सोशिकतेचे पुरूषी प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 07:58 AM2017-11-19T07:58:35+5:302017-11-19T07:59:11+5:30
आपल्याकडून इतरांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यामुळे झालेली गतिहीन जीवनशैली आणि प्रचंड मानसिक ताण यामुळे शरीरात वाढणा-या एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे चाळीशीच्या आत हृदयरुग्ण होण्याºया पुरूषांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.
- निशांत सरदेसाई
आपल्याकडून इतरांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यामुळे झालेली गतिहीन जीवनशैली आणि प्रचंड मानसिक ताण यामुळे शरीरात वाढणाºया एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे चाळीशीच्या आत हृदयरुग्ण होण्या-या पुरूषांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.
आजकाल कोणताही साजरा होणारा दिन आला की, सर्वात जास्त चर्चा होते ती सोशल मीडियावर. शुभेच्छा, सहानुभूतीपासून सुरू होणारे संदेश तत्त्वज्ञानापर्यंत येऊन ठेपतात. त्यात अनेक जण तत्त्वज्ञही होऊन जातात. मात्र, आज असणाºया ‘पुरुष दिना’ची सोशल मीडियावर किती चर्चा होईल? एकंदरीतच जितके महत्त्व पुरुष दिनाला दिले पाहिजे होते, तितके महत्त्व या दिवसाला मिळालेले नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात इतिहास काळापासून आजपर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला बहुतेक वेळा दुय्यम स्थानच मिळत राहिले आहे. काळाच्या ओघात विश्वामध्ये राहणीमानापासून ते मानसिकतेपर्यंत सर्वच गोष्टींत बदल होत गेले. एके काळी कठोर, निर्दयी, हेकेखोर अशी रंगविलेली आणि बहुतेक वेळा असणारीसुद्धा पुरुषांची प्रतिमा आज बदललीय. खलनायकाच्या भूमिकेतला पुरुष आज सामाजिक झालाय, समजूतदार झालाय आणि बहुतेक वेळा तो स्त्री पेक्षाही हळवा झालाय. आज कोणत्याही क्षेत्रात स्त्री-पुरुष असा काहीच भेदभाव राहिला नाहीये आणि हा बदल पुरुष जमातीने सकारात्मक स्वीकारला आहे. बºयाच वेळा तो भरारी घेण्यासाठी स्त्रीला पाठिंबा देतानाही दिसतो.
पुरुषी मानसिकतेत झालेले बदल हे असे अचानक झाले असतील? तर उत्तर आहे ‘नाही’. नैसर्गिकपणे थोडीशी अहंकारी आणि वर्चस्व गाजविण्याची मानसिकता हळूहळू कमी होते आहे आणि संयमी, हळवेपणा वाढीला लागतोय. स्त्रीवर अन्याय झाला, तर समाज पेटून उठतो, ते स्वाभाविक आहे, पण एखाद्या स्त्रीकडून पुरुषावर अन्याय झाला, तर तो सहन करण्याचा पर्याय पुरुष निवडतो. समाज दुबळा म्हणण्याची भीती त्याला सतावत असते. एखाद्या घटनेनंतर स्त्री रडून मोकळी होऊ शकते, पण पुरुषाच्या डोळ्यात पाणी म्हणजे दुबळेपणाचे लक्षण हेच आजपर्यंत आपण मानत आलोय.
आज स्त्री सर्व क्षेत्रात बरोबरीने काम करते, पण समाज जबाबदारी आणि कर्तव्याचा विषय आला की, पुरुषाकडे बोट दाखवितो. आजच्या धकाधकीच्या जीवनातही तो आपली कर्तव्ये कसोशीने पार पाडायचा प्रामाणिक प्रयत्नही करतो. कधी कमीही पडतो, तेव्हा प्रकट केली नाही, तरी समजून घेण्याची अपेक्षाही उराशी बाळगतो. मुलगा, भाऊ, नवरा, वडील यासारखे असंख्य रोल करताना बºयाच वेळेला त्याचा घाण्याला जुंपलेला बैल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. संकटात कणखरपणे उभा असणारा आजचा पुरुष हळव्या मनाचा आहे. त्याला त्याचे हळवेपण जगासमोर आणताही येत नाही आणि समाजात, कुटुंबात याचा फारसा विचारही होत नाही. एखाद्या दु:खद घटनेत कुटुंबाचे अश्रू पुसताना स्वत:चे अश्रू मात्र त्याला आतल्या आत गिळावे लागतात. अशा असंख्य गोष्टी मनामध्ये दाबूून ठेऊन येणाºया भविष्याला त्याला हसत समोर जायचे असते. परिणामी, हृदयरोग तज्ज्ञाकडे पुरुषांचीच संख्या जास्त असते. इतरांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यामुळे झालेली गतिहीन जीवनशैली आणि प्रचंड मानसिक ताण यामुळे शरीरात वाढणाºया एलडीएल कोलेस्ट्रॉल मुळे चाळीशीच्या आत हृदयरुग्ण होण्याºयांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. विमा दाव्यासाठी येणाºया प्रकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार हृदयविकाराने मृत्यू झालेल्या दाव्यांची संख्या ही गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी १६ टक्क्यांनी वाढलेली आहे.
आपल्या पश्चात कुटुंबाची आर्थिक ओढाताण होऊ नये, ही विवंचना त्याला सतत सतावत असते. कुटुंबासाठी आयुष्याच्या शिदोरीची सोय करताना, अनेक आनंदाच्या क्षणांना त्याला मुकावे लागते. वर्षातले ३६३ दिवस हे स्त्री-पुरुष समानतेचे असावेत. ८ मार्च हा एक दिवस फक्त महिलांचा म्हणून जसा जोरदार साजरा होतो, तसा १९ नोव्हेंबर हा एक दिवस पुरुषांचा म्हणून तितकाच जोरदार साजरा व्हावा, ही माफक अपेक्षा.