कोटीच्या कोटी उड्डाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:47 AM2017-12-13T01:47:07+5:302017-12-13T01:47:15+5:30

एकीकडे जगभरात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील नोकºयांमध्ये कपात होत असताना, त्याच क्षेत्रातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या मुंबई आयआयटीयन्सला नोकºया देण्यासाठी रांगेत उभ्या आहेत, ही आपल्या देशासाठी अतिशय सकारात्मक बाब म्हणायला हवी.

Million crores of flights! | कोटीच्या कोटी उड्डाणे!

कोटीच्या कोटी उड्डाणे!

Next

एकीकडे जगभरात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील नोकºयांमध्ये कपात होत असताना, त्याच क्षेत्रातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या मुंबई आयआयटीयन्सला नोकºया देण्यासाठी रांगेत उभ्या आहेत, ही आपल्या देशासाठी अतिशय सकारात्मक बाब म्हणायला हवी. एकापाठोपाठ एक बंद पडणाºया खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमुळे या क्षेत्रात राम उरलेला नसल्याचे संस्थाचालक म्हणत आहेत. मात्र, दुसरीकडे आयआयटीयन्सला कोट्यवधी रुपये पगार देणाºया नोकºयांमुळे भारतीय गुणवत्तेला जगभर मागणी असल्याचे अधोरेखित होत आहे. भारतीय विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत मिळणाºया गलेलठ्ठ पगाराच्या नोकºयांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. दरवर्षी आयआयटीमध्ये भरणाºया नोकरी मेळ््या (प्लेसमेंट सीझन)मध्ये राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची रीघ दिसून येते. विशेष म्हणजे, दरवर्षी या कंपन्यांची संख्या वाढत आहे. मायक्रोसॉफ्ट, उबर, गोल्डमॅन सॅश, फेसबुक अशा नामांकित कंपन्यांकडून मिळणाºया आॅफरमुळे विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावल्याचेही शिक्कामोर्तब होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आयआयटीमधील प्रवेशासाठी बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेच्या निकषांची चाचणीही तितकीच कठीण होत चालली आहे. त्यासाठी गेल्या वर्षीचेच उदाहरण पाहणे महत्त्वाचे ठरेल. गतवर्षी तब्बल सव्वाबारा लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा दिली. मात्र, त्यातील केवळ दीड लाख विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. या एकूण विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष आयआयटीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २६ हजार ४५६ इतकी होती. यावरूनच आयआयटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती खडतर आहे, हे लक्षात येऊ शकते. भारतीय शिक्षण पद्धतीवर चहुअंगाने चर्चा झडत असल्या तरी येथील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेबाबत जगभर आदर आहे. राष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणाºया ४० ते ५० लाख रुपयांपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणाºया सव्वाकोटी रुपयांच्या नोकºया पाहता, भारतीय विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात येते. याआधीही फेसबुक, टिष्ट्वटर, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांवर भारतीय वंशांच्या व्यक्तींनी उच्चपदे भूषवित ठसा उमटविला आहे. आयआयटीसारख्या संस्थेत दरवर्षी पदवी प्राप्त करण्यापूर्वीच हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या हाती नोकरी असते, हादेखील एक उच्चांक आहे. सुमारे २००हून अधिक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी तिष्ठत उभ्या असतात, हे चित्रही सुखावह असेच आहे.

Web Title: Million crores of flights!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी