परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पसंती बदलली; अमेरिका, ब्रिटन नव्हे आता जर्मनी, रशिया, फ्रान्सकडे कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:45 IST2025-04-02T10:34:49+5:302025-04-02T10:45:05+5:30
Foreign Education: अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील स्थलांतरितविरोधी धोरणांचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवरही दिसून येत आहे. व्हिसा धोरणे कडक केल्यामुळे, गेल्या वर्षी परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे १५% घट झाली, ज्यामध्ये कॅनडामध्ये ४१% इतकी सर्वांत मोठी घट झाली.

परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पसंती बदलली; अमेरिका, ब्रिटन नव्हे आता जर्मनी, रशिया, फ्रान्सकडे कल
नवी दिल्ली - अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील स्थलांतरितविरोधी धोरणांचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवरही दिसून येत आहे. व्हिसा धोरणे कडक केल्यामुळे, गेल्या वर्षी परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे १५% घट झाली, ज्यामध्ये कॅनडामध्ये ४१% इतकी सर्वांत मोठी घट झाली.
संसदेत नुकत्याच सादर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की २०२४ मध्ये ७५९,०६४ भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात गेले होते, तर २०२३ मध्ये ही संख्या ८९२,९८९ आणि २०२२ मध्ये (कोविड साथीच्या काळात) ७५०,३६५ होती. दुसरीकडे, जर्मनी, रशिया, फ्रान्स, आयर्लंड व न्यूझीलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे; अमेरिका, ब्रिटन, कॅनडा व ऑस्ट्रेलिया देशांच्या नोंदणीमध्ये घट झाली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांनी चीनला टाकले मागे...
फेब्रुवारी २०२५ मध्ये, भारताने ऑस्ट्रेलियन विद्यार्थी व्हिसाच्या बाबतीत पहिल्यांदाच चीनला मागे टाकले. या काळात विद्यार्थी व्हिसा मंजूर करणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल स्थानावर होता. या कालावधीत २,७३४ हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन व्हिसा देण्यात आला, तर जानेवारीमध्ये हा आकडा २,३९८ होता, तर चीनला एकूण ३,५७३ व्हिसा देण्यात आले.
७२% विद्यार्थी तीन देशांतील...
भारतातील ७२% विद्यार्थी कॅनडा, अमेरिका आणि यूके आणि या तीन देशांमध्ये जात असून भारतीय विद्यार्थ्यांचे पहिल्या तीन क्रमांकाचे पसंतीचे देश आहेत. भारतीय विद्यार्थी वेगळ्या देशांना प्राधान्य देत आहे.