मनाचिये गुंथी - मानव यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:23 AM2017-09-12T00:23:49+5:302017-09-12T00:24:05+5:30

भारतीय शास्त्रानुसार या जगात ८४ लाख योनी आहेत. या सर्व योनींमध्ये मानव योनीला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे व मानव सर्वश्रेष्ठ असण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाने मानवाला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा वापर करून मानव उचित व अनुचित निर्णय घेतो. उचित निर्णयामुळे त्याला सुख व शांती मिळते तर अनुचित निर्णयामुळे त्याला अनेक दु:खांना सामोरे जावे लागते.

human instrument | मनाचिये गुंथी - मानव यंत्र

मनाचिये गुंथी - मानव यंत्र

Next

डॉ. भूषणकुमार उपाध्याय

भारतीय शास्त्रानुसार या जगात ८४ लाख योनी आहेत. या सर्व योनींमध्ये मानव योनीला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे व मानव सर्वश्रेष्ठ असण्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाने मानवाला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा वापर करून मानव उचित व अनुचित निर्णय घेतो. उचित निर्णयामुळे त्याला सुख व शांती मिळते तर अनुचित निर्णयामुळे त्याला अनेक दु:खांना सामोरे जावे लागते.
या बुद्धीमुळेच मानवाने आदिकाळापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्राचा शोध लावून ते तयार करण्याचे काम तो करीत आहे. या यंत्राचा शोध घेण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे त्याचे जीवन सुखद व्हावे तसेच त्याच्यामध्ये विद्यमान असलेल्या अनंत भावनांना व्यक्त करण्यासाठी पुरेसा वेळ त्याला मिळावा.
मानव एक असा जीव आहे, ज्याच्यामध्ये अमर्याद शक्ती सामावलेल्या आहेत. काही शक्ती अशा आहेत, ज्या त्याला बाह्य जगाचा स्वामी बनवतात तर काही अशा ज्या त्याला महामानव बनवून दिव्यत्वाकडे घेऊन जातात.
बाह्य जगातील अशा शक्ती आहेत, ज्या मानवाला एका ठराविक मर्यादेनंतर बेचैन व असमाधानी करतात.
नृत्य, संगीत-कला व अध्यात्म या आपल्या अंतर्गत शक्तीच्या अभिव्यक्ती आहेत. जेव्हा या शक्ती अभिव्यक्त होतात, तेव्हा मानवाचे जीवन रस, सौंदर्य व परम चेतनेने ओतप्रोत भरले जाते. या शक्तीच्या प्रकट होण्याबरोबरच मानवाला एका परमानंदाची अनुभूती मिळते व मानव सर्व सीमांना तोडून या जगाचा नागरिक बनतो.
जेव्हा यंत्र तयार झाले तेव्हा त्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे या यंत्राच्या साहाय्याने मानव कठिणातील कठीण काम लवकर करू शकेल व त्याला स्वत:च्या विकासासाठी जास्तीतजास्त वेळ मिळेल. जेणेकरून तो आपल्या अंतर्जगातील शक्तीला प्रकट करू शकेल.
परंतु इतिहास असे सांगतो की, मानवाच्या जीवनात अगदी याच्या विपरीत घडलेले आहे. मानव यंत्राच्या उपयोगात व भौतिक साधनांच्या कमाईमध्ये एवढा गुंतला गेला की या अंत:शक्तीचा विकास पूर्णत: कमी झालेला आहे व आता त्या पूर्णत: खिन्न व आजारी आहेत आणि सध्या मानव तणाव व हिंसेच्या वातावरणात आपले जीवन जगत आहे.
आता या गोष्टीची गरज आहे की मानवाने आपल्या जीवनातील थोडा वेळ काढून नृत्य करावे. हेच नृत्य त्याच्या जीवनात आनंदाची एक लहर निर्माण करेल. काव्य आणि साहित्याचे वाचन व सृजन या अंत:शक्तींना खुलवेल.
अध्यात्मामुळे आपल्या मूळ स्वभावाची ओळख होऊन आपण अनंत चेतनेशी जोडले जाऊ व यामुळे मानव केवळ यंत्रमानव न राहता तो दिव्यत्वाकडे ओढला जाईल व परम चेतनेचा साक्षात्कार होऊन खºया अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना साकार होईल.
 

Web Title: human instrument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.