मेहुलभाई आणि मॉब लिंचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:37 AM2018-07-27T06:37:57+5:302018-07-27T06:38:33+5:30

मेहुलभाई चोकसी हे एक छोटे व्यापारी मुंबईतील एका कोपऱ्यात छोटेखानी किराणा दुकान चालवत होते.

Mehulbhai and Mob Lynching | मेहुलभाई आणि मॉब लिंचिंग

मेहुलभाई आणि मॉब लिंचिंग

googlenewsNext

मेहुलभाई चोकसी हे एक छोटे व्यापारी मुंबईतील एका कोपऱ्यात छोटेखानी किराणा दुकान चालवत होते. आलेल्या ग्राहकांना पुड्या बांधणे (उगाच गैरसमज नसावा.) डाळतांदळाच्या पुड्या बांधून देणे, हा त्यांचा व्यवसाय होता. चोकसींच्या दुकानात नीरव नावाचा एक पोºया कामाला होता. तो मेहुलभार्इंना मामा म्हणून हाक मारायचा. येणाºया गिºहाईकांनाही या मामाभाच्याच्या जोडीचे अप्रूप वाटायचे. मेहुलभार्इंना क्रिकेटचे प्रचंड वेड होते. दातांच्या फटीत काडी घुसवून टीव्हीवरील मॅच पाहण्यात ते तासन्तास गुंगून जायचे. सध्या कुठेच चर्चेत नसलेली वेस्ट इंडिजची टीम ही त्यांची फेव्हरेट होती. वेस्ट इंडिजच्या विवियन रिचर्ड्स, अ‍ॅण्डी रॉबर्ट्स, कर्टली अँब्रोज वगैरे क्रिकेटपटूंची छायाचित्रे जमा करणे, त्यांचे रेकॉर्ड्स जपून ठेवणे, हा मेहुलभार्इंचा छंद होता. त्यांचं जीवन हे अत्यंत साधेपणानं, समाधानानं चाललं होतं. पायघोळ सफेद लेंगा, सफेद कुर्ता व डोक्यावर टोपी हा मेहुलभार्इंचा पेहराव होता. एक दिवस नीरव मेहुलभार्इंचे पासबुक अपडेट करून घ्यायला बँकेत गेला असता बँकेच्या मॅनेजरने त्याला बसवून ठेवले. बराचवेळ झाला तरी नीरव परत न आल्याने मेहुलभाई बँकेत पोहोचले, तर तेथे भिजलेल्या मांजरासारखा एका कोपºयात बसलेला नीरव त्यांना दिसला. बँकेत बरीच लगबग सुरू होती. मेहुलभाई बँक मॅनेजरचा दरवाजा ढकलून केबिनमध्ये शिरताच काही आडदांड व्यक्तींनी त्यांना खेचून खुर्चीत बसवले. मेहुलभाई, देश को टोपी लगाके कहा भागना चाहते हो, असा सवाल केला. हे सारे काय सुरू आहे, याचा उलगडा मेहुलभार्इंना सुरुवातीला झाला नाही. त्यानंतर, जे कळले त्यामुळे मेहुलभार्इंची दातखीळ बसली व मती गुंग झाली. मेहुलभाई यांच्या नावावर एकदोन कोटी नव्हे, तर तब्बल १६ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. वेळोवेळी उचललेल्या मोठमोठ्या रकमांखालील स्वाक्षरी ही आपलीच असल्याची कबुली मेहुलभाई यांनी दिली. मात्र, ही स्वाक्षरी आपण केलेली नाही, असे ठामपणे सांगितले. बँकांचे व्यवहार नीरव बघत असल्याने त्याच्याकडे विचारणा केली गेली असता मामा देत असलेले चेक अथवा रोख मी निमूटपणे आणून भरत होतो, असे नीरवने सांगितले. बराचवेळ उभयतांची चौकशी केल्यावर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाºयांनी त्यांना तात्पुरते सोडले. मेहुलभाई आणि नीरव विमनस्क अवस्थेत दुकानात असताना नीरवच्या मोबाईलवर फोन आला. पलीकडच्या व्यक्तीनं आपली ओळख सांगत वेस्ट इंडिज बेटांवरील अँटिग्वात येण्याकरिता पासपोर्ट व तिकिटे पाठवली.
मेहुलभाई व नीरव विमानातून उतरताच मेहुलभाई अक्षरश: आनंदानं उड्या मारू लागले आणि नीरव अवाक् होऊन त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. एका भव्य प्रासादात चार दिवस मुक्काम करून लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेतल्यावर आणि बून पॉर्इंट, हडसन पॉर्इंट, जॉन्सन पॉर्इंट आदी पर्यटनस्थळांवर बरीच मौजमजा केल्यावर तसेच वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंचा सहवास लाभल्यावर परतीच्या प्रवासाकरिता जेव्हा मेहुलभाई निघाले, तेव्हा एक मोठा जमाव त्यांच्यावर चालून आला...
- संदीप प्रधान

Web Title: Mehulbhai and Mob Lynching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.