बंगालमध्ये कमळ फुलले, पण..

By admin | Published: September 20, 2014 11:58 AM2014-09-20T11:58:51+5:302014-09-20T11:58:59+5:30

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल सर्वच राजकीय पक्षांसाठी धडा शिकविणारे ठरले आहेत.

Loom in Bengal, but .. | बंगालमध्ये कमळ फुलले, पण..

बंगालमध्ये कमळ फुलले, पण..

Next
>- स्वपन दासगुप्ता, ज्येष्ठ पत्रकार
 
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल सर्वच राजकीय पक्षांसाठी धडा शिकविणारे ठरले आहेत. भारतीय मतदार राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि ग्रामीण पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करताना दिसून आला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी मतदारांची ही वर्तणूक आव्हानात्मक ठरली आहे. गेल्या दोन महिन्यांत ज्या पोटनिवडणुका झाल्या, त्यांचे निकाल लोकसभेच्या निकालांपेक्षा वेगळे दिसून आले आहेत. त्याचे सुसंगत वेिषण करणेही कठीण झाले आहे; पण एक गोष्ट स्पष्ट आहे, की भारतीय जनता पक्षाचा मतदानाचा टक्का घटतो आहे. सर्वच राज्यांत हीच परिस्थिती आढळून आली आहे. त्यातही मतदानातील ही घसरण पश्‍चिम बंगालमध्ये कमी आढळून आली आहे. या राज्यात दोन ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. त्यापैकी मध्य कोलकात्यातील चौरिंघी मतदारसंघात भाजपाच्या मतदानात अवघी एक टक्का घट दिसून आली. तेथील निवडणुकीत मे २00४च्या तुलनेत ९.७ टक्के मतदान कमी झाले. बशीरहाट दक्षिण या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील मतदानात भाजपाची मतसंख्या २.१ टक्क्याने कमी झाली.
भाजपाची प. बंगालमधील संघटना दुबळी असूनही तो पक्ष आपली मतसंख्या दोन्ही मतदारक्षेत्रात टिकवून ठेवू शकला. अन्य राज्यात मोदींचा प्रभाव घटल्याचे दिसून आले, तसे ते प. बंगालमध्ये दिसले नाही. उलट बशीरहाट दक्षिणची जागा जिंकून भाजपाने प. बंगाल विधानसभेत प्रथमच खाते उघडले आहे. चौरिंघी मतदारसंघातसुद्धा भाजपा दुसर्‍या क्रमांकावर आहे. या दोन्ही मतदारसंघात त्याने माकपवर मात केल्याचे दिसून आले आहे. २0११च्या निवडणुकीत भाजपाला स्वत:चा प्रभाव दाखवता आला नव्हता. त्या पार्श्‍वभूमीवर त्याने या राज्यात केलेली प्रगती आश्‍चर्यजनक आहे. कम्युनिस्टांच्या मतदारांना खिंडार पाडून भाजपाने ही प्रगती केली आहे. 
मे २0१४च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने प. बंगालवर जवळजवळ वर्चस्व प्रस्थापित केले होते. ती आगेकूच त्या पक्षाने कायम ठेवली आहे. चोरिंघीची जागा तृणमूल काँग्रेसने काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे. या ठिकाणी त्या पक्षाच्या मतदानात ९.७ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बशीरहाट दक्षिण मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा निसटता पराभव झाला आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसची मते तृणमूल काँग्रेसकडे वळल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात कम्युनिस्टांची मतसंख्या घटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण बंगालमधून कम्युनिस्ट पक्ष हळूहळू नामशेष होत आहे आणि त्याचे पाठीराखे तृणमूल काँग्रेसभोवती जमा होत आहेत, असेच एकूण चित्र आहे. कोलकात्यातही भाजपाच्या उमेदवाराला मिळालेली मते लक्षणीय म्हणावी लागतील आणि ते मतदान भाजपाचा आत्मविश्‍वास वाढविणारे ठरले आहे.
या पोटनिवडणुकीतून जो कल दिसून आला आहे, त्यावरून तृणमूल काँग्रेस कम्युनिस्ट पक्षाचीच पुनरावृत्ती करताना दिसून येते. ग्रामीण भागात तृणमूल काँग्रेसचे बळ वाढते आहे, तर शहरी भागात ते घटते आहे आणि शहरी भागात भाजपाचा प्रभाव वाढतो आहे; पण भाजपाला आपले अस्तित्व परिणामकारक पद्धतीने दाखविण्यासाठी संघटनेची चौकट अधिक व्यापक करावी लागणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यात कोलकाता महानगरपालिकेसह अन्य नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने पक्षाला संघटनात्मक बांधणी करावी लागेल. सध्या लोकांच्या उत्स्फूर्तपणे होणार्‍या मतदानावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. राज्यात स्वत:चे निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण करणे पक्षासाठी गरजेचे आहे. तृणमूल 
काँग्रेस प्रत्येक मोहल्ल्यात पक्केपणी रुजलेली आहे. ती स्थिती निर्माण करण्यास भाजपाला वेळच लागणार आहे. शारदा घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे अनेक पदाधिकारी गुंतलेले आहेत. त्यामुळे त्या पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो, त्याचा फायदा कोण करून घेतो, काँग्रेस की भारतीय जनता पक्ष? हे आगामी काळात दिसणार आहे.

Web Title: Loom in Bengal, but ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.