क्रिया-प्रतिक्रियांचा जीवघेणा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:04 PM2020-03-01T12:04:45+5:302020-03-01T12:09:27+5:30

देशभरात अस्वस्थता आणि संघर्षाचे वातावरण आहे. एकीकडे सनदशीर मार्गाने आंदोलने सुरु असताना दुसरीकडे हिंसक घटना घडत आहेत. समाजमाध्यमांद्वारे एकमेकांवर दोषारोप करुन हिंसेला जबाबदार धरले जात आहे. हिंसेला विशिष्ट समूह जबाबदार असल्याच्या प्रक्षोभक चित्रफिती प्रसारीत करुन आगीत तेल ओतले जात आहे. सरकार आणि पोलीस दलाकडे बोट दाखविले जात आहे. पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या कर्मचाºयांना जिवानीशी मारले जात आहे.  सामान्य माणसाचा हकनाक बळी जात आहे. काय चालले आहे, हे देशातील सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडे गेले आहे. 

Life-threatening game of action | क्रिया-प्रतिक्रियांचा जीवघेणा खेळ

क्रिया-प्रतिक्रियांचा जीवघेणा खेळ

Next
ठळक मुद्देएडिटर्स व्ह्यूहिंसक घटनांनी देश हादरलाजळगावसारख्या शहरातही पोहलचे लोण

मिलिंद कुलकर्णी 

देशभरात अस्वस्थता आणि संघर्षाचे वातावरण आहे. एकीकडे सनदशीर मार्गाने आंदोलने सुरु असताना दुसरीकडे हिंसक घटना घडत आहेत. समाजमाध्यमांद्वारे एकमेकांवर दोषारोप करुन हिंसेला जबाबदार धरले जात आहे. हिंसेला विशिष्ट समूह जबाबदार असल्याच्या प्रक्षोभक चित्रफिती प्रसारीत करुन आगीत तेल ओतले जात आहे. सरकार आणि पोलीस दलाकडे बोट दाखविले जात आहे. पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या कर्मचाºयांना जिवानीशी मारले जात आहे.  सामान्य माणसाचा हकनाक बळी जात आहे. काय चालले आहे, हे देशातील सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडे गेले आहे. 
कोण खरे, कोण खोटे? कुुणाची बाजू योग्य? हे समजायला मार्ग नाही, कारण सगळेच राज्य घटनेचा आधार घेत आहे, आम्हीच कायद्याचे पालन करीत आहोत, मुलभूत अधिकाराचे हनन होत असल्याचा दावा करीत त्याविरोधात आंदोलने, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे सुरु आहे. 
देशातील दिल्लीसारखी शहरे कोण पेटवत, भडकावत आहे, हे समोर येत नाही. दोन्ही गट एकमेकांकडे बोट दाखवत आहे. समर्थनार्थ चित्रफिती, संदेश प्रसारीत होत आहेत. प्रशासनाची कुचंबणा होत आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हिंसेचे शिकार ठरत असतानाही त्यांना कायदा व सुव्यवस्था राखणे, शांतता प्रस्थापित करण्यावर अधिक भर दिला जात आहे. दोन्ही बाजूने प्रत्येक घटनेचे भांडवल केले जात आहे. वस्तुुस्थितीचे आकलन न करता केवळ आपल्या सोयीची तेवढी माहिती प्रसारीत कशी होईल, त्यावर केवळ चर्चा कशी केंद्रित होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. 
दु:खदायक, वेदनादायक प्रकार म्हणजे, यात संवैधानिक पदावरील व्यक्तींना वादात ओढले जात आहे. एकीकडे राज्य घटनेविषयी आदर व्यक्त करीत असताना त्या घटनेनुसार संवैधानिक पदावरील व्यक्तींविषयी जाहीर चर्चा करणे, त्यांच्याविषयी मतप्रदर्शन करणे हेच मुळी चुकीचे आहे. पण झाले असे आहे की, या मंडळींचा आपणच बरोबर असल्याचा अट्टाहास असतो. मध्यममार्गी कोणी नसावे, असाच एकंदर नूर सध्या आहे. डावे आणि उजवे या दोन्हीपेक्षा मध्यममार्गी, समन्वयवादी विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि बहुसंख्य समाज याच विचाराचा आहे. असे नसते तर आगडोंब देशभर पसरला असता, हे लक्षात घ्यायला हवे. 
संवैधानिक पदांसोबतच महापुरुषांना अकारण वेठीला धरले जात आहे. इतिहासापासून प्रेरणा मिळते. महापुरुषदेखील माणसेच होती. त्यांच्याकडून उदात्त कार्य जसे घडले तसे काही चुकादेखील घडलेल्या असू शकतात. भूतकाळ आणि वर्तमानकाळात मोठा फरक आहे, तो लक्षात घेऊन आपण पुढे जायला हवे. आम्ही इतिहासाचे ओझे घेऊन वर्तमानकाळात जगणार असू तर एकविसाव्या शतकातील, माहिती व तंत्रज्ञान युगातील मोकळा विचार आणि हवा कशी मिळणार? महापुरुषांचे चारित्र्यहनन करण्यापर्यंत मजल जाते, हे अतीशय वाईट आहे. 
केवळ महानगरांपर्यंत हे सीमित राहिलेले नाही, तर हे लोण जळगावसारख्या शहरांपर्यंत पोहोचले आहे. मध्यंतरी एका संघटनेचा कार्यक्रम सामाजिक सभागृहात झाला. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाºयांसाठी विशिष्ट टोपी परिधान करणे सक्तीचे होते. ती टोपी नसेल तर तुम्हाला व्याख्यानाला बसता येणार नाही? काय चालले आहे, कोणत्या युगात आपण आहोत? कबीर, तुकोबा, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची परंपरा लाभलेल्या या देशात  हा संकुचितपणा कसा आला? प्रबोधनाचा वारसा आम्ही कसा विसरत चाललो आहोत, हे अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत. क्रियेची प्रतिक्रियादेखील धक्कादायक असते. धर्मस्थळावर जाहीर सभा घेण्यात आली. धर्म धोक्यात आहे, माणुसकी धोक्यात आहे, माणूस धोक्यात आहे, अशी भाषणे करण्याचे ते ठिकाण आहे काय? देवाचे नामस्मरण करण्याच्या जागी असे प्रकार होणे हे सांस्कृतिक, धार्मिक महाराष्टÑाच्यादृष्टीने चुकीचे आहे. 
कोणत्याही एका धर्माचे लांगुलचालन जसे चुकीचे आहे, त्याचप्रमाणे केवळ विशिष्ट धर्माचेच हे राष्टÑ असेल असे म्हणणे देखील चुकीचे आणि राज्य घटनेच्या विरोधात आहे. या सगळ्या कोलाहलातून सामान्य माणसाचा रोजी रोटीचा संघर्ष काही संपणारा नाही. दंगली, मोर्चे, आंदोलने यातून त्याच्या रोजीरोटीवर गदा येत आहे. अमूक लोकांकडून खरेदी करु नका, असे संदेश त्यात भर घालत आहे, विचारी आणि विवेकी लोकांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कोणत्याही विचाराची मंडळी असो परंतु जहाल मंडळी घातकच असते, हे लक्षात घ्यायला हवे.  

Web Title: Life-threatening game of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.