किरण बेदींनी पायताणाशपथ जागवली मिसाईल मॅन डॉ. कलामांची आठवण...

By चंद्रशेखर कुलकर्णी | Published: September 1, 2017 04:04 PM2017-09-01T16:04:14+5:302017-09-01T16:07:32+5:30

किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ!

Kiran Bedi reminds Missile Man Dr. Kalam | किरण बेदींनी पायताणाशपथ जागवली मिसाईल मॅन डॉ. कलामांची आठवण...

किरण बेदींनी पायताणाशपथ जागवली मिसाईल मॅन डॉ. कलामांची आठवण...

googlenewsNext
ठळक मुद्देपाय आणि पर्सनॅलिटी यांचं नातं अतूट आहे. म्हणी आणि वाकप्रचारात त्याचं दिसणारं प्रतिबिंब त्याचीच तर साक्ष देतंडोक्यावर काळ्याचे पांढरे होणे, हे अनुभवाचं तर पायात होणं आर्थिक समृद्धीचं लक्षण ठरत होतंपण त्या पावलांवर लोळण घेणारी लक्ष्मी काळी असते, की शुभ्रधवल, हे कोडं ज्याचं त्यानं सोडवलेलं बरं

किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ!
पाय आणि पर्सनॅलिटी यांचं नातं अतूट आहे. म्हणी आणि वाकप्रचारात त्याचं दिसणारं प्रतिबिंब त्याचीच तर साक्ष देतं. सुलक्षण म्हणा, की अवलक्षण म्हणा, त्याचा संबंध पावलांशी जोडला जातो. फरक इतकाच, की कुणी पाय म्हणतं तर कुणी पावलं म्हणतं. असे हे पाय जपणाºया जोड्यांना सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठाही बहुधा त्यातूनच मिळाली असणार. हा हा म्हणता पादुका अन् खडावांचा जमाना गेला. त्यासरशी पादत्राणांचं पावित्र्यही वैकुंठवासी झालं. तरीही पाय, पादत्राणं अन् पर्सनॅलिटी हा त्रिवेणी संगम आजही टिकून आहे. पुणेरी जोडे, कोल्हापुरी, जोधपुरी अशी गावा-गावांशी जुळलेली जोड्यांच्या नात्याची वीणही घट्ट आहे. पायीची दासी होणाºया पादत्राणांची काही खासियत आहे.
असं म्हणतात, की चपलेवरनं माणसाची पारख होते. पॅरागॉनपासून बाटापर्यंत आणि नाइकीपासून एसिक्सपर्यंत असंख्य ब्रॅण्ड सनी जूत्यांच्या धंद्यात व्यवस्थित पाय पसरलेत. पण त्यातही चपला, त्यांचे रंग अन् पोत लक्षात राहतातच. मिसाल के तौर पर सांगायचं तर पांढरी चप्पलच बघा ना! तसं पाहिलं तर शांती, शुचिता अन् विरक्तीचं प्रतीक ही पांढºया रंगाची ओळख. ते डोक्याच्या बाबतीत खरंही आहे. हा रंग डोईवरी गेला की गांधीवादाची झाक येते पण पायात आला, की नाथाघरची उलटी खूणच जणू ! वेगळ्या अर्थानं पांढºया पायाची ही माणसं खासच असतात. यांचा सेल फोन असतो, उजव्या हातात पण त्याला लावलेला कान मात्र असतो डावा! ही अशी माणसं मंत्रालयातल्या लांबच लांब लॉबीपासून दुबईतल्या मॉलपर्यंत कुठंही दिसू शकतात. त्यांच्या पर्सनॅलिटीतही बऱ्यापैकी साम्य असतं. ममत्व, आदर, आस्था अशा ‘सोल’फुल भावना त्यांच्याप्रती निर्माण नाही होत. उलट काहीसा धाक, दरारा, दबदबा असलंच काहीसं मनात येतं. खरं म्हणाल, तर पायाच्या बाबतीतही गोºया कातड्याचं प्रेम असलेल्या मंडळींची दुनिया निराळीच असते.
आपल्या मनात आणि व्यवहारात काहीही काळंबेरं नाही, हे इतरांवर ठसवण्यासाठी यांना पायातल्या चपलेच्या पांढऱ्या रंगाचा आधार वाटतो. वन्स अपॉन अ टाइम मुंबईतल्या अंडरवर्ल्डला या रंगाचं भलतं आकर्षण होतं. पायात पांढरी चप्पल असलेल्या माणसाच्या हाताला मोगऱ्याचा गजरा असणार, असं उगाचच राहून राहून मनात येतं. हाजी मस्तानपासून वरदाभाईपर्यंत अनेकांना या पांढऱ्या पायांचं आकर्षण होतं.
डोक्यावर काळ्याचे पांढरे होणे, हे अनुभवाचं तर पायात होणं आर्थिक समृद्धीचं लक्षण ठरत होतं. पण त्या पावलांवर लोळण घेणारी लक्ष्मी काळी असते, की शुभ्रधवल, हे कोडं ज्याचं त्यानं सोडवलेलं बरं. पायातला हा पांढरा रंग रगेल आणि रंगेलपणाशी पाट लावतो, हे बरीक खरं...
किरण बेदींनी प्रसिद्ध केलेला डॉ. कलामांच्या चपलांची जातकुळी याच्या नेमकी विरुद्ध भावना जागवते. पायात इतकी साधी चप्पल घालणाऱ्या या वैज्ञानिकानं अवकाश कवेत घेण्याची जिद्द भारतीयांच्या मनात जागवली. त्यासाठी अग्निपंखांचं बळही दिलं. त्यांच्या या चपला पाहिल्यावर पुलंचं एक वाक्य आठवलं...
वंदन करावे असे पाय आता उरले नाहीत...

Web Title: Kiran Bedi reminds Missile Man Dr. Kalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.