मॅटिनी मयसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:46 AM2017-10-12T00:46:13+5:302017-10-12T16:55:59+5:30

 Matinee Mayor | मॅटिनी मयसभा

मॅटिनी मयसभा

googlenewsNext

मती गुंग होईल अशी नजरबंदी करणा-या ‘व्हीएफएक्स’च्या चित्रचमत्कृतीचं मायाजाल...
‘बाहुबली’ असो, नाहीतर ‘रा-वन’. सिनेमाच्या पडद्यावर जे नाही ते आहेच असं भासवणारी ‘व्हीएफएक्स’ या तंत्राची जादू कसं काम करते?
- पडद्यामागच्या रंजक रहस्याचा शोध
श्वास रोखून पाहताना मती गुंग होईल अशी ‘बाहुबली’मधील भव्यता, पूजेची आरास, केळीचे मांडव, मातीची मडकी, भंडाºयाचे-धुळीचे लोट, रथाच्या कोठाराची मोडून पडणारी दारं, हत्ती, त्याच्यावरची झुल आणि दागदागिने... यातील काही म्हणता काहीही कॅमेºयासमोर नव्हतं. होते फक्त अभिनेते, एक्स्ट्रा कलाकार, रथासारखा वाटणारा एक सांगाडा आणि अगदीच जुजबी प्रॉपर्टी ‘लगान’मध्ये भूजच्या वाळवंटात ढग दाटून येऊन पडलेला पाऊस, ‘थ्री इडियट्स’मध्ये लडाखच्या तलावावर उडालेलं रांचोचं विमान, ‘भाग मिल्खा भाग’मधील खचाखच भरलेल्या स्टेडियममधील माणसं, ‘पहेली’मधल्या शाहरूखची परस्परांना आडवी जाणारी जुळी रूपं आणि नायिकेसमोर नाचणारी निळी चिमणी, ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये रेल्वेच्या डब्यातून दिसणारं जग, एक्स्प्रेस थांबते त्या धबधब्याजवळची वनश्री, फाईट सीनमध्ये भडकणारे स्टोव्ह, उडणाºया गाड्या, फॅनमध्ये दिसणारं शाहरूखचं तरुण रूपडं, बाजीराव-मस्तानीमध्ये नाचत्या दीपिका पदुकोनच्या मागे उभा भव्य महाल. यातलं काही म्हणता काही खरं नव्हतं! हे सारं संगणकासमोर बसलेल्या काही तल्लख किड्यांनी
सॉफ्टवेअर लिहून पडद्यावरच जन्माला घातलेलं आहे. कसं? २,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं,
देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपये प्रसिद्ध झाला. आजच आपल्या जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क करा..
तुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा : sales.deepotsav@lokmat.com 
आॅनलाईन बुकिंग करा : www.deepotsav.lokmat.com  
नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवा : 8425814112

- योगेश दामले

Web Title:  Matinee Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.