वैचारिक आणीबाणीच्या पाऊलखुणा!
By Admin | Published: September 15, 2014 09:48 AM2014-09-15T09:48:55+5:302014-09-15T09:50:48+5:30
देशातील बहुसांस्कृतिकता आणि धर्मांतर्गत विषमता दुर्लक्षून हिंदुत्वाच्या राजकारणासाठी फायद्याचे असल्याने, हे केले जात आहे.
>- मिलिंद चव्हाण सामाजिक कार्यकर्ते
स्टेम सेलचे तंत्रज्ञान भारतात पूर्वीपासूनच होते. गांधारीला मूलबाळ नसल्याने तिने या तंत्रज्ञानाच्या आधारे शंभर कौरवांचा जन्म दिला.. महाभारतातील युद्धाचे वर्णन राजवाड्यात बसून संजयने करणे हे टीव्हीचे प्राचीन रूपच होते.
वैदिक काळातही अनश्वरथ नावाने मोटार उपलब्ध होती..
यासारखे अचंबित करणारे दावे सध्या गुजरातमधील शालेय विद्यार्थ्यांच्या पूरक वाचनाच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. दीनानाथ बात्रांच्या संकल्पनेतून तयार झालेली ही पुस्तके राज्यातील शाळांमधून मोफत वाटली जात आहेत. नरेंद्र मोदी यांचे संदेशपत्रही पुस्तकांमध्ये समाविष्ट आहे.
विज्ञानाच्या कसोटीवर हास्यास्पद ठरणार्या दाव्यांबरोबरच भारतीयांच्या ह्यश्रेष्ठत्वाचे धडेही विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. उदा. ह्यदेवाने बनवलेली पहिली भाकरी थोडी कच्ची राहिली,, तेव्हा ब्रिटिश जन्माला आले, दुसरी करपून काळी पडली, तेव्हा आफ्रिकन जन्मले आणि तिसरी मात्र योग्य भाजली म्हणजे भारतीय जन्माला आले हा डॉ. राधाकृष्णन यांच्या आणि ह्यभारतीयांच्या लेखी परदेशी माणसांची जागा पायातच आहे हा विवेकानंदांच्या तोंडी घातलेला दावा!
बात्रा हे नवृत्त शिक्षक, रा. स्व. संघ प्रणीत ह्यविद्याभारतीचे राष्ट्रीय कार्यवाह आणि ह्यशिक्षा बचाओ आंदोलन समितीचे संस्थापक आहेत. एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्रांच्या पुस्तकांबाबत त्यांनी ७0 आक्षेप नोंदवले होते. २00७ साली त्यांच्या सांगण्यावरून मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहानांनी शालेय अभ्यासक्रमातून ह्यलैंगिक शिक्षण हद्दपार केले. ह्यलैंगिक शिक्षण देणे तुम्हाला कायदेशीर अडचणीत आणू शकते असे पत्र बात्रांच्या समितीने दिल्लीतील शिक्षकांना पाठवले होते! २0१00मध्ये बात्रांनी ह्यद हिंदूज: अँन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री या पुस्तकाबाबत आक्षेप घेणारी कायदेशीर नोटीस लेखिका वेंडी डोनिंजर आणि पेंग्विन प्रकाशनाला पाठवली. गेल्या फेब्रुवारीत पेंग्विनने पुस्तक मागे घेऊन त्याचा लगदा करण्याचे मान्य केले! त्यानंतर मार्चमध्ये बात्रांनी डोनिंजर यांच्याच ह्यऑन हिंदुइझम पुस्तकाबाबतही नोटीस पाठवली! मे महिन्यात मेघा कुमार यांच्या ह्यकम्युनॅलिझम अँड सेक्शुअल व्हायलन्स : अहमदाबाद सीन्स १९६९ पुस्तकातील मजकूर संघाची बदनामी करणारा असल्याचा आक्षेप घेऊन बात्रांनी नोटीस पाठवल्याने ओरिएंट ब्लॅकस्वान प्रकाशनाने पुस्तक स्थगित केलेच, शिवाय गेले दशकभर अभ्यासक्रमात असलेल्या शेखर बंदोपाध्याय यांच्या पुस्तकाच्या पुनरावलोकनाचा अनावश्यक निर्णय घेतला.
ह्यविद्याभारतीच्या तत्त्वज्ञानानुसार ह्यईश्वर हे विश्वाचे अंतिम सत्य, तर ह्यहिंदुत्वाप्रती वचनबद्ध पिढी घडवणे हा प्रमुख उद्देश आहे. याचा मूलस्रोत अर्थातच संघाची विचारधारा हाच आहे. गोळवलकर गुरुजींच्या मते, ह्यहिंदूंचा प्राचीन सांस्कृतिक वारसा जतन करून वृद्धिंगत करणे हा शिक्षणाचा प्रमुख हेतू असला पाहिजे. मधू वाणी यांच्या मते हा दृष्टिकोन हिटलरच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाशी मिळताजुळता आहे. त्यानुसार आर्यांचे श्रेष्ठत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबावे म्हणून ज्यू धर्मियांचा उल्लेख ह्यजगण्याचा हक्क नसलेले शूद्र व ह्यर्जमनांचे गुलाम असा केला होता. बात्रांच्या पुस्तकातील उदाहरणे वर्णाचा मुद्दा अधोरेखित करतात. जात, धर्म, लिंग, प्रांत इ.वर आधारित उच्चनीचतेच्या खोलवर रुजलेल्या कल्पना काढून टाकण्याऐवजी आणखी घट्ट करण्याचाच हा प्रयत्न आहे. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे निरनिराळे युक्तिवाद विद्यार्थ्यांसमोर ठेवून चिकित्सक व विवेकी पिढी घडवण्याऐवजी दैववादी मानसिकता निर्माण करण्याचा आणि तिच्या लाभार्थ्यांचे हितसंबंध कायम राखण्याचा हेतूही यात स्पष्ट दिसतो. मूलबाळ झाल्याशिवाय स्त्रीच्या आयुष्याला पूर्णत्व नाही, ही स्त्रीला केवळ मातेच्या भूमिकेत पाहणारी मानसिकताही दिसून येते. ह्यगोसेवा करून मुले होत होती, तर गांधारीला इतकी सव्यापसव्य करण्याची काय गरज होती? या तर्कशुद्ध प्रश्नाचे कोणते उत्तर बात्रांकडे असणार आहे?
अर्थात, यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात. बात्रांच्या आणि विद्याभारतीतर्फे चालवल्या जाणार्या शाळांच्या अभ्यासक्रमातला भाग राज्यघटनेतील मूल्यांच्या विरोधात आहे. देशातील बहुसांस्कृतिकता आणि धर्मांतर्गत विषमता जाणीवपूर्वक दुर्लक्षून ह्यहिंदू ही एकजिनसी ओळख म्हणून ठसवणे हिंदुत्वाच्या राजकारणासाठी फायद्याचे असल्याने हे केले जात आहे. मोदींचा संदेश पुस्तकात आहे म्हणजे त्यातील आशयाशी ते सहमतच असणार. ह्यराज्यघटनेशी बांधिलकीचे आश्वासन देणारे मोदी हा घटनाविरोधी व लोकशाहीविरोधी प्रकल्प कसा पुढे रेटू शकतात? शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना या सगळ्या प्रकाराबद्दल मात्र ते चकार शब्दही का काढत नाहीत? स्मृती इराणींनी ह्यदेशाच्या शैक्षणिक आराखड्यात बदल केले जाणार नाहीत, असे राज्यसभेत आश्वासन दिलेले असतानाही, संसदेत चर्चा न करता असे करणे हा दुटप्पीपणा नव्हे काय? बात्रांच्या पुस्तकांमध्ये अखंड भारताचा नकाशा दर्शवला असून, शेजारी राष्ट्रे भारताचाच भाग आहेत! शेजारील राष्ट्रप्रमुखांना शपथविधीला बोलावणार्या मोदींना हे मान्य आहे का? असल्यास आंतरराष्ट्रीय मंचावर ते याचा खुलासा कसा करणार आहेत? वाजपेयी सरकारच्या काळात मुरली मनोहर जोशींनी शिक्षणाच्या सांप्रदायिकीकरणाचा केलेला प्रयत्न विरोधामुळे बारगळला; मात्र आता तो नव्या जोमाने सुरू झाला आहे.
तितकाच गंभीर मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही आहे. पुस्तकातील मजकूर रा. स्व. संघाची बदनामी करणारा असेल, तर तर्कशुद्ध पुराव्यांनिशी तो खोडून का काढला जात नाही? की तसे करणे अवघड आहे, याची संघाला खात्री आहे? पुस्तकांवर बंदीची मागणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात नाही का? भारतात येऊ घातलेल्या वैचारिक आणीबाणीच्या या पाऊलखुणा असून, सर्वांनीच त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. अन्यथा, भारताचे तालिबानीकरण दूर नाही.