचे डॉ. हॅनसेन नमूद करतात. महाराष्ट्रात गेल्यावर्षी गारपीट झाली, तशी या वर्षीही झाली. यावर काही तज्ज्ञांनी हिमयुग येत असल्याचे हटले. हे चुकीचे आहे. गतवर्षीचा उन्हाळा हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला. सप्टेंबर २०१३ सालापासून दक्षिण गोलार्ध भाजून निघाला. अर्जेंटिना व आॅस्टे्रलियात काही ठिकाणी तापमान ५५ अंशावर पोहोचले. दक्षिण धुव्रावरील म्हणजे अंटाकर््िटावरील शेकडो घनकिलोमीटर बर्फ वितळून महासागरात गेले. इंग्लडमधील न्यू कॅसल विद्यापीठाच्या भू-गर्भविषयक विभागाच्या अभ्यासाप्रमाणे अंटाकर््िटाकाचे भूकवच वरील बर्फाचे वजन कमी होत गेल्याने गेल्या २० वर्षांत दरवर्षी १५ मि़मी़ या गतीने वर उचलले जात आहे. पृथ्वीच्या घडणीतही तापमानवाढीमुळे बदल होत असल्याचे या संस्थेने नमूद केले आहे. (लेखक पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)

1 भारत सरकारचे अतिरिक्त सचिव प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय चमूने राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. या चमूशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून, २०१२ पेक्षा दुपटीने गावे बाधित झाली आहेत ही जाणीव त्यांना करून दिली.
2 अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे राज्यात सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ८२ तालुके व ८९३ गावे बाधित झाली. जिरायत शेतीसाठी पूर्वी ४,५०० रुपये प्रति हेक्टर बाधितांना मदत म्हणून दिली जात होती. त्यात ५,५०० रुपयांची विशेष मदत मिळून १० हजार प्रति हेक्टर इतकी देण्यात येणार आहे.
3 बागायती पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीची ९ हजार रुपये आणि आता ६ हजार रुपये विशेष मदत मिळून १५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत तर फळपिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीची १२ हजार अधिक विशेष मदत १३ हजार मिळून २५ हजार प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
4 सध्या मंडळ स्तरावर हवामान केंद्र असून, आता त्याऐवजी फळबाग क्षेत्रात मंडळपेक्षा कमी अंतरावर शक्यतो गाव किंवा ग्रामपंचायत क्षेत्रावर हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यात २ हजार हवामानदर्शक यंत्रे लावण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून, ग्रामस्तरापर्यंत असे केंद्र स्थापन करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार सुरू आहे.

- गिरीश राऊत

Web Title: Hailstorm hazard due to the rise in temperature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.