केरळच्या आकाशात मान्सून पोहोचतो, तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 11:36 AM2023-06-13T11:36:43+5:302023-06-13T11:36:58+5:30
मान्सूनच्या स्वागतासाठी थेट केरळमध्ये असणे ही शब्दात व्यक्त न करता येणारी अद्वितीय अनुभूती आहे. त्या जादुई अनुभवाबद्दल....
अभिजित घोरपडे, संस्थापक, भवताल मंच
यावर्षी पाऊस लांबलाय म्हणून ठीक, नाही तर आम्ही तुमच्याशी बोलायला इथे उभे राहू शकलो नसतो. पावसाच्या हंगामात वर्षभराची कमाई करण्यासाठी आमची लगबग सुरू असते. त्यात इकडचे तिकडे करायलाही वेळ मिळत नाही...
केरळची राजधानी थिरुअनंतपूरम. तिथे विडिन्नम (Vizhinjam) बंदरात तिथल्या मासेमारांशी गप्पा मारत होतो. त्या परिसरात फक्त छोट्या नावांनाच मासेमारीची परवानगी आहे. प्रचंड गजबज असणारे हे बंदर, तिथल्या छोट्या फिश कंपनीचे मालक श्री. सहायम् आणि मासेमार झेवियर सांगत होते. त्यांच्यासाठी पाऊस आणि त्याचे आगमन किती महत्त्वाचे आहे, याची ही छोटीशी झलक. अभिजित संस्था भवता
मान्सून समजून घ्यायचा असेल, अनुभवायचा असेल तर केरळला जावे लागते. त्याच उद्देशाने "भवताल'ने मान्सून आगमनाच्या तोंडावर केरळचा अभ्यासदौरा आयोजित केला होता. त्यात मान्सूनचे अनेक पैलू उलगडता आले. तिथले संपूर्ण जगणे, सर्वच व्यवहार मान्सूनचे आगमन, पाऊस यावर अवलंबून असतात, याचा अनुभव घेता आला. विडिन्नम बंदरात भेटलेले सहायम् आणि झेवियर यांच्या मते मान्सूनचा काळ मासेमारीसाठी धोक्याचा. त्यात जीवित हानी होण्याची शक्यता असते. वादळांमुळे मोठी हानी झाल्याची अलीकडची उदाहरणेही आहेत. तरीसुद्धा मान्सूनच्या आगमनाची वाट पाहिली जाते. कारण पावसाचे गोडे पाणी आणि समुद्रातील खारे पाणी एकमेकांत मिसळते, वाऱ्यांमुळे समुद्रात घुसळण होते. त्यातून मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध होतात. त्यांच्याच जिवावर तर संपूर्ण वर्ष व्यवस्थित काढता येते; पण या हंगामात कमी- जास्त झाले तर मात्र नुकसान सोसावे लागते. या एकाच बंदरात ऐन मोसमात तब्बल पाच हजार बोटी असतात आणि प्रत्येक बोटीवर पाच- सहा माणसं. याशिवाय माशांचा लिलाव करणारे, हे मासे विकत घेणारे विक्रेते, त्यांच्याकडून घेणारे छोटे-मोठे ग्राहक अशी ही साखळी. किती तरी हजार कुटुंबांचे यावर अवलंबित्व आणि त्याच्यात गुंतलेले त्यांचे अर्थकारण...! म्हणूनच मान्सूनचे आगमन लांबले तर लोकांची चिंता वाढणे थापक. बाल मंच स्वाभाविक, ते या दौऱ्यात पाहायला मिळाले
मान्सूनचे आगमन ही अतिशय विस्मयकारक घटना. विशेषत: वादळी पाऊस ते मोसमी पाऊस या स्थित्यंतराचे साक्षीदार होणे हा अद्वितीय अनुभव तुम्ही केरळात असाल तर त्याची मजा किती तरी पटींनी वाढते. समुद्रावरून काळे ढंग आक्रमण करून येतात, त्यांच्यासोबत गडगडाटी वादळी पाऊससुद्धा येतो. हे ढंग किनाऱ्यापर्यंत पोहोचून भरपूर पाऊस देतात. हे काही दिवस घडल्यानंतर मग मान्सूनच्या शांत, संततधार पावसाचे आगमन होते.
केरळच्या दौऱ्यात सुरुवातीला गडगडाटी वादळी पाऊस अनुभवायला मिळाला. त्यानंतर अगदी अखेरच्या दिवशी. ८ जून रोजी संततधार मान्सूनही अंगावर झेलता आला. हा रोमांचक अनुभव शब्दांत मांडता येणे केवळ अशक्य!
१ जून ही तारीख केरळसाठी सर्वांत महत्त्वाची. कारण या दिवशी दोन ठळक घडामोडी अपेक्षित असतात. मान्सूनचे आगमन आणि शाळांना सुरुवात. पहिल्या दिवशी पावसात भिजत शाळेत गेल्याच्या आठवणी इथे आधीच्या पिढ्यांपारीक्त ऐकायला मिळतात. या वर्षी पाऊस लांबल्याने सगळ्या काही तरी चुकल्यासारखे वाटले. शाळेची १ जूनला सुरुवात, आहारात प्रामुख्याने भात, मासे, विविध मसाले यांचा संबंधही थेट मान्सूनशी आणि त्याच्यामुळे निर्माण झालेल्या हवामानाशी आहे. एक विशेष बाब म्हणजे केरळमध्ये प्रामुख्याने गरम पाणी प्यायले जाते. बहुतांश हॉटेलात, घरी, कार्यालयांत गेलात तर समोर गरम पाण्याचा ग्लास येतो. त्याचा संबंध नेमका कशाशी आहे हे कोणी सांगितले नाही. मात्र, पावसाचे जास्त प्रमाण आणि त्याच्यामुळे पिण्याचे पाणी उकळून पोटाची घेतली जाणारी काळजी असा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. हीच बाब जास्त पावसाच्या गौवा राज्यातही अनुभवायला मिळते.
शेतीच्या अनुषंगाने मान्सून भातासाठी उपयुक्त आहेच, पण कोचीनवलीन कडमडी भागात त्याचा वेगळा पैलू पाहायला मिळाला. तिथल्या किनारी भागात खाया पाण्याचे राज्य असते. त्यात खूप मोठ्या प्रमाणात कोळंबीची शेती केली जाते; पण मान्सूनच्या पावसासोबत हे खारे पाणी मागे हटते आणि तिथे जमणाऱ्या गोड्या पाण्यात भातलागण वेग धरते. त्यानुसारच शेतीच्या, इतर व्यवसायांच्या कामांचे वेळापत्रक ठरलेले असल्याने मान्सूनचे आगमन लांबले, तर काळजी वाटणे स्वाभाविक ठरते, तिथल्या अशा किती तरी गोष्टी मान्सूनचे वारे, त्याच्यासोबत येणारा पाऊस यामध्ये गुंतलेल्या आहेत. म्हणूनच तिथल्या प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व मान्सूनशी जोडले गेलेले आहे.
हे आजचे नाही. हा संबंध शतकानुशतके कायम आहे. मोसमी वाऱ्यांमुळेच केरळचा, मलबार किनाऱ्याचा व्यापार वाढला. तिथे आलेल्या विविध प्रदेशांच्या, विविध धर्मांच्या व्यापाऱ्यांनी, सत्ताधीशांनी त्यात भर घातली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे थिरुअनंतपूरम येथील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्याला किती तरी परदेशी मंडळींनी दिलेल्या देणग्या. या दौऱ्यात पद्मनाभस्वामी मंदिराच्या गाभान्याजवळ खांबांवर अनेक चिनी चेहरे कोरलेले दिसले हा मुद्दा स्पष्ट करायला हे चिनी चेहरे पुरेसे आहेत. खरे तर कोणत्याही भागाला तिथले हवामान प्रभावित करतेच; पण हा प्रभाव किती व्यापक असू शकतो. हे केरळचा मान्सून दाखवून देतो. म्हणूनच त्याच्या स्वागताची ही केरळ सफर आणि त्याची ही निरीक्षणे!