दुर्लक्षित माळीण

By admin | Published: September 6, 2014 10:59 AM2014-09-06T10:59:08+5:302014-09-06T11:05:10+5:30

निसर्गाच्या प्रकोपासमोर कोणाचे काहीही चालत नाही. तरीही अशा घटनेनंतर ‘आताच्या शतकात’ सावरण्याची आपली शक्ती असली पाहिजे. जपानसारख्या

Ignored Gardner | दुर्लक्षित माळीण

दुर्लक्षित माळीण

Next
>- नागेश केसरी, ज्येष्ठ पत्रकार
 
निसर्गाच्या प्रकोपासमोर कोणाचे काहीही चालत नाही. तरीही अशा घटनेनंतर ‘आताच्या शतकात’ सावरण्याची आपली शक्ती असली पाहिजे. जपानसारख्या राष्ट्राने अनेक नैसर्गिक प्रकोपांनंतर पुन्हा नव्याने राष्ट्रनिर्मिती केली आहे. या अगोदरही महाराष्ट्रात किल्लारी येथे काही वर्षांपूर्वी भूकंपाचा धक्का बसला आणि ते गाव होत्याचे नव्हते झाले, त्यानंतर या वर्षी जुलै महिन्यात आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव जमीनदोस्त झाले. हे दोन्ही प्रकोप राज्याने पाहिले आहेत, पण महाराष्ट्रातील दातृत्ववान उद्योगपतींनी किल्लारीकडे जसे लक्ष दिले, तसे माळीणकडे दिले नाही.
बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांत नेहमी नद्यांना पूर येतो, हिमालयाचे कडे कोसळतात, अनेक गावे नष्ट होतात, वाहूनही जातात. महाराष्ट्रात किल्लारीला भूकंप झाला तेव्हा वर्षभर त्या भागातल्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवत होते, प्रशासनाला त्याची जाणीव होती. पण माळीणबाबत अशी कोणतीही पूर्वसंकेत देणारी घटना घडली नाही. डोंगर पायथ्याशी वसलेले लहान गाव, छोटी-मोठी शेती त्यामुळे या गावाची आर्थिक स्थिती मजबूत नव्हती, बहुतेक नागरिक कष्ट करणारे, लहानसहान उद्योग करणारे, त्यामुळे या गावाकडे म्हणावे तसे लक्ष गेले नाही आणि लक्ष देण्याची गरजही भासली नाही. आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातला हा एक भाग, त्यांचे आपल्या मतदारसंघातील गावाकडे जसे लक्ष असते तसेच विकासाच्या दृष्टीने या गावाकडे लक्ष होते. त्यांनी गेल्या महिनाभरापासून माळीणच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. 
राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या नेत्यांबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आदींनी या गावाला भेट दिली. मदतीचे ठोस आश्‍वासनही दिले. केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून त्या गावाचा विकास होणे फारसे शक्य नसते याची जाणीव सर्वसंबंधितांना आहे. नैसर्गिकदृष्ट्या सुरेख असलेल्या या गावाकडे दातृत्ववान व्यक्तींनी अद्याप लक्ष दिले नाही, माध्यमानींही या विषयावर लक्ष केंद्रित केले नाही. जवळपास १५0 नागरिक मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांचे पुनर्वसन, त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस ही केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावी, अशी अपेक्षा ठेवणे फारसे बरोबर नाही. लोकप्रतिनिधींनी ते करावेच आणि ते करतील. पण दातृत्ववान व्यक्तींनीही अशा कामावर लक्ष केंद्रित केले तर या राज्याच्या वैभवात भरच पडणार आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आर्थिक मदतीचा ओघ मोठय़ा प्रमाणात येतो, पण त्या प्रमाणात तसा ओघ इकडे आला नाही. विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी या गावाकडे लक्ष दिले नाही. पुण्यासारख्या अत्यंत जवळ असलेल्या या गावाचे टुमदार गावात परिवर्तन होणे, स्थानिक नागरिकांना दिलासा देणे, एक चांगले शहर वसविणे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील दातृत्ववान व्यक्तींना सहज करणे शक्य आहे.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घालून दिलेली पद्धत माळीण गावासाठी अनुसरली गेली असती तर महाराष्ट्राला एक वेगळा अनुभव मिळाला असता. पवारांनी किल्लारी भूकंपाच्या वेळी सोलापूर येथे ठाण मांडून किल्लारीचे पुनर्वसन केले. अशीच एखादी महनीय व्यक्ती पुढे आली असती आणि केंद्र व राज्य सरकारने मदतीचा ओघ वाढवला असता तर काम करणार्‍या व्यक्तींची शक्ती दुणावली असती. एक महिना झाला तरी या घटनेचे राज्यातल्या इतर नागरिकांना सातत्याने स्मरण होत नाही. माध्यमांनी अशा घटनाकडे आपला कटाक्ष टाकला किंवा आपली यंत्रणा राबविण्यासाठी संबंधितांना भाग पाडले तर माळीणकरांना खरोखरच दिलासा मिळणार आहे.
दु:खात चार शब्द सांत्वनपर कोणी सांगितले तर दु:ख हलके होण्यासाठी मदत होते, एवढी तर जाणीव दातृत्ववान व्यक्तींनी ठेवावयास हरकत नाही हीच खरी महाराष्ट्रातील संतांची शिकवणूक आहे आणि पुण्याजवळ वाढलेल्या माळीणकरांना त्याची गरज आहे.दुर्लक्षित माळीण
 
नागेश केसरी
ज्येष्ठ पत्रकार
 
दु:खात चार शब्द सांत्वनपर कोणी सांगितले तर दु:ख हलके होण्यासाठी मदत होते, एवढी तर जाणीव दातृत्ववान व्यक्तींनी ठेवावयास हरकत नाही हीच खरी महाराष्ट्रातील संतांची शिकवणूक आहे आणि पुण्याजवळ वाढलेल्या माळीणकरांना त्याची गरज आहे.

Web Title: Ignored Gardner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.