महानगरांचे प्रदूषण जिवावर

By Admin | Published: December 21, 2014 12:26 AM2014-12-21T00:26:15+5:302014-12-21T00:26:15+5:30

महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहराचा गळा घोटत आहे. स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो.

The Metropolitan Pollution | महानगरांचे प्रदूषण जिवावर

महानगरांचे प्रदूषण जिवावर

googlenewsNext

महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहराचा गळा घोटत आहे. स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो. मुंबई असे एकच शहर नाही, तर राज्यात पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक महानगरे दिवसेंदिवस प्रदूषणात भर घालत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून महानगरांसह आसपासच्या गावांचा श्वास कोंडला जात आहे.

भारतात कोलकाता हे सर्वात प्रदूषित महानगर असल्याचे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे. उष्ण कटिबंधीय आठ आशियाई देशांत ज्या महानगरांमध्ये प्रदूषणाची पातळी मोजण्यात आली, त्यात कोलकाता शहरात ती सर्वाधिक होती असे निष्पन्न झाले. लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया, भारत व जपान या आठ देशांत कार्बनी प्रदूषकांची पातळी मोजण्यात आली होती.

व्वाशे वर्षांपूर्वीच्या राजपत्रात मुंबईचे तापमान २२ ते २५ अंश असल्याचे नमूद केले आहे. आज मात्र ते कधी कधी ४० अंशांपेक्षाही जास्त होते आहे व नेहमीच ३० ते ३५ अंशांच्या आसपास असते. त्यामुळे एकेकाळी थंड हवेचे ठिकाण असलेल्या मुंबईत रोज होणाऱ्या चार हजार मेगावॅट वीज वापरापैकी १ हजार ४०० मेगावॅट वीज वापर एसी म्हणजे वातानुकूलन यंत्राद्वारे होतो. मुंबई असे एकच शहर नाही, तर महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक महानगरे दिवसेंदिवस प्रदूषणात भर घालत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून महानगरांसह आसपासच्या गावांचा श्वास कोंडला जात आहे. त्याचे जिवंत उदाहारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी डोंबिवली येथे पडलेला हिरवा पाऊस होय.
गारपीट असो वा अवकाळी पाऊस, ही सगळी तापमान वाढीची फलितं आहेत. जागतिक तापमानवाढ आणि स्थानिक तापमानवाढ यांचा एकमेकांशी दुरान्वये संबंध नाही, असे म्हटले जात असले, तरी स्थानिक तापमानवाढ हीदेखील हानिकारकच आहे. महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहरांचा गळा घोटत आहे. हे आता चटकन लक्षात आले नाही, तरी त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. एकट्या मुंबईचा विचार केला तरी शहरातून दररोज जमा होणाऱ्या सुमारे ७ हजार ५०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यात महानगरपालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
महानगरांमध्ये महिनाभरात आलेल्या निम्म्या तक्रारींचे देखील निवारण होत नाही. कालांतराने स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो. गोदावरी नदी अगोदरच प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, विविध ठिकाणांहून गोदाकाठावर वाहने धुण्यासाठी आलेले, येणारे प्रदूषणात आणखी भर घालत आहेत.
वाहनांना लागलेली घाण, वंगण पाण्यात मिसळत असल्याने पाणी दूषित होत आहे. दुसरीकडे चिपळूण येथील रासायनिक कारखान्यांमुळे तेथील नद्या प्रदूषित
झाल्या आहेत. परिणामी अनेकांनी
रोजगार गमावला आहे. मात्र याची नोंद कुठेही नाही, हे दुर्दैवी आहे.
(लेखक पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)

1400 कोटी रुपये महापालिका प्रशासन घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करते. मुंबईकर महापालिका प्रशासनाकडे दरवर्षी कचऱ्याच्या संदर्भात सरासरी ६ हजार ५६२ जण तक्रारी करतात. मुंबई वगळता उर्वरित महानगरांमध्ये देखील थोड्याफार फरकाने हीच अवस्था असते, बदलतात ते केवळ आकडे.

तापमानवाढीला शहरीकरण कारणीभूत आहे. अनेक शहरे प्रदूषणाने ग्रस्त आहेत. आता यावर विचित्र उपाय केले जाण्याचा संभव आहे.
विशिष्ट रसायनांचा, संयुगांचा वातावरणात मारा करून कार्बन डायआॅक्साइडचे रूपांतर करण्याचा विचार केला जात आहे.
गणिती आकडेमोडीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न दिसतो, पण हा विज्ञानाच्या बैठकीचा दोष आहे. रासायनिक प्रक्रिया व गणिती आकडेमोड यात फरक आहे. रासायनिक प्रक्रियेत दोन अधिक दोनचे उत्तर काहीही येऊ शकते.
मुळात हवा किंवा वातावरण हे फक्त कार्बन डायआॅक्साइडचे बनलेले नाही. त्यात मिथेन, क्लोरोफ्लुरो कार्बन, नायट्रोजन आॅक्साइड, सल्फर डायआॅक्साइड तसेच इतर अनेक वायू व संयुगे यांचा समावेश होतो.
उष्णता, थंडी, आर्द्रता, सूर्यप्रकाश अशा अनेकविध घटकांचा रासायनिक प्रक्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा प्रकार घडू शकतो.

संजय शिंगे

Web Title: The Metropolitan Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.