जनमन - डोक्यावर हेल्मेट असले तरी रस्त्यावरच्या खड्ड्यांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:29 AM2022-05-27T06:29:36+5:302022-05-27T06:30:14+5:30

पावसाळ्याच्या तोंडावर हेल्मेटसक्ती घोषित करून खड्ड्यांच्या मूळ प्रश्नाला बगल देण्यात आली आहे, असे वाटते. बाह्यतः दिसायला दुचाकीस्वारांची काळजी; पण खरे कारण खड्ड्यांचे आहे!

Janman - What about potholes on the road with helmets on the head? | जनमन - डोक्यावर हेल्मेट असले तरी रस्त्यावरच्या खड्ड्यांचे काय?

जनमन - डोक्यावर हेल्मेट असले तरी रस्त्यावरच्या खड्ड्यांचे काय?

Next

दुचाकीवरील सहप्रवाशालाही मुंबईत हेल्मेटचा वापर  करावा लागणार आहे. हे झाले मुंबईचे आणि राज्याचे काय?  ‘गंभीर इजा न होणे’ हा  केंद्रबिंदू लक्षात घेतला, तर नियम सर्वांसाठी समान का नाही? दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटसक्ती यापूर्वीही होती, ती मध्येच सोडून दिली, आता पुन्हा हेल्मेटसक्तीचे भूत. हा निव्वळ खुळचटपणा आहे. पावसाळ्यातल्या खड्ड्यांचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसतो.  हेल्मेटसक्ती आहे;  पण ज्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना प्रचंड मनस्ताप होतो त्याची जबाबदारी कोण घेणार? पाऊसच इतका पडतो की, रस्त्यांवर खड्डे हे पडणारच, असा कोडगेपणा अंगी भिनला असल्याने केवळ वरवरचे उपाय शोधून लोकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. खड्ड्यांमुळे दुचाकी स्वारांसंदर्भात काही दुर्घटना घडल्यास त्यावरून रणकंदन माजू नये, या भीतीपोटी पावसाळ्याच्या तोंडावर हेल्मेटसक्ती घोषित करून खड्ड्यांच्या मूळ प्रश्नाला बगल देण्यात आली आहे, असे वाटते. बाह्यतः दिसायला दुचाकीस्वारांची काळजी; पण खरे कारण खड्ड्यांचे आहे!  

राज्यात सर्वत्र  हेल्मेटचा वापर न करणारे दुचाकीवाले वाहतूक पोलिसांच्या पुढून ये-जा  करतात.  अशाने हेल्मेटसक्तीचे सूत्र कसे अमलात आणले जाईल? जिथे दुचाकीस्वार एका हेल्मेटचाही उपयोग करत नाहीत, तिथे ते दोन हेल्मेटचा उपयोग करतील का? या प्रश्नाचे ‘हो’, असे खात्रीपूर्वक उत्तर वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर अवलंबून असणार आहे. हेल्मेट न घातल्यास तीन महिन्यांसाठी चालक अनुज्ञप्ती निलंबित करण्याची तरतूद आहे. मात्र, त्या दुचाकीस्वाराला कुठल्याही पेट्रोल पंपावर तीन महिने पेट्रोल मिळणार नाही. यासाठी काय उपाययोजना करता येईल? 
 हेल्मेटसक्तीचे सूत्र आज जरी पुन्हा चर्चेत आले असले तरी भरधाव वेगाने दुचाकी चालवणे ही अत्यंत गंभीर समस्या वाढत चालली आहे. जी स्वतःसह दुसऱ्याचेही नाहकपणे प्राण घेणारी ठरत आहे.
- जयेश राणे, मुंबई

Web Title: Janman - What about potholes on the road with helmets on the head?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.