साऊथमधील सिनेमांनी उडवली आहे खळबळ, घाबरले आहेत बॉलिवूड फिल्ममेकर - मनोज वाजपेयी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:28 PM2022-04-28T12:28:38+5:302022-04-28T12:29:22+5:30

Manoj Bajpayee : ‘केजीएफ: चॅप्टर 2’ (KGF: Chapter 2) , RRR आणि ‘पुष्पा: द राइज’ सिनेमांच्या यशाबाबत बोलताना मनोज म्हणाला की, या सिनेमांच्या सस्केसने बॉलिवूड सिने निर्मात्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Manoj Bajpayee says Bollywood filmmakers are scared of south films success | साऊथमधील सिनेमांनी उडवली आहे खळबळ, घाबरले आहेत बॉलिवूड फिल्ममेकर - मनोज वाजपेयी

साऊथमधील सिनेमांनी उडवली आहे खळबळ, घाबरले आहेत बॉलिवूड फिल्ममेकर - मनोज वाजपेयी

Next

अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हा बॉलिवूडमध्ये त्याच्या शानदार अभिनयासाठी आणि बिनधास्त व्यक्तीत्वासाठी ओळखला जातो. मोठ्या मेहनतीने अनेक वर्षांच्या स्ट्रगलनंतर त्याने आज हे स्थान पटकावलं आहे. अलिकडे साऊथमधील सिनेमांची चांगलीच चर्चा होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी साऊथ सिनेमांचं कौतुक केलं आहे. आता मनोज वाजपेयीने सुद्धा यावर आपलं मत दिलं आहे. मनोज म्हणाला की, साऊथ सिनेमांच्या यशाने बॉलिवूडवर प्रभाव टाकला आहहे. ‘केजीएफ: चॅप्टर 2’ (KGF: Chapter 2) , RRR आणि ‘पुष्पा: द राइज’ सिनेमांच्या यशाबाबत बोलताना मनोज म्हणाला की, या सिनेमांच्या सस्केसने बॉलिवूड सिने निर्मात्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मनोज वाजपेयी म्हणाला की, ती वेळ आली आहे की, बॉलिवूड फिल्ममेकर्सनी आता साऊथ सिनेमांच्या यशातून काहीतरी शिकावं आणि समजण्याचा प्रयत्न करावा की, अखेर तेथील सिनेमाच्या यशाचं रहस्य काय आहे. महामारीनंतर साऊथमधील सिनेमांनीच थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे.

मनोज वाजपेयी म्हणाला की, 'इतके ब्लॉकबस्टर होत आहेत....मनोज वाजपेयी आणि माझ्यासारख्या लोकांबाबत एक मिनिटासाठी विसरून जा. या सिनेमांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडवली आहे. कुणालाच समजत नाहीये की, कुठे बघावं आणि काय करावं. या सिनेमांचं यश ही एक शिकवण आहे. ज्यातून बॉलिवूडला शिकण्याची गरज आहे. प्रेक्षकांचा सन्मान आणि त्यांची आवड त्यांच्यासाठी सर्वात वर आहे.

मनोज पुढे म्हणाला की, 'त्या लोकांमध्ये जिद्द आहे. सिनेमाचा प्रत्येक शॉट असा घेतात जणू जगातला बेस्ट शॉट घेत आहेत. जर तुम्ही RRR किंवा केजीएफ बघाल तर प्रत्येक फ्रेम अशी शूट करण्यात आली आहे की, एक शॉट त्यांच्या जीवनातील शेवटचा शॉट आहे. याचीच आपल्याकडे कमी आहे. आपल्याकडे मेनस्ट्रिम केवळ पैसे आणि बॉक्स ऑफिसबाबत विचार करतात. आपण स्वत:ला क्रिटीसाइज करू शकत नाही. त्यामुळे त्यांना वेगळे म्हणून वेगळं करतो. पण मुंबई फिल्म इंडस्ट्रीसाठी एक मोठी शिकवण आहे की, कशाप्रकारे मेनस्ट्रिम सिनेमा बनवावा.
 

Web Title: Manoj Bajpayee says Bollywood filmmakers are scared of south films success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.