‘होम पिच’वरील सामन्यांची रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:59 AM2018-03-10T00:59:51+5:302018-03-10T00:59:51+5:30

गिरीश महाजन, एकनाथराव खडसे व सुरेशदादा जैन यांच्या ‘होम पिच’वर निवडणुका होत आहेत. राज्य गाजविणा-या नेत्यांना गावातल्या निवडणुकीचे मोठे कौतुक असते. अलीकडे लोकप्रियता, कर्तव्यतत्परता याचे मापदंड म्हणून नेत्याच्या गावातील निवडणुकांकडे पाहिले जाऊ लागल्याने रंगतदार सामने होऊ लागले आहेत.

Match on 'Home Pitch' | ‘होम पिच’वरील सामन्यांची रंगत

‘होम पिच’वरील सामन्यांची रंगत

Next

राज्य गाजविणा-या नेत्यांना गावातल्या निवडणुकीचे मोठे कौतुक असते. अलीकडे लोकप्रियता, कर्तव्यतत्परता याचे मापदंड म्हणून नेत्याच्या गावातील निवडणुकांकडे पाहिले जाऊ लागल्याने रंगतदार सामने होऊ लागले आहेत. जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर या गावातील नगरपरिषदेची निवडणूक ६ एप्रिलला होत आहे. सलग २५ वर्षे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाºया महाजन यांनी संपूर्ण तालुक्यावर आणि तेथील सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड बसवली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मताधिक्य असो, की जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळविणे असो, जामनेर तालुका आघाडीवर राहिला आहे. अर्थात अधूनमधून पराभवाचे धक्के बसतात. जामनेर नगरपरिषदेच्या गेल्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. परंतु महाजन यांनी चातुर्याने अडीच वर्षानंतर पुन्हा नगरपरिषद ताब्यात घेतली. त्यांच्या पत्नी साधना या सध्या नगराध्यक्षा आहेत. या वेळी तर स्वत: मंत्री असल्याने त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जामनेर शहरासाठी आणला. आचारसंहिता लागण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत महाजन हे विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजन कार्यक्रमात व्यस्त होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला राष्टÑवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे आव्हान असेल. राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेला जामनेरात चांगला प्रतिसाद मिळाल्याने नेते व कार्यकर्ते जोमात आहेत. पण पक्षांतर्गत मतभेद, नेत्यांमधील अहंभाव, सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन व्यूहरचना करण्यात दोन्ही काँग्रेसला अद्याप म्हणावे तेवढे यश आलेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीत जसे एकहाती यश महाजन यांनी मिळविले आहे, त्याच्या पुनरावृत्तीसाठी ते प्रयत्नशील राहतील.
जामनेरपाठोपाठ जळगाव महापालिकेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होत आहे. प्रभागरचना, आरक्षण सोडत ही प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाल्याने माहोल तयार होऊ लागला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन हे ‘ब्रेक’नंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव दौºयात त्यांची भेट घेऊन सेनेच्या चिन्हावर महापालिका निवडणूक लढवावी, असे आवाहन केले आहे. गेल्या निवडणुकीत जैन यांनी खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि बहुमत मिळाले नसले तरी राष्टÑवादी काँग्रेस, मनसेच्या मदतीने पाच वर्षे सत्ता राबवली. त्यामुळे राष्टÑवादी काँग्रेस व मनसेदेखील आघाडीसोबत जायला उत्सुक आहे. भाजपाचे महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे हे मिशन ५१ च्या तयारीला लागले असताना, सुरेशदादा जैन यांनी बुलडाणा दौºयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महापालिका निवडणूक भाजपा-शिवसेना युती करून लढविण्याचा प्रस्ताव दिला. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविल्याने हालचालींना गती आली आहे. भाजपातील असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर या गावी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत स्थापन झाली आहे. तेथे प्रभागरचनेचे काम सुरू झाले आहे. सहा महिन्यात तेथेही निवडणूक होईल. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचे विधानसभा निवडणुकीप्रमाणे तगडे आव्हान खडसे यांना याहीवेळी राहील. अर्थात खडसे हे मुरब्बी असल्याने आव्हान ओळखून आहेत.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: Match on 'Home Pitch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.