लव्ह, सेक्स अन् हत्या...
By मनीषा म्हात्रे | Published: November 20, 2022 02:16 PM2022-11-20T14:16:38+5:302022-11-20T14:16:38+5:30
१० पैकी एक हत्या प्रेमसंबंधातून
गेल्या वर्षभरात प्रेमसंबंधातून ११९ आणि अनैतिक प्रेमसंबंधातून २३२ अशा एकूण ३५१ हत्यांची नोंद झाली आहे. तर, गेल्या सात वर्षांत भारतात प्रेमसंबंधातून २८ हजारांपेक्षा अधिक महिलांचे अपहरण करण्यात आले. तर, १३ हजार जणांनी प्रेमापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती एनसीआरबीच्या अहवालातून समोर आली आहे.
१० पैकी एक हत्या प्रेमसंबंधातून
- भारतामध्ये १० पैकी एक हत्या ही प्रेमसंबंधातून घडत आहे.
- गेल्या वर्षी भारतात घडलेल्या ३० हजार हत्यांपैकी सुमारे ११ टक्के म्हणजे ०३ हजार ३०० हत्या या प्रेमप्रकरण आणि अवैध संबंधांतून घडल्या आहेत.
- यात हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या पुरुषांची संख्या ही महिलांच्या तुलनेत १४ पट जास्त आहे.
- गेल्या वर्षी पळून गेलेल्या प्रौढांपैकी ९२ टक्के महिला होत्या. तर, गेल्यावर्षी ऑनर किलिंगची ३३ प्रकरणे घडली. यातील २८ प्रकरणे झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमधील असल्याचेही यातून अधोरेखित झाले आहे.
ती गेली पण... सल्ले देणारे वाढले
श्रद्धाच्या मृत्यूनंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सहानुभूती तसेच तिचे कसे आणि काय चुकले? हे दाखविण्यासाठी फॉलोअर्स हजारोंच्या संख्येने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कुटुंबाचा विरोध असताना श्रद्धा आफताबसोबत राहू लागली आणि त्यानेच गळा दाबून तिची हत्या केल्यानंतर तिचे ३५ तुकडे करत मृतदेहाची विल्हेवाट लावली. श्रद्धा वालकरने मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामचा फारसा वापर केला नाही. गेल्या काही दिवसांत तिचे १२० असलेले फॉलोअर्स आता वाढून सुमारे हजारांच्या पुढे गेले आहेत. दिवसाला हजारो फॉलोअर्स वाढत आहेत.
तिला अनेक फॉलोअर्सनी ट्रोल केले आहे. कोणी तिच्या क्रूर मृत्यूबद्दल सहानुभूती दाखवत आहेत, तर काहीजण तिच्या मृत्यूला धार्मिक वळण देत ती कशी चूक होती, हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. तिने इन्स्टाग्रामवर सहा महिन्यांपूर्वी अपलोड केलेले फोटो आणि व्हिडीओंना काही दिवसांत सुमारे चार ते पाच हजार लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.
श्रद्धाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एकूण अवघ्या १४ पोस्ट होत्या. ११ मे रोजी शेवटची पोस्ट आहे. आफताबसोबतचा तिचा फाेटाे इन्स्टाग्रामवर आहे.