हॅलो, मिस्टर टँग यू, आपण कसे आहात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 09:56 AM2022-09-28T09:56:07+5:302022-09-28T09:56:21+5:30

नेटड्रॅगन या हाँगकाँगस्थित इंटरनेट कम्युनिटी कंपनीचे सीईओ टँग यू हे हाडामासाचे मानव नसून ह्यूमनॉइड यंत्रमानव आहेत, त्याबद्दल..

Hello, Mr Tang Yu, how are you spacial article on artificial intelligent robo appointed in company | हॅलो, मिस्टर टँग यू, आपण कसे आहात?

हॅलो, मिस्टर टँग यू, आपण कसे आहात?

Next

डॉ. दीपक शिकारपूर
उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या प्रणाली या अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, काॅम्प्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणक प्रणाली यामध्ये वापरल्या जातात. माणूस जी कामं करतो ती कामं यंत्रमानवांकडून करून घेणं हा या तंत्रज्ञानाचा पाया आहे.  

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील ही झेप अनेक क्षेत्रांवर आपला प्रभाव दाखवत आहे. अनेक क्षेत्रे या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र  बदलतील. येत्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात रोबो (यंत्रमानव)  हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनेल. विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घेऊन ती सोडविण्यास मदत करेल, असे रोबो तयार करण्याचा प्रयत्न  माहिती  तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील काही कंपन्या करीत आहेत. ही अत्यंत छोटी उपकरणे बाळगायला आणि वाहून नेण्याला खूपच सोपी असतील. संगणक आणि संगणकीय प्रणाली पूर्वीप्रमाणे फक्त सांगकाम्या  राहिल्या नसून मानवी व्यवहार जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची क्षमता त्यांना दिली जात आहे. मशीन लर्निंग, नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंग ऊर्फ एनएलपी आणि कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग या तीन अतिशय प्रगत तंत्रज्ञानांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा डोलारा उभा आहे. 

या तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीय प्रणालीला माणसाप्रमाणे विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी हा उद्देश यामागे आहे. आत्तापर्यंत सहायक म्हणून भूमिका पार पाडणारा यंत्रमानव आता आपले हातपाय थेट  मानवी कार्य करण्यापर्यंत पसरू लागला आहे. नेमून दिलेले काम माणसापेक्षा कित्येक पट वेगाने आणि अचूकतेने करण्यासाठीच मुळात संगणकाची रचना केलेली असते. त्या कामादरम्यान त्याने विचार करणे अपेक्षित नसते. संगणक वा यंत्रमानवांकडून करवून घेण्यासाठी मानवाने त्यांना अफाट प्रक्रिया-क्षमता (प्रोसेसिंग पॉवर) शिकवली खरी; परंतु तिचाच वापर करून यंत्रे आता माणसाच्याच डोक्यावर बसणार की काय असे वाटू लागले आहे.

नेटड्रॅगन या हाँगकाँगस्थित इंटरनेट कम्युनिटी कंपनीने टँग यू यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीयुत टँग यू हे हाडामासाचे मानव नसून ह्यूमनॉइड यंत्रमानव आहेत. कॉर्पोरेट व्यवस्थापन आणि व्यवस्थापकीय कार्यक्षमतेला नवीन स्तरावर रूपांतरित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी ही नियुक्ती आहे.  हा यंत्रमानव  प्रक्रियेचा प्रवाह सुव्यवस्थित करेल, कामाची गुणवत्ता वाढवेल आणि अंमलबजावणीचा वेग सुधारेल. दैनंदिन कामकाजात तर्कशुद्ध निर्णय घेण्यास समर्थन देण्यासाठी तसेच अधिक प्रभावी जोखीम व्यवस्थापन प्रणाली सक्षम करण्यासाठी टँग  यू एक रिअल-टाइम डेटा हब आणि विश्लेषणात्मक साधन म्हणून देखील काम करतील.  या व्यतिरिक्त, टँग यू यांनी प्रतिभांचा विकास आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी योग्य आणि कार्यक्षम कार्यस्थळ सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे अपेक्षित आहे. हा एक प्रयोग आहे. हा कितपत यशस्वी होतो हे काळच ठरवेल. 

सध्या बऱ्याच संगणक उद्योगात वर्क फ्रॉम होम लोकप्रिय आहे. कोविडने हा नवा प्रकार लादला गेला;  पण त्याचे फायदे अनेकांना जाणवले.  सीईओची भूमिका म्हणजे लोकांकडून काम करून घेणे आणि प्रगतीचा अहवाल संचालक मंडळाला देणे हेच असेल तर त्यासाठी भलेमोठे पॅकेज देऊन माणूस का नेमायचा ? वर्क फ्रॉम होम ही कोरोना काळातल्या अपरिहार्यतेतून बाहेर पडण्यासाठी काढलेला तात्पुरता मार्ग होता हे खरे... पण माणसे एकत्र न येता आपापल्या घरी बसून एकाच प्रोजेक्टवर काम करु शकतात हे एका मर्यादीत अर्थाने तेव्हा प्रत्यक्ष अनुभवाला आले. आता त्याचाच पुढचा तर्क असा लावला जातो आहे की, माणसे सदेह भेटून परस्परांशी संवाद करणारच नसतील तर त्यातल्या काहींची जागा यंत्रमानवाने घेतली तर असे काय बिघडेल?

हा विचार यामागे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या “द फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट” नुसार,  २०२५ पर्यंत जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता  ८५ दशलक्ष नोकऱ्या बदलेल अशी अपेक्षा आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांतीने मानवी नोकऱ्यांवर अतिक्रमण  केले. यावर “नया दौर” सारखे चित्रपटही निघाले. आता या प्रश्नाचे पैलू बदलत आहेत.     
deepak@deepakshikarpur.com

Web Title: Hello, Mr Tang Yu, how are you spacial article on artificial intelligent robo appointed in company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.