शेवटच्या लोकलचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:23 AM2017-10-31T00:23:39+5:302017-10-31T00:23:51+5:30

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणा-या नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फे-या असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचा-यांच्या सोयीचा वाटेल.

The last local train | शेवटच्या लोकलचा तिढा

शेवटच्या लोकलचा तिढा

Next

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणाºया नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फेºया असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचाºयांच्या सोयीचा वाटेल. प्रवासी संघटनांनीही या निर्णयाची फारशी दखल घेतलेली नाही. प्रत्यक्षात मात्र ४० लाख प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय-बदल अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्या नियोजनावर परिणाम करणारा आहे. वस्तुत: पूर्वी मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवांची वाहतूक रात्री पावणेतीन तास बंद राहत असे. हळूहळू कालावधी वाढवत नेत ती आता साडेतीन तास बंद राहते आहे. कधीही न झोपणाºया या महानगरात एकीकडे नाइटलाइफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटसह मनोरंजनाची साधने रात्रभर खुली करण्यासाठी राजकीय चुरस-कुरघोडी सुरू आहेत. असे असताना वाहतुकीचे प्रमुख, तुलनेने स्वस्त आणि बºयापैकी वक्तशीर असलेले साधन बंद राहण्याचा काळ वाढवत नेण्याचा निर्णय उफराटा म्हणायला हवा. मुंबईच्या चलनवलनाचेच नव्हे, तर या शहराच्या व्यवहारांचे, रोजगाराचे, कॉर्पोरेट व्यवस्थेचे घड्याळ बदलत-बदलत आता अहोरात्र झाले आहे. गर्दीच्या दृष्टीने ‘पीक अवर’ ही संकल्पनाही मोडीत निघाली आहे. त्यामुळे शेवटची लोकल, पहिली लोकल ही संकल्पनाच बाद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नव्हे, ती येथील कामगार, नोकरदार, अर्थव्यवस्थेची गरज आहे. शिवाय अवघ्या देशातून रात्रभर लांब पल्ल्याच्या गाड्या या शहरात येत असतात. मध्यरात्री उतरणाºया या प्रवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेस्थानकांत थांबू दिले जात नाही. कुटुंबासह, सामानसुमानासह रस्त्यावर थांबणेही सुरक्षित नसते. त्यांचा विचार केला, तर मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रभर लोकलची वाहतूक सुरू असणे गरजेचे आहे. नव्हे, शहराच्या बदललेल्या घड्याळाची ती गरज आहे. मुंबईहून सुटणाºया व तिकडे जाणाºया पहिल्या आणि शेवटच्या लोकलमधील गर्दीवर नजर टाकली की त्याची खात्री पटते. पूर्वीप्रमाणे विशिष्ट वेळेनंतर लोकलमध्ये चढायला मिळेल, बसायला मिळेल, अशी स्थिती उरलेली नाही. त्यामुळचे शेवटच्या लोकलची वेळ अलीकडे आणण्याचा निर्णय बदलण्याची, तो पूर्ववत करण्याची, प्रसंगी आणखी पुढे नेण्याची गरज आहे. त्याच वेळी मुंबईसह एमएमआरडीएच्या क्षेत्रात रात्रभर लोकल, परिवहन सेवा कशा
सुरू राहतील त्याचा विचार करून अंमलबजावणीची वेळ आली
आहे.

Web Title: The last local train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.