संशय वाढवित चाललेले पंतप्रधान मोदींचे मौन

By admin | Published: October 6, 2015 04:12 AM2015-10-06T04:12:22+5:302015-10-06T04:12:22+5:30

पंतप्रधान मोदी संवाद कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या अलीकडच्या अमेरिका दौऱ्यात यांनी तिथले खासदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर यांना याच कौशल्याच्या जोरावर

Increasing suspicion of PM Modi's silence | संशय वाढवित चाललेले पंतप्रधान मोदींचे मौन

संशय वाढवित चाललेले पंतप्रधान मोदींचे मौन

Next

- हरिष गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )

पंतप्रधान मोदी संवाद कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या अलीकडच्या अमेरिका दौऱ्यात यांनी तिथले खासदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर यांना याच कौशल्याच्या जोरावर प्रभावित करून टाकले. हे लोक २१ व्या शतकातील जागतिक स्तरावरील ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे आणि प्रगतीचे आधारस्तंभ आहेत. पण विरोधभास असा की राष्ट्रीय स्तरावरील काही महत्वाच्या मु्द्यांवर मोदी मौन पाळून आहेत व आणि जागतिक स्तरावर मात्र वक्तृत्वाचे कौशल्य दाखवीत आहेत. ज्यांना संघ परिवाराशी काही देणे-घेणे नाही पण जे मोदींचे कडवे समर्थक आहेत त्यांनी मोदींच्या मौनाचा अर्थ काही मुद्यांवरील त्यांची मूकसंमती असा लावला आहे. त्यांचा मोदींना पाठिंबा ‘सबका साथ, सबका विकास’ या कार्यक्रमासाठी आहे.
याचे प्रमुख उदाहरण द्यायचे झाले तर दिल्लीपासून ४० किलोमीटर दूर आणि उत्तर प्रदेशात असलेल्या दादरी येथील गोमांस घरात ठेवल्याच्या संशयावरून झालेली एकाची तथाकथित हत्त्या. दादरी येथील एका मंदिराच्या ध्वनीक्षेपकातून तेथील एका मुस्लिम कुटुंबाने घरात गोमांस ठेवले आहे अशी घोषणा करून हिंदू धर्माच्या जमावाला चिथावणी दिली होती. त्यानंतर जमावाने त्या मुस्लिम कुटुंबातील एकाला घराबाहेर ओढत मरेस्तोवर मारहाण केली. ज्याची हत्त्या झाली त्याचा मुलगा हवाई दलाच्या सेवेत आहे. या हिंसक घटनेनंतर देशाला पहिली अपेक्षा होती, पंतप्रधानांकडून या घटनेवर तंबी देणाऱ्या वक्तव्याची. पण त्यांनी मौनच राखले. त्या ऐवजी राज्यसभा सदस्य असलेले, संघाचे नेते तरुण विजय यांनी त्यांच्या लेखात सदर घटनेवर खेद व्यक्त करण्याऐवजी अशा घटनांमुळे मोदींच्या प्रयत्नांना खीळ बसेल असे मतप्रदर्शन केले. त्यांनी असेही म्हटले की, घटनेत बळी गेलेला महम्मद ईखलाक याची हत्त्या केवळ एका संशयावरून झाली. उत्तर प्रदेशात गोहत्त्या बंदी आहे पण ते खाण्यावर किंवा घरात ठेवण्यावर नाही मग संशयास्पद असे काय होते? आणि जर ईखलाकने कायदा मोडला असेल तर जमावाने कायदा हातात घेण्याची गरज काय होती?
तेथील खासदार व केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्र्यांनी तर या घटनेला केवळ अपघात म्हटले आहे. त्यांनी हेही सांगून टाकले की माध्यमे याला जातीय रंग देत आहेत. स्थानिक भाजपा नेत्यांनी या घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यातल्याच एकाने असेही सांगितले की याआधी गाईची हत्त्या झाली अशी अफवा पसरली होती आणि त्यामुळे स्थानिक लोक संतप्त झाले होते.
दादरीमधील जमाव नेमका कुणी जमविला होता? घटनेचे वार्तांकन करणाऱ्या दिल्लीतील पत्रकारांच्या भाषेत यामागे बाह्य घटक आहेत. सध्या तीच भाजपा आरक्षण धोरणावरुन राजकारण करीत आहे. १९९२ च्या डिसेंबरमध्ये विश्व हिंदू परिषद-शिवसेना हे बाह्य घटक होते ज्यांनी बाबरी मशिदीवर चाल करीत तिला ढासळले होते. बाबरी मशिदीच्या ढासळण्याने भाजपाच्या इतिहासात नवे प्रकरण लिहिले गेले. भाजपाचे या नवीन बाह्य घटकांवर थोडे पण नियंत्रण राहिले नव्हते, ज्यात अभिनव भारती या संघटनेचे नाव उदाहरण म्हणून घेता येईल. भाजपाच्या आघाडीच्या काही नेत्यांनी तर राष्ट्रपती अब्दुल कलाम मुस्लिम असूनही चांगलीे व्यक्ती होते असे वक्तव्य केले आहे.
या सर्व गडबडीत मोदींची निष्क्रियता तर आहेच पण त्यांच्या पक्षाला आगळा-वेगळा भारत तयार करायचा आहे, जो समजायला अवघड जाणार आहे. पंतप्रधान अशा बाह्य घटकांना हाताशी ठेवत असतात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडीयांना दूर ठेवले होते. त्यांनी त्यांचे टीकाकार असलेल्या संजय जोशींना विस्मरणात ठेवण्याची काळजी घेतली होती. त्यांनी अहमदाबादेत सार्वजनिक जागांवर अतिक्र मण करून बांधण्यात आलेल्या मंदिरांना पाडण्याची मुभा महानगरपालिका अधिकाऱ्यांना देऊन टाकली होती. मुख्यमंत्री असतानाच त्यांनी अहमदाबादमधून आर्थिक संरक्षणवादाचा पुरस्कार करणाऱ्या स्वदेशी जागरण मंचला बाहेर काढले होते. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून असलेला १३ वर्षाचा कारभार अहंमान्यतेचे उदाहरण होते, ते कुणाचेच ऐकत नव्हते आणि कुणासामोरच नम्र होत नव्हते, भलेही ते आतले असोत किंवा बाह्य घटकातले.
या सर्व परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या मौनामागचे कारण काय असेल? त्यांना सर्व परिस्थिती साहजिकच समजते आहे, प्रगत राष्ट्रातील धर्माधिष्ठित भारताची संकल्पना त्यांना जास्त मान्य आहे पण ती स्वीकारार्र्ह नाही. कारण ती कालबाह्य आहे म्हणून नव्हे तर स्वातंत्र्यात्तर भारताने जागतिक स्तरावर वैविध्यांच्या बाबतीत स्वीकारलेल्या आणि टिकवलेल्या सहिष्णुतेचा आदर म्हणून.
दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तसा उशिराच प्रवेश केला होता पण तो पर्यंत साध्वी निरंजन ज्योती यांच्या उन्मत्त भाषणाने भाजपाची बरीच मोठी हानी झालेली होती. ते या घटकांचा लोकांच्या वैयक्तिक जीवनात ‘लव जिहाद’च्या नावाखाली नाक खुपसण्याचा अंदाज आधीच लावू शकले असते. त्यांनी असा ही विचार केलेला नाही की पृथ्वीराज चौहानने १२ व्या शतकात हरलेली लढाई जिंकणे त्यांचे ध्येय आहे आणि त्यांचे येऊ घातलेल्या औष्णिक-अणु संहाराकडेही दुर्लक्ष झालेले नाही. मग ते अर्धांगवायू झाल्यासारखे का दिसत आहेत? त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणून जराही स्वातंत्र्य नसेल का? ज्या प्रमाणे गुजरातचे मुख्यमंत्री असताना होते. मी व्यथित अवस्थेत आहे की ते का परिस्थितीला इतक्या विकोपाला जाऊ देत आहेत? ते डाव उलटवण्याची योग्य वेळ बघत आहेत का? किंवा ते अशा विचारकाना आणि बाह्य घटकांना हवे ते करण्याची मुभा देऊन त्या कडे दुर्लक्ष करीत आहेत का? बिहारच्या निवडणुकात अपयश आले तर त्याचे राजकीय परिणाम काय होतील हे त्यांच्या शिवाय दुसऱ्या कुणाला चांगले माहीत असणार आहे? आणि अपयश आलेच तर ते या घटकांना जसे सध्या चालू आहे तसे चालू ठेवू देतील? तेच योग्य ठरणार आहे.

Web Title: Increasing suspicion of PM Modi's silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.