वाचनसंस्कृती उदंड होवो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 04:19 AM2018-01-05T04:19:10+5:302018-01-05T04:19:23+5:30

मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आगीत खाक झालेले वाचनालय पुन्हा सुरू केले़ यासाठी विद्यार्थ्यांनी दोन कोटी रुपये खर्च केले़ विद्यार्थ्यांची ही कामगिरी वाचन संस्कृतीचे आंदोलन करणा-यांसाठी नक्कीच सुखावह म्हणावी अशी आहे. आजची पिढी केवळ मोबाइलमध्ये गुंतली आहे़, ही पिढी ‘लव्ह’, ‘सेक्स’, ‘धोका’ यातच मग्न आहे; वाचनाचे फायदे या पिढीला कळतच नाहीत...

 Lack of reading culture | वाचनसंस्कृती उदंड होवो

वाचनसंस्कृती उदंड होवो

Next

मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आगीत खाक झालेले वाचनालय पुन्हा सुरू केले़ यासाठी विद्यार्थ्यांनी दोन कोटी रुपये खर्च केले़ विद्यार्थ्यांची ही कामगिरी वाचन संस्कृतीचे आंदोलन करणा-यांसाठी नक्कीच सुखावह म्हणावी अशी आहे. आजची पिढी केवळ मोबाइलमध्ये गुंतली आहे़, ही पिढी ‘लव्ह’, ‘सेक्स’, ‘धोका’ यातच मग्न आहे; वाचनाचे फायदे या पिढीला कळतच नाहीत; असा दृढ समज करणाºयांना ही घटना पुन्हा एकदा विचार करायला लावणारी आहे. माजी विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली तेही मोठी रक्कम स्वत: उभारून! हेही कौतुकास्पद असेच आहे. सिडनहॅम महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थीवर्ग उच्चभू्र घरातून आलेला आहे़ उच्चभ्रूंमध्ये समाजात केवळ पैशाला महत्त्व दिले जाते, पैसा कमवण्याचे मार्ग त्यांच्याकडे पूजनीय असतात; असा सर्वसाधारण समज आहे. मात्र या समजाला छेद देत हे गं्रथालय आगीत खाक झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन वर्षे सातत्याने धडपड केली, हे स्पृहणीय आहे. तसा या महाविद्यालयाला वाचन संस्कृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे़ या महाविद्यालयात घटनेचे शिल्पकार डॉ़ बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक होते़ हा वारसा जपण्यात या विद्यार्थ्यांना यश आले आहे, असे म्हणणे आता क्रमप्राप्त आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे सतत आक्रमण होत असलेल्या मुंबईसारख्या शहरात हा बदल घडावा हीदेखील जमेची बाजू आहे़ विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचा आदर्श इतरांनीही आता घ्यायला हवा़ कारण आजही मुंबईतील अनेक गं्रथालयांच्या जागेवर खासगी संस्थांनी अतिक्रमण केले आहे़ एकीकडे राज्य शासनाने गाव तेथे वाचनालय असावे, असे जाहीर केले आहे़ या वाचनालयांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आहे़, तर दुसरीकडे ग्रंथालयांच्या जागी अतिक्रमणे होणे आता नित्याचे झाले आहे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास दादर, नायगावच्या गं्रथालयाचा उल्लेख करावा लागेल. तेथे शारदा थिएटर होते़ जवळपास तीन दशकांनंतर थिएटरची जागा पुन्हा गं्रथालयाला मिळाली. आता तेथे गं्रथालयाचा फलकही लागला़ मुंबईसह राज्यातील अनेक वाचकांना चांगल्या पद्धतीने ज्ञात असलेले हे दादरचे ग्रंथालय आहे़ थिएटरची जागा गं्रथालयाची असल्याचे या परिसरात राहणाºयांनाही कित्येक वर्षे माहीत नव्हते़ त्यामुळे आता भविष्यात सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन गं्रथालये टिकवण्यासाठी धडपड वाढावी, एवढीच अपेक्षा यानिमित्ताने करणे समायोचित ठरेल.

Web Title:  Lack of reading culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी