Independence Day 2021 : डोकेदुखी पाक, चीनचीच; पण भारत आहे तयार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 09:13 AM2021-08-15T09:13:25+5:302021-08-15T09:14:19+5:30

Celebrating Happy Independence Day 2021: गेल्या काही वर्षांत पाकिस्तान आणि चीन जवळ आले आहेत. थोडक्यात भारताचा डावा, उजवा खांदा हेच शत्रूचे लक्ष्य असेल. 

Independence Day 2021: Headaches Pakistan, China; But India is ready! | Independence Day 2021 : डोकेदुखी पाक, चीनचीच; पण भारत आहे तयार!

Independence Day 2021 : डोकेदुखी पाक, चीनचीच; पण भारत आहे तयार!

Next

- श्रीमंत माने

इंदिरा गांधी व राजीव गांधी अशा दोन पंतप्रधानांचे बळी घेणारा दहशतवाद, सतत धगधगत असणारी पाक सीमा आणि चीनकडून वाढलेल्या उचापती, ईशान्य भारतात अधूनमधून डोके वर काढणारा फुटीरतावाद आणि देशात माओवाद्यांकडून घडविला जाणारा रक्तपात ही गेल्या ७५ वर्षांत भारताने पेललेली प्रमुख आव्हाने आहेत खरी. पण, सगळ्यात मोठी डोकेदुखी पाकिस्तानच आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तान आणि चीन जवळ आले आहेत. थोडक्यात भारताचा डावा, उजवा खांदा हेच शत्रूचे लक्ष्य असेल. 

बाह्य संकटांचा जिद्दीने सामना
टोळीवाल्यांचे आक्रमण, १९६२ चे चीन तर १९६५ चे पाक युद्ध, १९७१ मध्ये बांगलादेश निर्मितीचा संग्राम, १९९९ चे कारगिल युद्द ही भारताने परतून लावलेली सामरिक संकटे.

तळपते काश्मीर
भारतातील सुरक्षाविषयक समस्येच्या केंद्रस्थानी काश्मीरच. मोदी सरकारने  २०१९ मध्ये काश्मिरातील ३७० कलम रद्द करत राज्याचे त्रिभाजन केले.

अंतर्गत प्रश्नांना तोंड
माओवाद्यांचा उत्पात वगळला तर देशातील बहुतेक सगळ्या हिंसाचाराला काश्मीर वाद, त्यातून उदभवणारे हिंदू-मुस्लीम वितुष्ट, बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न अशा पाकिस्तानशी निगडीत मुद्यांचीच पृष्ठभूमी आहे.

हम भी कुछ कम नहीं...
भारत हादेखील 
चीनप्रमाणेच जगातील प्रमुख सामरिक शक्ती. जगातील पहिल्या पाचमध्ये. संरक्षणखर्चात चीन दुसऱ्या, भारत तिसऱ्या स्थानी. सैन्यबळ, लढाऊ विमाने, लढाऊ वाहने, रॉकेट प्रोजेक्टर्समध्ये चीन पुढे. रणगाडे भारताकडे अधिक.

सुरक्षेचे भविष्य काय?
- सायबर हल्ले, ड्रोनचा अधिक वापर, जैविक युद्धाची भीती. 
- आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एअर-लँड-सी मोबाईल प्लॅटफॉर्मचा वापर, अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीचा वापर शक्य. 
- माओवादी किंवा अन्य फुटीर संघटनांच्या हाती अत्याधुनिक शस्त्रे जाण्याची भीती. 
 

Web Title: Independence Day 2021: Headaches Pakistan, China; But India is ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.