आधुनिक गुलामगिरीचा आविष्कार
By Admin | Published: December 9, 2014 01:20 AM2014-12-09T01:20:22+5:302014-12-09T01:20:22+5:30
योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करतानाच श्रमाला मोल देण्याची प्रवृत्ती समाजात रूजली, तरच ही नवी आणि आधुनिक स्वरूपाची गुलामगिरी नष्ट होईल.
आपल्याकडे कष्टकरी असंघटित आहेत. त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या नावाखाली सरकारकडून कल्याणकारी योजना आखल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात या कष्टक:यांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचे द्रष्टोत्पत्तीस येत नाही. या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करतानाच श्रमाला मोल देण्याची प्रवृत्ती समाजात रूजली, तरच ही नवी आणि आधुनिक स्वरूपाची गुलामगिरी नष्ट होईल.
गभर मानवाधिकाराविषयी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती होत असतानाच आधुनिक गुलामगिरीच्या बेडय़ाही घट्ट होत चालल्या आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्ञात असलेला भारत एकीकडे तरुणांचा देश बनला असताना, तो आधुनिक गुलामगिरीच्या विळख्यात अडकला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काळानुरूप ब:याच गोष्टीत परिवर्तन होत असले, तरी प्रवृत्ती आणि अपप्रवृत्ती कितपत बदलतात, याबद्दल शंका वाटते.
मध्ययुगाला अंधारयुग असे संबोधले जाते; कारण त्यात सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन करकचून बांधणारी आणि करपवून टाकणारी समाजव्यवस्था होती. स्त्रिया व पददलितांवर लादलेले दुय्यमत्व अंधश्रद्धा गुलामगिरीही त्या व्यवस्थेची वैशिष्टय़े होती. प्रस्तुत प्रथा नष्ट झाली व आपण आधुनिक युगाकडे मार्गक्रमण करीत आहोत, असे कितीही उच्च स्वराने म्हटले जात असले, तरी गुलामगिरीसारख्या जुलमी प्रथांचे अवशेष नष्ट झाले, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. गरीब आणि असहाय व्यक्तींना, मुलांना आणि स्त्रियांना गुलामासारखे वागवण्याची पद्धत जगात आजही पूर्वीप्रमाणोच कार्यरत असून, यामध्ये खितपत पडलेल्यांची सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. जगातील 3 कोटी 58 लाख नागरिक गुलामगिरीचे जिणो जगत असून, त्यामध्ये सुमारे एक कोटी 4क् लाख भारतीयांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियातील वॉक फ्री फाउंडेशन या मानवाधिकार संस्थेने केलेल्या पाहणीतून ही माहिती प्रकाशात आली आहे. मागील वर्षी वॉक फ्रीने केलेल्या पाहणीत 2 कोटी 98 लाख नागरिक गुलाम होते, तर यंदा ही संख्या 3 कोटी 58 लाख एवढी वाढली आहे. गुलामगिरी म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र दृश्यमान आहे, तशा प्रकारची गुलामगिरी या पाहणीत अपेक्षित नाही. ही गुलामगिरी आधुनिक स्वरूपाची आहे. शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे चरितार्थासाठी वणवण फिरणारी मुले, बालवयात विवाह बंधनात जबरदस्तीने अडकविल्या जाणा:या मुली, लैंगिक, सामाजिक, धार्मिक शोषणाला बळी पडलेल्या महिला आणि बालके, कर्जाच्या ओङयापायी आयुष्यभर कमी पगारात ङिाजावे लागणारे कर्मचारी, असंघटित मजूर, शेतमजूर, कामाच्या ठिकाणी विविध प्रकारच्या शोषणाला बळी पडणारे घरगुती नोकर, असे आधुनिक गुलामगिरीचे विविध प्रकार आहेत. हे वास्तव अधिक भयाण आणि भयचकित करणारे आहे, असे वॉक फ्री फाउंडेशनच्या अहवालामध्ये स्पष्टपणो नमूद केले आहे.
गुलामगिरीची प्रथा हे मानवाच्या इतिहासातील एक काळेकुट्ट प्रकरण आहे. माणसाची खरेदी-विक्री करणो त्याच्या शरीरावर आणि मनावरही मालकी हक्क प्रस्थापित करणो ही एक भयानक प्रथा अस्तित्वात होती. भारत, चीन, पाकिस्तान, रशिया, उझबेकिस्तान, नायजेरिया, काँगो, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड या देशांमध्ये सर्वाधिक 61 टक्के गुलामी आहे, असे हा अहवाल दर्शवितो.
महात्मा गांधी यांना 1893 साली दादा अब्दुल्ला यांच्या व्यापारी कंपनीचा खटला चालवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत पाचारण करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांना स्वत:लाही गो:यांच्या अन्याय, अत्याचाराला तोंड द्यावे लागले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय आणि कृष्णवर्गीय नागरिकांना संघटित करून त्यांनी 1894 साली नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. हॉटेल, क्लब, बस, रुग्णालये, शाळा, कॉलेज वगैरे ठिकाणी कृष्णवर्णीयांसाठी निश्चित केलेल्या राखीव जागेवरच त्यांनी बसावे, असा आदेशा गो:या शासनाने काढला. दरबान शहरातील समुद्र किना:यावर लिहिलेल्या फलकावर ‘कृष्णवर्णीय आणि कुत्री यांना प्रवेश निषिद्ध’ हा फलक वाचल्यानंतर महात्मा गांधी यांचा संताप अनावर झाला. 19क्6 मध्ये गो:या शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांनी ओळखपत्र बाळगणो सक्तीचे केले होते. या व्यतिरिक्त कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यावर अनेक र्निबध घातले. या अन्यायाच्या विरुद्ध महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी लढा दिला. तेथे विजय संपादन केल्यानंतर 1915 मध्ये महात्मा गांधी भारतात परत आले.
जगातील महासत्ता असलेल्या आणि अन्य देशांच्या अंतर्गत समस्यांमध्ये सातत्याने हस्तक्षेप करून त्यांना शहाणपणाचे धडे देणा:या अमेरिकेत सारे काही आलबेल नाही. तेथेही वर्णभेद आणि वंशभेद असून, कृष्णवर्णीयांवर अन्याय, अत्याचार केला जातो, हे फर्गसन शहरात पेटलेल्या हिंसाचाराच्या वणव्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. फर्गसनमधल्या रस्त्यावर भर दिवसा डॅरेन विल्सन या गो:या पोलीस अधिका:याने मायकेल ब्राऊन या 18 वर्षाच्या निशस्त्र कृष्णवर्णीय मुलाला गोळ्या घालून ठार मारले. विल्सनने त्याच्यावर 12 गोळ्या झाडल्या. त्यातील 7 गोळ्या मायकेलच्या शरीरात घुसल्या. त्यातील एक गोळी तर विल्सनने काही फुटांवरून थेट मायकेलच्या कपाळात मारली होती. तरीही एक महिन्याच्या चौकशीनंतर सुसंगत आणि सबळ पुराव्या अभावी सेंट लुईस कौंटीच्या ग्रँड ज्युरीने त्या गो:या पोलीस अधिका:याची निदरेष मुक्तता केली. मायकेलचा खून झाला तेव्हा तेथे जमलेल्या आणि फर्गसनमध्ये बहुसंख्येने असलेल्या कृष्णवर्णीयांनी संतप्त निदर्शने करत जाळपोळ सुरू केली होती. आठवडाभर सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची लक्षणो दिसत नाही, असे निदर्शनास आल्यानंतर ‘‘त्या गो:या पोलीस अधिका:याची चौकशी केली जाईल,’’ असे अमेरिकन शासनातर्फे घोषित करण्यात आले.
आपल्याकडे कष्टकरी असंघटित आहेत. त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या नावाखाली सरकारकडून कल्याणकारी योजना आखल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात या कष्टक:यांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचे द्रष्टोत्पत्तीस येत नाही. या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करतानाच श्रमाला मोल देण्याची प्रवृत्ती समाजात रुजली, तरच ही नवी आणि आधुनिक स्वरूपाची गुलामगिरी नष्ट होईल.
लक्ष्मण वाघ
सामाजिक विषयांचे अभ्यासक