तर लगेच हात पिस्तुलावर ठेवायचा!

By अतुल कुलकर्णी | Published: November 29, 2017 12:17 AM2017-11-29T00:17:28+5:302017-11-29T00:17:56+5:30

नमस्कार. काल आपण बिबट्याला मारायला स्वत: मैदानात उतरलात आणि आमची कॉलर एकदम टाईट झाली भाऊ. मंत्री असावा तर असा... एका चॅनलने जेम्सबॉन्डचे म्यूझिक लावून आपण कसे चालत गेलात, कशी पोज घेतली हे दाखवलं.

 Just put the hand on the pistol! | तर लगेच हात पिस्तुलावर ठेवायचा!

तर लगेच हात पिस्तुलावर ठेवायचा!

Next

प्रिय गिरीशभाऊ महाजन,
नमस्कार. काल आपण बिबट्याला मारायला स्वत: मैदानात उतरलात आणि आमची कॉलर एकदम टाईट झाली भाऊ. मंत्री असावा तर असा... एका चॅनलने जेम्सबॉन्डचे म्यूझिक लावून आपण कसे चालत गेलात, कशी पोज घेतली हे दाखवलं. आपल्याला एकदम भारी वाटलं बघा भाऊ. बिबट्या पण पळून गेला ना भाऊ आपला जोष पाहून. ते पाहून मला एक आयडिया सुचलीय... आपण आपल्या आॅफिसात खोटं खोटं पिस्तूल टेबलावर ठेवत जा. पिस्तूल पाहून बिबट्या जर शेपूट घालून पळून जात असेल तर अधिकाºयांची काय अवस्था होईल विचार करा भाऊ... पटापट कामं करतील ना सगळे. मी तर कालपासून विचार करून राहिलो भाऊ... राज्यात सिंचन क्षमता वाढत कशी नाही, असं तुम्ही नुस्ते पिस्तुलावर हात ठेवून विचारा आणि बघा, कशी सिंचन क्षमता वाढते ते... जलसिंचन प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता जर का अधिकाºयांनी अडवून ठेवल्या की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा... प्रकल्प पूर्ण झाल्यावर बिल मिळालंच पाहिजे असा आपला नियम. पण अधिकारी तो पाळत नाहीत. तेव्हा मंत्री कार्यालयातून खासगी सचिवांचा फोन आल्याशिवाय जर का परस्पर बिल काढलं की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा... कोणत्या प्रकल्पाला किती निधी द्यायचा, कोणता प्रकल्प आधी घ्यायचा, कोणता नंतर घ्यायचा या सगळ्या गोष्टी कितीही मोठा अधिकारी असला तरी (अगदी राज्याचे वित्त विभागाचे सचिव असले तरी) त्यांनी आधी आपल्या खासगी सचिवाशी चर्चा करायची... ती नाही केली की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा...
अधिकाºयांच्या बदल्या पूर्णपणे आपल्या अधिकारातला विषय. त्यात जर का कोणी हस्तक्षेप केला किंवा आपण सांगितलेल्या बदलीला कोणी विरोध केला की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा...
आपण एवढे आरोग्य शिबिरं भरवतो, हजारो रुग्णांना दिलासा देण्याचे काम करतो. मुंबईहून एवढे डॉक्टर्स नेतो. ग्रामीण भागात चांगले उपचार मिळावेत म्हणून आपण चांगल्या डॉक्टर्सचा आग्रह धरतो, कधी ते येतात, कधी येत नाहीत. यापुढे कोणी येत नाही म्हणालं की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा... भाऊ मला तर फार भारी वाटू लागलंय. एकदा करुनच बघा... बाकी भेटल्यावर बोलू.(atul.kulkarni@lokmat.com) 

Web Title:  Just put the hand on the pistol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.