जोवर आहे स्मरण....

By admin | Published: January 8, 2017 01:27 AM2017-01-08T01:27:39+5:302017-01-08T01:27:39+5:30

माणूस गेल्यानंतर त्याचं काय होतं? तो कुठे जातो, हा प्रश्न अनादी काळापासून माणसाला छळतो आहे, पण त्याचं उत्तर त्याला मिळालेला नाही. हा शोध न संपणारा आहे.

Jover is remembered .... | जोवर आहे स्मरण....

जोवर आहे स्मरण....

Next

- रविप्रकाश कुलकर्णी

माणूस गेल्यानंतर त्याचं काय होतं? तो कुठे जातो, हा प्रश्न अनादी काळापासून माणसाला छळतो आहे, पण त्याचं उत्तर त्याला मिळालेला नाही. हा शोध न संपणारा आहे.
पण त्यातूनच समाधान वाटावे, असे त्याला एक उत्तर मिळाले. अशी माणसं तुमच्या मनात जाऊन राहातात. त्याचं स्मरण असेपर्यंत ती राहातात, नाहीतर विस्मरणात जातात. त्यामुळेच म्हटलं जातं, जोवरी आहे स्मरण, त्याला काय करील मरण?

मनाच्या कल्पनेनं कल्पित, इष्ट आराध्य व्यक्तीच म्हणा, शक्तीच म्हणा, त्याची पूजा तुम्ही इच्छिता, त्याप्रमाणे करायची, म्हणूनच मानसपूजेला सर्वश्रेष्ठ मानला गेलं आहे, पण सर्वसामान्य माणसाचं मन चंचल असतं. त्याला हा मनाचा खेळ झेपण्यासारखा नसतो. त्याला सर्व गोष्टी समोर दिसेनाशा वाटतात. त्याच्याप्रमाणे, तो कोडकौतुक करतो-करून घेतो. भक्तांच्या प्रमाणेच त्याचे देव असतात, असं जे म्हटलं, ते या अर्थात. जे देवांच्याबाबत तेच मग हाडामांसाच्या माणसाबाबत होऊ पाहातं. राहतो फरक तो कमी-जास्त करण्याबाबत. श्रद्धेने केलेले स्मरण हा मुळातला मानसपूजेचाच प्रकार, पण हे सगळ्यालाच कसं सोसणार आणि झेपणार? त्यातून पिंड, तर्पण ही कल्पना सुरू झाली. पुढे मूर्ती, फोटो प्रकार प्रगत अवस्थेप्रमाणे वाढत गेला.
सिनेमा, चलत चित्रीकरण याचे स्मरण ही गोष्ट इथे येऊन ठेपला आहे.
आपल्या आजूबाजूला असणारे पुतळे, स्मारके, स्थान संस्थान अशा पुढच्या गोष्टी येतात. त्याची अवस्था काय आहे, हेदेखील पाहायचे कष्ट किती घेतात? त्याचा परिणाम वगैरे गोष्टी फार पुढच्या....
त्यात पुन्हा काही पुतळ्यांचे उद्घाटन होत आहे, तर दुसरीकडे नवे पुतळे उभारण्याची लाटच सुरू झाली आहे. याची संगती लावायची कशी?
हे सगळं कलाबाह्यतेकडे झुकत आहे. कलेऐवजी अ-कलाकडे चालत आहे, असे वाटायला लागतं. अलीकडे पुन्हा-पुन्हा हा विचार मनात येतो. त्याच कारणही तसेच आजूबाजूला घडतं-बिघडतं आहे म्हणून.
गायक महंमद रफी यांचं स्मारक ते जाऊन छत्तीस वर्षे झाल्यानंतर, वान्द्रे येथील लकी हॉटेलसमोरील चौकात उभारलं आहे, तसेच वान्द्रे येथील सोळाव्या रस्त्याला ‘महंमद रफी मार्ग’ नाव दिलं गेलं आहे. चतुरस्त्र अशा महंमद रफीच्या स्मरणासाठी केलेल्या या उपक्रमाला विरोध करण्याचं काहीच कारण नाही, पण दगड-विटाच्या या स्मारकाबरोबरच रफीचं खरं स्मारक सूर स्मारक असायला हवं असं वाटतं. महंमद रफीबाबत सर्व काही, ज्यात काही वादग्रस्त गोष्टी असू शकतात. हे सर्व एकत्रित मिळण्याची व्यवस्था करता येऊ शकते का? कुणीतरी त्याची सुरुवात करायला हवी.
सी. रामचंद्र यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्यावर त्यांचं स्मारक आहे. म्हणजे काय ते जाऊन पाहा, म्हणजे कळेल... राहता राहिले ते तुम्ही-आम्ही. तुमच्या-आमच्या भावविश्वाचा हा अविभाज्य भाग झालेला असतो, पण स्मारक वगैरे आपल्या कल्पनेतच राहतं. तेव्हा मग म्हणायचं , जोवरी आहे स्मरण, त्याला कसले आहे मरण? स्वत:चंच समाधान असंच करून घ्यायचं का?

घडलं ते...
आपल्या आजूबाजूला असणारे पुतळे, स्मारके, स्थान संस्थान अशा पुढच्या गोष्टी येतात. त्याची अवस्था काय आहे, हेदेखील पाहायचे कष्ट किती घेतात? गायक महंमद रफी स्मारक ते जाऊन छत्तीस वर्षे झाल्यानंतर, वान्द्रे येथील लकी हॉटेलसमोरील चौकात स्मृतिशिल्प रूपातउभारलं आहे,दगड-विटाच्या या स्मारकाबरोबरच रफीचं खरं स्मारक सूर स्मारक असायला हवं असं वाटतं.
लिहिता-लिहिता आठवलं, आता सी. रामचंद्र यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्यावर त्यांचं स्मारक आहे. म्हणजे काय ते जाऊन पाहा, म्हणजे कळेल...!
तर दुसऱ्या कोपऱ्यात वसंत देसाई यांचं स्मारक आहे. तेथे जी वीणा आहे, त्याच्या तारा गायब होतात, असे नेहमीच होत म्हणे. याला काय म्हणावे?

Web Title: Jover is remembered ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.