श्री साईबाबांचा महिमा जागतिक स्तरावर
By admin | Published: October 3, 2014 01:32 AM2014-10-03T01:32:45+5:302014-10-03T01:32:45+5:30
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी)च्या वतीने 2 ते 4 ऑक्टोबर या काळात आयोजित केलेल्या 96 व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने साईबाबांच्या कार्याचा हा आढावा..
Next
>श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी)च्या वतीने 2 ते 4 ऑक्टोबर या काळात आयोजित केलेल्या 96 व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने साईबाबांच्या कार्याचा हा आढावा..
साईबाबांनी आपल्या अवतार कार्यात आपल्या भक्तांना सांगितलं होतं, ‘माङया देहत्यागानंतर माझी हाडं माङया तुर्बतीतून बोलतील.. मुंग्यांसारखी माणसांची रीघ लागेल..’ त्याचा आज प्रत्यय येतो आहे. बाबांचे समाधिस्थळ आज लाखो भाविकांच्या मनाला ऊ र्जा देणारे केंद्र बनलं आहे. देशात प्रत्येक राज्यात बाबांची मंदिरे मोठय़ा प्रमाणात असून, अमेरिकेत सुमारे 15क्, ऑस्ट्रेलियात 8, इंग्लंडमध्ये 7, कॅनडात 2, तर व्हॅनकुवरमध्ये 1 साईमंदिर आहे. सिंगापूर, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिशस, न्यूझीलंड, टांझानिया, युनायटेड किंगडम, हाँगकाँग, साऊथ आफ्रिका, पूर्व आफ्रिका, कुवेत, श्रीलंका, झांबिया, जपान, सौदी अरेबिया, रशिया, नेदरलँड, स्पेन, फिजी, बम्यरुडा, नॉव्रे, वेस्ट इंडीज आदी देशांमध्येही साईबाबांची मंदिरे होत आहेत. संपूर्ण विश्वात साईनामाचा महिमा प्रचंड वेगाने वाढत आहे. सुमारे 115 देशांत साईबाबांचे कार्य पसरले असून, आजर्पयत संस्थानाच्या दक्षिणापेटीतून प्राप्त झालेले 115 देशांचे परकीय चलन त्याचा पुरावा म्हटल्यास वावगे होणार नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही साईबाबांच्या जीवन कार्याचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत असून, एकटय़ा अमेरिकेत बाबांची 15क् मंदिरे आहेत. जगावर सत्ता गाजवणा:या अमेरिकेसारख्या देशात साईनामाचा महिमा प्रचंड वेगाने वाढत आहे. अनेक मोठय़ा शहरात दर गुरुवारी सुमारे 5क्क् ते 6क्क् लोक एकत्र येऊन साईबाबांची प्रतिमा समोर ठेवून भजन, पूजन व प्रार्थना करतात. अशी शंभरपेक्षा अधिक प्रेअर सेंटर्स अमेरिकेत कार्यरत असून, या एकत्रित येण्याचे पर्यवसान पुढे साई मंदिराच्या निर्मितीमध्ये होत आहे. शिकागो हॅमशायर येथील 12क् वर्षापूर्वीच्या चर्चमध्ये एका भागात बाबांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून, येथे बाबांच्या चारही आरत्या नियमित होतात. अमेरिकेत 1982 साली न्यूयॉर्क येथे साईबाबांच्या पहिल्या मंदिराची स्थापना झाली. शिकागोमधील आरोरा मंदिरात दर गुरुवारी व रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरात शिर्डी संस्थांनाप्रमाणो सर्व उत्सवही साजरे केले जातात. मंदिरातील मूर्तीची विधिवत पूजा व प्राणप्रतिष्ठा सोहळा 1998 साली शिकागो येथे पार पडला. न्यूयॉर्कमध्ये स्लोशिंग व बाल्डवीन या ठिकाणीही साईबाबांची मंदिरे झाली असून, जगात साईबाबांच्या जीवनकार्याचा प्रसार झपाटय़ाने होत आहे.
सर्वधर्म समभावनेची शिकवण साईबाबांनी जगाच्या कानाकोप:यात नेली, हे यावरून सिद्ध होते. देशात विविध देवदेवतांच्या मूर्ती बनविण्याचे काम राजस्थानमध्ये जयपूर येथे चालते. येथील अनेक मूर्तिकारही साईबाबांचे भक्त आहेत. आम्ही भारतासह जगभरात मूर्ती बनवून पाठवतो, मात्र सर्वाधिक मागणी साईबाबांच्या मूर्तीला असल्याचे मूर्तिकार आवजरून सांगतात. देशातही श्री साईबाबांची मंदिरे झपाटय़ाने विस्तारित होत आहेत. सर्वाधिक मंदिरे आंध्र प्रदेशात असून, मद्रास-तिरूपती रस्त्यावर नगरिया येथे तिरूपतीपासून 35 किमी अंतरावर असलेल्या डोंगरावर जमिनीपासून 3क्क् ते 4क्क् फूट अंतरावर 1क् एकरांच्या परिसरात सुमारे 1क् कोटी खर्चाचे देशातील सर्वात मोठय़ा साई मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. अनेक साईभक्त बाबांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम करत आहेत.
श्री चंद्रभानु सत्पथी या आयपीएस अधिका:यांना 1992 मध्ये ‘शिर्डी के साईबाबा’ हा चित्रपट पाहून शिर्डी दर्शनाची ओढ लागली. रजा टाकून त्यांनी दोन वर्षे शिर्डीत वास्तव्य केले. बाबांच्या सर्व साहित्याचे वाचन केले. बाबांच्या कार्याने प्रभावित झाले. 1994 मध्ये त्यांनी प्रथम चेन्नई येथे साईमंदिर बांधले. तेव्हापासून आजर्पयत 325 साईमंदिराच्या उभारणीसाठी प्रेरणा देऊन प्राणप्रतिष्ठा केली. देश-परदेशात आतार्पयत 325 मंदिरे बांधली. चंद्रभानू सत्पथी यांच्या प्रयत्नामुळे उत्तर भारतात श्री साईबाबांचा प्रचार झपाटय़ाने झाला. आता ओरिसा राज्यात त्यांच्या प्रयत्नामुळे साईचळवळ जोमाने फोफावत आहे.
199क्मध्ये इंटरनेटचा प्रसार झपाटय़ाने झाला. श्री साईबाबांवर पहिली वेबसाईट 1994मध्ये 666.2ं्रुंं.1ॅ सुरू झाली. 2क्क्क् नंतर इंटरनेटमुळे बाबांचे साहित्य जगभरात उपलब्घ झाले. आज शेकडो वेबसाईट्स इंटरनेटवर उपलब्ध असून, बाबांची सर्व माहिती भक्तांर्पयत पोहोचवतात. आज साई संस्थानच्या वेबसाईटवरून दर्शन- आरती आपल्या घरी बसून बघण्याचा हजारो साईभक्त लाभ घेतात, तर टीव्हीवरून लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात.
197क्च्या दरम्यान अनेक भारतीय नोकरीसाठी परदेशात गेले. त्यातील काही भक्तांनी बाबांचे फोटो घरात ठेवून घरातच छोटे मंदिर बनवले. हळूहळू काही भक्त अशा घरी गोळा होऊन दर गुरुवारी बाबांचे भजन करू लागले. त्यातून मोठा ग्रुप बनून पुढे 2क्क्क्मध्ये शिकागोमध्ये साईउत्सव’ हा कार्यक्रम सुरू झाला. यामध्ये 3 दिवस 7क्क्क् भक्तांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केला. यात युके, मेक्सिको, यूएसए, कॅनडा, दक्षिण आफ्रिका येथील साईभक्त आले होते. हे पहिले इंटरनॅशनल साईभक्त संमेलन असावे. यामध्ये चंद्रभानू सत्पथी यांनी मार्गदर्शन केले. सुधीर दळवी, अनुप जलोटा, मनहर उधास यांनी बाबांचा महिमा भक्तांर्पयत पोहोचवला. 2क्क्2 मध्ये सिडनी ऑस्ट्रेलिया येथे व 2क्क्3मध्ये साऊथ आफ्रिका व नैरोबी येथे उत्सव झाला.
साईभक्त के. व्ही. रमणी यांनी 1996 साली शिर्डी साई ट्रस्टची स्थापना केली. त्याद्वारे गोरगरीब जनतेला मदत करण्यात येते. सन 2क्क्4 मध्ये त्यांनी त्यांच्या दोन सॉफ्टवेअर कंपन्यांमधील गुंतवणूक विकली. त्यातून 8क् टक्के नफा ट्रस्टला दान केला. 2क् टक्के कुटुंबासाठी ठेवला. यातूनच काही रक्कम शिर्डी येथे साईआश्रम बांधण्यासाठी खर्च केली. संस्थानने दिलेल्या 2क् एकर जागेवर साईआश्रम हे भक्तनिवास बांधले. यासाठी शिर्डी साई ट्रस्टकडून 112 कोटी खर्च करून 5 वर्षात संपूर्ण बांधकाम पूर्ण केले. याशिवाय शिर्डी साईट्रस्टकडून दर वर्षी सुमारे 4 हजार व्यक्तींना वैद्यकीय मदत व 3 हजार विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती देण्यात येते. अशा या श्री साईबाबांच्या महानिर्वाणाला आता 96 वर्षे पूर्ण होत आहेत.
मोहन यादव
जनसंपर्क अधिकारी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी