डोकेदुखी कायम

By admin | Published: January 25, 2017 01:06 AM2017-01-25T01:06:00+5:302017-01-25T01:06:00+5:30

नोटाबंदीच्या अंमलबजावणीला दीड महिना उलटला आणि आता सारे काही म्हणजे पैशासाठी रांगेत उभे राहणे, खिशात कमी पैसे ठेवणे

Headache continued | डोकेदुखी कायम

डोकेदुखी कायम

Next

नोटाबंदीच्या अंमलबजावणीला दीड महिना उलटला आणि आता सारे काही म्हणजे पैशासाठी रांगेत उभे राहणे, खिशात कमी पैसे ठेवणे, खर्च कमी करणे, अनाठायी खर्च टाळणे अशा काही चांगल्या गोष्टी अंगवळणी पडल्या. लोकांची सरकारबाबत जी काही थोडीफार कुरकुर होती तीसुद्धा हवेत विरली. सारे काही आलबेल झाले. अतिरेक्यांच्या बनावट नोटांचा कचरा झाला, त्यांच्या कारवाया थंडावल्या असे दावे कानावर पडू लागले. तिकडे काश्मिरात मात्र धुमश्चक्री चालू असावी. तरी त्याकडे सर्वांनीच काणाडोळा केला. उगाचाच मिठाचा खडा टाकायला नको असा साळसूद भाव सर्वांनी बाळगला. एकूण म्हणजे नोटाबंदीने काळा पैसा खणून बाहेर काढला असा भ्रम तयार करण्यात यश आले. अतिरेक्यांच्या कारवाया मंदावल्या असे भासवले जाऊ लागले. एका अर्थाने बनावट नोटा नावाची जी एक समांतर अर्थव्यवस्था होती तिला तडाखा बसला. नव्या नोटांचे डिझाईन अवघड आहे त्याच्या सारख्या बनावट नोटा चलनात येणे शक्य नाही असे ठामपणे सांगण्यात येत होते; पण रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या या दाव्यात ताबडतोब सुरुंग लागला. बनावट नोटांची प्रकरणे उघडकीस आली. परवा औरंगाबादेतही अशी टोळी पकडली. यायरून नोटा बनविण्याचे तंत्रज्ञान फार अवघड नाही. हेच सिद्ध होते. रिझर्व्ह बँकेकडे एवढे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच तज्ज्ञ आणि यंत्रणा आहे; पण छोट्याशा खोलीत लॅपटॉप, प्रिंटर अशा सहज उपलब्ध साधनांनी बनावट नोटा तयार होतात आणि चलनातही येतात ही गोष्टच धक्कादायक आहे. आपल्या जवळची नोट बनावट तर नाही ना अशी शंका सामान्य माणसाला येणेही रास्त आहे. औरंगाबादेत वीस बनावट नोटा आजवर हस्तगत झाल्या आणि दोन जणांना अटक झाली आहे. या बनावट नोटांचे रॅके ट हे औरंगाबाद किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती व्यापक आहे. फिरोज आणि इर्शाद या दोन आरोपीच्या चौकशीतून पुढे आलेली माहिती सावध करणारी आहे. देशातील दहशतवाद्यांकडे बाहेरून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा येत असल्याची धक्कादायक माहिती या दोघांकडून समजली, म्हणजे काळा पैसा आणि बनावट चलनाची समांतर अर्थव्यवस्था जिच्यावर दहशतवाद पोसला जातो या दोन्ही उद्ध्वस्त करणे हा नोटाबंदीचा उद्देश होता तो पूर्ण झाला नाही. हे दीड महिन्यातच सिद्ध झाले. बनावट चलनामुळे दहशतवादी कारवायांना बळ मिळतेच शिवाय अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या अहवालानुसार चलनात बनावट नोटा असलेल्या देशांमध्ये भारताचा नववा क्रमांक लागतो. बनावट भारतीय चलन पाकिस्तानात तयार होते आणि नेपाळ, बांगलादेश मार्गे ते देशात आणले जाते. याशिवाय दुबई, थायलंड, श्रीलंका, मलेशिया आणि आता चीनमार्गेही चोरट्या पद्धतीने अशा नोटा भारतात येतात. याचा परिणाम महागाई वाढण्यावर होतो. दीड महिन्यातच नव्या स्वरूपात बनावट नोटा उघड झाल्याने ही चिंता वाढली आहे. म्हणजे नोटा रद्द करण्याचा उपाय प्रभावी नव्हता हे सिद्ध झाले.

Web Title: Headache continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.