अंधत्व टाळता येणे शक्य आहे
By admin | Published: October 9, 2014 12:51 AM2014-10-09T00:51:28+5:302014-10-09T00:51:28+5:30
गभर आॅक्टोबर महिन्यातील दुसरा गुरुवार म्हणजे या वर्षी ९ आॅक्टोबर हा दिवस ‘वार्षिक दृष्टी दिन’ म्हणून पाळला जातो. यामागील हेतू हा ‘अंधत्व व दृष्टिदोष’ या विषयावर जनजागरण करणे हा होय.
डॉ. मधुसूदन झंवर ( अध्यक्ष व प्रमुख नेत्रतज्ज्ञ पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान)
गभर आॅक्टोबर महिन्यातील दुसरा गुरुवार म्हणजे या वर्षी ९ आॅक्टोबर हा दिवस ‘वार्षिक दृष्टी दिन’ म्हणून पाळला जातो. यामागील हेतू हा ‘अंधत्व व दृष्टिदोष’ या विषयावर जनजागरण करणे हा होय.
जागतिक अंधत्व निर्मूलन संघटना (कअढइ) हे काम १९९५ पासून करीत आहे. परंतु, या विषयाकडे २००० सालानंतर खऱ्या अर्थाने जगाचे लक्ष गेले, ते श््र२्रङ्मल्ल 2020 या ‘सर्वांना दृष्टी’ हे लक्ष्य जाहीर केल्यानंतर. बीजिंगमधील जागतिक परिषदेत ही घोषणा झाली, तिचा मी साक्षीदार आहे हे मी माझे भाग्य समजतो.
या कार्यक्रमामध्ये ‘जागतिक आरोग्य संघटना’ या शिखर संस्थेने प्राधान्याने लक्ष घातल्यामुळे या कार्यक्रमास अधिक गती मिळाली आहे. ‘प्रत्यक्ष कार्यक्रम राबविणे’ या घोषवाक्याने व ‘काहीतरी करून दाखवू या’ या लक्ष्यामुळे या कार्यक्रमात सर्व जगाचा खऱ्या अर्थाने सहभाग झाला आहे. ‘यापुढे टाळण्यासारख्या अंधत्वास संपूर्ण रजा देऊ या’ असा संदेशही दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सभासद राष्ट्रांनी खालील तत्त्वावर आपापल्या देशातील गरजा व प्राध्यान्याप्रमाणे कार्यक्रम राबवावेत असा आदेश दिला आहे.
१) जनजागरणाचे कार्यक्रम- ज्यामध्ये अंधत्वाची जाणीव व कारणे, दृष्टिदोषांची कारणे व उपाय यावर भर असावा. २) राष्ट्रीय अंधत्व निर्मूलनामध्ये आरोग्य संघटनांचा सहभागी करणे. ‘अंधत्व निर्मूलन’ हा सर्वांगीण आरोग्याचा महत्त्वाचा भाग मानून अधिक प्रयत्न करणे. तो वेगळा कार्यक्रम म्हणून दुर्लक्षित होऊ नये. ३) सर्व उपयुक्त कार्यक्रमांत समाजाचा सर्वांगीण सहभाग असला तरच तो यशस्वी ठरतो. त्यामुळे त्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणे. या दिनाच्या निमित्ताने जगाला संदेश (माहिती) देणे.
जगात २८.५ कोटी लोक अंधत्व व तीव्र दृष्टिदोषाने पीडित आहेत. या पैकी ३.९ कोटी संपूर्ण अंध (ज्यांच्यावर उपचार शक्य नाही) व २.४६ कोटी लोक अर्धअंध किंवा तीव्र दृष्टिदोषाचे वेळी आहेत. या सर्वांचे पुनर्वसन हा मोठा यक्षप्रश्न आहे. ९०% अंध हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल (इढछ) प्रकारात मोडतात. जगातील ९०% अंध लोक हे प्रगतशील देशांत (आशिया व आफ्रिका खंडात) आहेत. ६५% दृष्टिदोष असणारे ५० वर्षांवरील गटांतील आहेत. ही लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी २०% आहे. आरोग्य सुविधांमुळे, वाढते वयोमान यामुळे वृद्धांची संख्या वाढत जात आहे व या प्रकारच्या अंधत्वाचे प्रमाण जलद गतीने वाढत आहे. जवळ-जवळ २ कोटी लहान मुले दृष्टिदोषांनी ग्रस्त आहेत. २० लाखांच्यावर मुले पूर्ण अंध आहेत हे दुदैव.
८०% अंधत्व हे टाळता येते किंवा योग्य वेळी योग्य उपचाराने बरे करता येते. सर्व प्रतिबंधक आरोग्य उपायांमध्ये, कमी खर्चात व जास्तीत जास्त फायदेशीर व हमखास उपयुक्त उपाय हे अंधत्व निर्मूलनामध्ये आहेत. (म्हणूनच डोळ्यांची तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे सर्वाधिक व सर्वत्र होतात.) गेल्या २० वर्षांमध्ये शास्त्रीय प्रगतीमुळे जंतुसंसर्गाने येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तरीही दर १ मिनिटाला जगभर कोणीतरी अंध होत आहे आणि दर ५ मिनिटाला एखादे लहान मूल अंध होत आहे. ही वस्तुस्थिती आहे.
अंधत्वाची मूलभूत कारणे गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, गैरसमज, अपुऱ्या आरोग्य नेत्रसेवेच्या सुविधा, अपुऱ्या तज्ज्ञ सोयी, अपुरी दळणवळण व्यवस्था, पाणीटंचाईमुळे असणारी अस्वच्छता, अघोरी व घरगुती उपचार ही आहेत. हे सर्व टाळणे शक्य आहे. विकासावरच हे अवलंबून आहे.
येत्या ५ वर्षांत म्हणजे २०१९ पर्यंत टाळण्यासारख्या अंधत्वाचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १) बळकट व सर्वोपयोगी डोळ्यांच्या आरोग्याची व्यवस्था उभी करणे. २) सर्वेक्षणाद्वारे कारणे व प्रमाण यांचा अद्ययावत अभ्यास करणे. ३) तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, आॅप्टीमेट्रिस्ट, सहायक यांना प्रशिक्षण देऊन तयार करणे, हे उपाय आहेत. त्यासाठी सर्वांगीण नेत्रसेवेची प्राथमिक व उच्च पातळीवर व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे.
भारतात गरीब, आदिवासी, डोंगरदऱ्यांतील वस्ती, दुर्गम भाग, अपंग, महिला, लहान मुले या सर्वांपर्यंत प्राथमिक संरक्षण व्यवस्था पोहोचण्याची जबाबदारी देशांच्या आरोग्य विभागाची ठरते. पैशाअभावी कोणाही गरिबाला नेत्रसेवा मिळाली नाही असे घडू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
या आठवड्यामध्ये शासकीय व अशासकीय संस्थांनी एकत्रित येऊन निरनिराळे कार्यक्रम विभागून घ्यावेत म्हणजे पुनरावृत्ती होणार नाही. यात व्याख्याने, प्रदर्शने, पथनाटके, चित्रकला स्पर्धा, मोतिबिंदू, मधुमेहाचे नेत्रपटलावरील परिणाम, पटलांचे आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेची यशस्विता, लहान मुलांतील आजार, डोळ्यांच्या इजा, आहार व डोळ्यांचे आरोग्य, समज-गैरसमज, नेत्रदान, तिरळेपणा व डोळ्यांतील प्लॅस्टिक सर्जरी अशा अनेक विषयांवर ऊहापोह होणे जरुरीचे आहे. मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचा दर्जा उत्कृष्ट ठेवणे आवश्यक आहे.
नेत्रतज्ज्ञ शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक, आरोग्य संस्था, सर्वांगीण व्यवस्था देणारी रुग्णालये, चष्मेवाले, आॅप्टीमेट्रिस्ट, पालक संघ, ज्येष्ठ नागरिक संघटना, हास्य क्लब, सेवाभावी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती व संस्था, औद्योगिक संस्थाने, आयटी उद्योग, सर्वांचा यात सहभाग अत्यावश्यक आहे. तसे झाले तरच हा कार्यक्रम यशस्वी ठरू शकतो.