पक्षाबाहेर हाकलत नाहीत, तोपर्यंत मी भाजपमध्येच राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:32 AM2022-11-09T05:32:54+5:302022-11-09T05:33:22+5:30

हार्वर्ड विद्यापीठात गेली पन्नास वर्षे अर्थशास्त्र शिकवणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी बुजुर्ग नेते आहेत. ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी त्यांच्याशी केलेला संवाद! 

I will remain in the BJP until they are not thrown out of the party interview of subramanian swamy | पक्षाबाहेर हाकलत नाहीत, तोपर्यंत मी भाजपमध्येच राहणार!

पक्षाबाहेर हाकलत नाहीत, तोपर्यंत मी भाजपमध्येच राहणार!

Next

डॉ. सुब्रमण्यम स्वामी
ज्येष्ठ नेते

हार्वर्ड विद्यापीठात गेली पन्नास वर्षे अर्थशास्त्र शिकवणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी बुजुर्ग नेते आहेत. ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी त्यांच्याशी केलेला संवाद! 

देशाची आर्थिक परिस्थिती सध्या कशी आहे? 
भारताचे एकंदर देशांतर्गत उत्पन्न २०१५ पासून सातत्याने घसरते आहे. गुंतवणुकीचे प्रमाण कमी होत गेल्याने ते आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत कोरोनाकाळात वाढीचा दर ३.१ टक्क्यांपर्यंत खाली आला. छोट्या आणि मध्यम  उद्योगांची स्थिती वाईट आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर कामगार कपातीमुळे बेरोजगारीत वाढ होते आहे. 

..तरीही जीएसटी संकलन वाढते आहे, हे कसे?
त्यात काय कठीण आहे? अगदी क्रूरकर्मा गद्दाफीही मजबूत महसूल गोळा करीत असेच की! २०१९ साली मी देशाच्या अर्थव्यवस्थेवर ‘रिसेट’ या नावाचे पुस्तक लिहिले. त्यातले भाकीत खरे ठरले आहे.

अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणण्याचा एखादा मार्ग आहे काय? 
अर्थातच आहे. योग्य प्रकारे हाताळली गेल्यास अर्थव्यवस्थेची दिशा नक्की बदलेल. सध्या ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते, अशा घसरणीला फक्त निमित्त हवे असते. श्रीलंकेची अर्थव्यवस्था चहा-तांदळाची निर्यात, तसेच पर्यटनावर अवलंबून होती. तांदळाच्या पिकावर कीटकनाशके वापरू नयेत हा फतवा श्रीलंकेत निमित्त ठरला. सगळे पीक किडीने फस्त केले. लोकांना खायला अन्न उरले नाही आणि त्यांनी सरकारविरुद्ध उठाव केला.

भारतात असे कोणते निमित्त उद्भवू शकते? 
ते मी कसे सांगणार? २०१६ पासून २०१९ पर्यंत मी पंतप्रधानांना सातत्याने पत्र लिहीत होतो. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मी शेवटी नाद सोडला. 
पण तुम्हाला तर पंतप्रधान मोदी यांनीच राज्यसभेवर नियुक्त केले आहे.. 
मला भाजपाने राज्यसभेवर नियुक्ती दिलेली नाही. ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली आहे, हे मी स्पष्ट करतो. भारतीय जनसंघाच्या प्रारंभीच्या नेत्यांमध्ये मी एक होतो. गांधीवादी समाजवाद हे मार्गदर्शक सूत्र घेऊन वाजपेयी आणि अडवाणी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली, तेव्हा मी जनता पक्षात राहायचे ठरवले. पुढे हिंदुत्वाच्या कार्यक्रमाचा स्वीकार केल्यानंतर मी माझा पक्ष भाजपमध्ये विलीन करून टाकला.

मग त्यावेळी चूक कुठे झाली? 
२०१३ मध्ये मला मुंबईतून लोकसभेची जागा लढविण्यास सांगण्यात आले. पण २०१४ साली तत्कालीन पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी मला नवी दिल्लीतून उभे राहण्याची सूचना केली.  मी नाखुशीनेच तयार झालो; परंतु अगदी ऐनवेळी राजनाथ सिंग यांनी बोलावून घेऊन मला सांगितले की, अरुण जेटली यांनी तुमच्या नावाला विरोध दर्शवला आहे. मोदी यांच्यासह सर्वांनी त्या बैठकीत मौन पाळले असेही मला कळले. निवडणुका झाल्यावर सर्वांत आधी तुम्हाला राज्यसभेवर नियुक्ती दिली जाईल असे वचन त्यांनी दिले; परंतु पुढे तेही प्रत्यक्षात आले नाही.

मग तुम्ही काय केले? 
२०१५ मध्ये मी पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो. मी आता भाजप सोडत आहे, कुठेही गेलो तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मला पाठिंबा असेल असे मी मोदींना सांगितले. विहिंपचे अध्यक्ष अशोक सिंघल, सरसंघचालक मोहन भागवत यांनी तशाच आशयाचा निरोप मोदी यांना दिला. नंतर मला राज्यसभेवर नियुक्ती देण्यात आली आणि तिही भाजपच्या तिकिटावर नव्हे! मी नामनिर्देशित सदस्य आहे. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत सामील होण्यास त्यांनी मला मज्जावच केला. 

आता भाजप तुम्हाला पुन्हा राज्यसभेत पाठवणार नाही, मग तुम्ही जनता पक्ष पुनरुज्जीवित करणार? 
नाही. पक्षाबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत मी भाजपमध्येच राहणार आहे.

भारत हिंदू राष्ट्र होऊ शकेल? 
ते तर अपरिहार्य आहे! ज्यांनी हिंदूंना विरोध केला नाही अशा कोणाहीविरुद्ध हिंदू कधीही नव्हते. पारशी, शीख, बुद्धिस्ट, जैन या सगळ्यांशी हिंदूंचे मधुर संबंध राहिले. भारत हा जगातला एकमेव देश आहे ज्याने ज्यूंचे शिरकाण केले नाही. फाळणीनंतर सांस्कृतिकदृष्ट्या मुस्लिमांनीही हिंदूसारखे व्हावे, अशी अपेक्षा होती. तसे झाले असते तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या; पण हल्ली धर्मनिरपेक्षता ही फॅशनच झाली आहे. 
घटनेचे ३७० कलम रद्द झाले. राम जन्मभूमी मंदिर पुन्हा उभे राहते आहे. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचेही नवनिर्माण  झाले. हिंदुत्वाचा  आणखी काही

कार्यक्रम अपूर्ण राहिला आहे का? 
होय. अजून दोन गोष्टी बाकी आहेत. भारतीय भाषांमधील दुवा म्हणून संस्कृतचा वापर करणे आणि दुसरे, जन्माने नव्हे तर कर्माच्या आधारावर वर्ण अधिकृतपणे ठरवणे. म्हणजे उद्योग करणारा वैश्य ठरेल आणि जो शिक्षक असेल तो ब्राह्मण..

Web Title: I will remain in the BJP until they are not thrown out of the party interview of subramanian swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.