अवयवदानाची प्रेरणा गतिमान, एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:59 AM2017-09-19T01:59:18+5:302017-09-19T01:59:21+5:30

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते.

The motivation of the organism is dynamic, it is now possible to successfully transplant someone's organ and successfully transplant it to another person | अवयवदानाची प्रेरणा गतिमान, एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य

अवयवदानाची प्रेरणा गतिमान, एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य

Next

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते. अपंग शब्द झेलत त्याला रोजचे जगणेही नकोसे वाटते. यावर मात करण्यात विज्ञानाला यश आले असून एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य झाले आहे. सोलापूरसारख्या ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यात दोन देहाचे अवयदान करण्यात आल्याने सोलापूरने मोठमोठ्या आणि प्रगत शहरांना मागे टाकले आहे. अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे यासाठी सोलापुरात प्रभावीपणे जनजागृती सुरू आहे. सोलापूरच्या अश्विनी सहकारी ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी डॉ. संदीप होळकर व समन्वयक प्रिया पवार यांनी एका ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांना अवयदानाचे महत्त्व सांगून अवयवदान करण्यास प्रवृत्त केले होते आणि त्यातून पार्थ शिवकुमार कोळी या उस्मानाबादच्या युवकाचे सहा अवयव काढण्यात आले. त्याच्या डोळ्यामुळे दोघा अंधांना दृष्टी मिळाली. पुण्यातील एकाचे हृदय धडधडले. मूत्रपिंड निकामी झालेल्या दोघांचे जीव वाचले. लिव्हरचा उपयोग एकाचा जीव वाचण्यासाठी उपयोगी पडला. वास्तविक १९७७ साली मुंबईत पहिली अवयवप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यामानाने सोलापूर ५० वर्षे मागे असताना सहा महिन्यात दोघा जणांचे अवयदान घडवून आणून काही जणांचे प्राण वाचवण्यात इथल्या डॉक्टर आणि समाजसेवकांना यश आले आहे. वास्तविक अपघात किंवा मेंदूवर उपचार करणाºया विविध इस्पितळात अधून मधून ब्रेन डेड झालेले रुग्ण आढळतात. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर हतबल नातेवाईक अंत्यविधी उरकून मोकळे होतात. ज्याचे ब्रेन डेड झाले आहे त्या देहाचा उपयोग केवळ आता नष्ट करण्यापलीकडे नसतोच. तो देहसुध्दा १० ते १२ जणांचे प्राण वाचवू शकतो. त्यांच्या रूपाने आपल्या जीवलगांना आपण पाहू शकतो हे पटवून दिल्यामुळे नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येऊ लागले आहेत, हे सोलापूरच्या घटनेतून दिसून येते. आयुष्यभर विद्यादान करणाºया सोलापुरातल्या ७० वर्षीय शिक्षिकेने मृत्यूनंतरही विद्यार्थ्यांसाठी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आठ दिवसापूर्वी त्यांचे देहदान करण्यात आले. या देहाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी व्हावा, हीच प्रेरणा यातून मिळाली असून ही चळवळ देशभर गतिमान झाली तर अनेकांचे जीव वाचतील. सरकारनेही याबाबत धोरण निश्चित केले पाहिजे.

Web Title: The motivation of the organism is dynamic, it is now possible to successfully transplant someone's organ and successfully transplant it to another person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.